पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्नाळा ट्रीप:-

सकाळी 8:30 वाजता घरातून मी  माथेरान साठी निघाले.जरा उशीरच झाला,पण संध्याकाळी परतीचा प्रवास करून रात्री 10, -11वाजता  घरी पोहचले तरी चालेल.ह्या विचारात सव्वा दहा वाजता पनवेलला पोहचले. मी 6सिटर कडे धाव घेतली.चौकफाट्याहून शाॅर्टकट्स वगैरे घेवून कर्जतला जायचे. पण रिक्षावाल्यांनी असे काही शाॅर्टकट्स नाहीत सांगितलं, मग मी माझा मोर्चा रेल्वेस्टेशन कडे वळवला.टिकीट खिडकीत चौकशी करूनही त्याने मला कल्याण मार्गे तिकीट दिले, एवढा वळसा घालुन जायचे म्हणजे, मी स्टेशनमास्तरकडे चौकशी केल्यावर पूणा डायरेक्ट संध्याकाळी साडेचारची आहे सांगितले,माझे तिकीट कॅन्सल करून द्या सांगितले ,पण त्याने नकार दिला.रिक्षेने मी पनवेल बस स्टॅण्डवर आले, तिथे एक तास थांबून 12:30ची कर्जत बस पकडली. शेजारी दररोज प्रवास करणारा काॅलेजचा मुलगा होता, त्याला कर्जत नेरळ शटल लगेच असते का विचारली. आणि माझ्या वेळेचा ताळमेळ चुकणार हे लक्षात आलं,माथेरानला भोज्जा करून परतावं लागणार हे समजलं, त्या मुलाला कर्नाळाला जायचं असेल तर कुठे उतरायचं, विचारलं आला त्या स्टाॅपलाच उतरा म्हणाला, पण मी दरवाज्यात पोहचेपर्यंत गाडी सुरू झाली, पुढच्या...

फेरफटका

भटकंती हां प्रकार लहानपणी ,ऐन तारुण्यात असतोच पण संसाराच्या डबघड्यातून उसंत मिळाली की चाळीशी नंतर  माणुस परत भटकंतीला सुरूवात करतो.तसेच मीही सुरूवात करायचे ठरवले.३१डिसेंबरचे औचीत्य साधुन मी मुलीला हाॅस्टेलला भेटायला गेली १जानेवारीला माझा वाढदिवसा निमित्ताने महाबळेश्वरला जायचे ठरविले.आम्ही कॅब बुक केली.ऐन वेळी ठरलेल्या पेमेंट पेक्षा एक हजार जास्त मागितले. आणि आमची कॅब कॅन्सल झाली.व.ट्रीपही कॅन्सल झाली.पण मी हट्टाने जायचेच ठरविले. आम्ही स्वारगेट हून सातारा बस पकडली.रात्रीचा झोपून प्रवास करून १:३० वाजता सातार्याला पोहचलो ,पण नुकतीच महाबळेश्वर बस गेली होती व दुसरं कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते.मोबाईल आणि पाॅवर बॅंक चार्ज करायला स्टेशन मास्तर कडून अनुमती घेवून तीथल्या प्लगवर जोडले.थोडी थंडी वाजत होती म्हणून दोन चहा घेवून प्यालो व भटक्या कुत्र्यांसाठी बिस्कीट पुडा घेतला. चार वाजता कॅब आली आणि आम्ही परत १तास प्रवास करून महाबळेश्वरला पोहचलो. एक माणसाने आम्हाला तुम्हाला रूम दाखवतो चला म्हटलं व त्यांच्या पाठोपाठ चालत आम्ही गेलो.रूम नीटनीटकी पाॅश होती. वाॅश घेवून थोडावेळ आराम करून थंड पाण्यात अं...