प्लास्टीक
झाड ,पान फूल,फळ, प्राणी ,पक्षी ,मानव देह,सारे नाशवंत! पण आत्मा अमर आहे. तो फक्त देह बदलतो.
प्लॅस्टीक हे अजब रसायन आहे. प्लॅस्टिक आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग झालाय,मोठमोठ्या कामात(वस्तू बनवण्यात) त्याचा वापर केला जातो. मेन म्हणजे विद्युत दुर्वाहक आहे.
अस असलं तरी पाणी प्रवाहात अडथळा निर्माण करतो.जाळल्यास विघातक धूर निर्माण करतो. पूरल्यास त्याचे शेकडो वर्ष विघटन होत नाही
चर्वण करूनही जनावरांच्या पोटात तसाच पडून राहतो त्याच जैविकविघटन होत नाही. सागराच्या तळाशी असलेले विविध दुर्मिळ जैवघटक हेही संकटात येतात त्यामुळे कचरा म्हणून समुद्र आपल्या पोटात सामावू शकत नाही
आत्म्याचा नाश होत नाही त्याची उपाधी लावू शकतो का
नाश न पावणार्या भस्मासूर आणि रक्तबीज राक्षसांची उपाधी लावू शकतो.
सायन्स म्हणतं उर्जेचा नाश होत नाही. ती एका माध्यमातून दुसर्या माध्यमात रूपांतरीत होते
आपण कोणतीही उपाधी लावली तरी त्याचे फायदेही आहेत आणी नशोषणारे तोटेही,
म्हणून प्लास्टिकचा वापर योग्य व कमीत कमी करा. असं समजून करा की हातात जादूची कांडी आहे, आणि ती प्लॅस्टीकचा वापर आपण कसा करतो, त्यावरून त्याचे रुपांतर करते, कधी राक्षसात, कधी उर्जेत तर कधी आत्म्यात.
समाप्त
वर्षा पाटील© ®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा