पाऊस भाग :१७

 

आता घरच्या साठी निघणं कठीण होतं, कँटीनमध्ये  जावून जेवलो. छान गप्पा मारल्या, जी बाई  आपल्याला आवडलेला पुरूष  स्वतचा मर्जीने थांबवून ठेवते तो ती सकाळी  त्याच्या बायकोसाठी व्यवस्थित  जावू देईल का?   नाही. सकाळी आम्ही लवकरच निघालो, पण घरी येण्यासारख काही नव्हतंच!

 तरी आलास!  शर्वरीचा कंठ दाटून आला, दुःख हातातून काही निसटून जायचं नसतं, जे आपलं नसतं ते गेल्याच दुःख नसतं, पण विश्वासघाताच दुःख !आणि आपल्या च जवळील त्याच्यात सहभागी असल्याच दुःख जिव्हारी लागत! 

गुन्हा केलेला माणूस त्या  जागेवर जावून काही राहिलंय काही सापडतंय का शोधतो!  

तरी येवून एक महिना का राहिलास तेही सांग? निसर्गाचा प्रकोप हा ही तूमच्या कटकारस्थानाचा एक भाग होता की ?तूम्ही त्याचा गैरफायदा घेतलात? 

सिस्टर, सिनीयर सिस्टर ही सुद्धा आमचीच होती. आम्हाला दिवसभराच धावतं वर्णन, बातम्या मिळत, 

हेर लावले होतेस? माझ्या मागे?

 मी नाही पण एक बाई आपल्याला मिळवण्यासाठी  आपला सारा अधिकार लावते, तेव्हा त्या माणसाला इतर कसला विचार करायची गरज ही नसते. 

आणि एखादी आपला सर्व विश्वास  ठेवते तेव्हा? तरीही तिने तूला एक महीना माझ्याबरोबर राहू दिलं कारण तू परत बायकोचा होतोस का? तिच्यात अजून तूला कुठे interest आहे की नाही, अजून तू तिच्या अंगाला हात लावतो की नाही हे पहायचं होतं तिला! 

नाही कारण आम्ही एकत्र येण्याआधी तिने मला काही अटी घातल्या  त्यात परत मी तुझ्यात, मुलीत गुंतायचं नाही  हे ठरवूनच एकत्र आलो. 

मग कशासाठी आलास? माझ्या पैशात जेवलास त्याचा चेक परत करायला आलास?  ते तर 10 मिनिटांच काम होतं, 

आमच्या विशेषतः  मेधनाच्या प्लॅन मध्ये डाँ.नव्हता,नेहमी प्रमाणे तू आणी नर्स बस मध्ये आडकलेला आहातं  असं वाटलं,  नर्सला  मदत करणारा मुलगाही आमच्यात  नव्हता. दोन्ही पुरूष कोण त्यांनाही आपल्यात सामील कसं करायचं होत. ह्याचे डावपेच आखण्यासाठी तूम्ही हे केलंत!

डॉ चं लग्न  जमेपर्यत !ती डाँ. मेघनाची मैत्रीण आहे. सर्व जोड्या आहेत मेडिकल क्षेत्रांतल्या  पण तूझ्या नविन जोडीत माझ्याच  करीयर मधल्या सर्व लोकांना तू आपलं केलसं.  

 एव्हाना रात्रीचे तीन वाजले होते शर्वरी झोपायला गेली. तिने पायलला जवळ घेतलं... 

सकाळी पायलला बेबीसिटर  मध्ये ठेवून  Hospitalला निघून गेली. .....

वर्षा पाटील. ©️®️




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4