पाऊस भाग:६
अंहं , पायल शर्वरी उतरली.
नंतर बोलण्यासारखं काही राहील नाही. दोघही बाहेरचा कल्लोळ पहात होते, गाडी मुंगीच्या पावलने पुढे सरकत होती, हळू हळू अंधारलेल्या वातावरणात एक गांभीर्याची गडद काळी छटा दाटून आली. आता रस्त्यावरचे पाण्याचे लोट पार करून गाडी पूढे सरकू शकेल की नाही ह्याची चिंता वाटू लागली
,रस्त्यावर पोलीस मदतनीस मार्गदर्शन करताना दिसू लागले, आणि सत्य परिस्थितीचे दर्शन घडू लागले, पोलिस हवालदाराने खिडकीतून डॉ .ला सांगितले साहेब जिथंले डिस्टन्स जवळच असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ? डॉ. ने विचारले ? पूढे गाड्या सरकत नाहीत ,म्हणजे पूढे पाणी भरलंय आणि त्या गाड्या जर मागे वळवायला सुरुवात केली तर दोन्ही रस्ते traffic ने फूल होतील, त्या बाजूने जवळ जवळ गाड्या येणं बंद झालेलं आहे, तूम्ही हिशोब करा किती मिनिटांचा रस्ता पार करायला किती वेळ लागला, शर्वरीने तोच हिशोब केला, 5 वजता तिने लँब सोडली ,तेवढ्या गदारोळातून पाण्यातून गेट पर्यत चालत येताना तिचा 1/2 तास गेला. नेहमीचा 20 मिनटांचा रस्ता पार करायला 3 1/2 तास लागले होते, पुढील40मि. रस्ता पार करण्यासाठी 6-7तास म्हणजे रात्रीचे 2-3, वाजणार! विचाराने शर्वरीला रडू कोसळले, तितक्यात हवालदाराने डॉ. ला सांगितले डिवायडरवर obstacles लावलेले नाहीत तिथून गाडीला युटर्न घ्या, डॉक्टरला पण तेच योग्य वाटलं त्याने शर्वरीला sorry madam we don't have any choice we can changed our route .शर्वरीचा त्याने होकार गृहीत धरला .व डिवायडरवरून गाडी वळवली, जातांना तीन तास लागले तरी परत येताना निम्मा वेळ लागला, 10:30 वाजून गेले होते. गाडी Hospital च्या आवारात पोहचली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा