लाँकडाउन
लाँकडाउन किती दिवस चालणार? काम रेंगाळलीत, कित्येक गोष्टी ह्या अनाकलनीय, किंवा समजण्यास कठीण असतात. सामान्य माणसांना त्याची गंभीरता जाणवत नाही. कोव्हीड 19, हा वायरस संसर्गाने पसरतो, त्याचा संसर्ग हा संक्रमित झालेल्या माणसाच्या स्पर्शाने होतो. संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त दूर रहाणे गरजेच आहे. टाईमपास म्हणून गप्पा मारायला शेजारच्या घरी जावू नका ते तुमच्या फायद्याचे नाही. कामा शिवाय, बाहेर पडू नका, पोलिस नर्स, डाँ, ह्यांना सहकार्य करा. सीमा सील करून जास्तीत जास्त संसर्ग रोखता येईल. खूप कठोर कारवाई सहज देश घेवू शकत नाही .नाहीतर चीन मध्ये फैलाव सुरू होताच आपण विमान सेवा बंद पाडून त्याच संक्रमण रोखू शकलो असतो. देशाला जागतिक पातळीवर असे निर्णय लगेच घेता येत नाहीत. लाँकडाउन हा निर्णय कधीपर्यंत? खर तर कोवीड 19 आटोक्यात येईपर्यंत ..... सरकार कदाचित हा निर्णय कसा ,केव्हा घेईल. ह्या पेक्षा आपल्या शेजारील राष्टांनी त्यावर कशी मात केली. हे पाहणे जरूरीचे आहे. चीनमध्ये तो प्रथम हुआन ़शहरातील मच्छीमार्केट मधून सुरू झाला. पण त्याच देशातील बिंजीग शांघाय, शहरात...