पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रंगाची उधळण

इमेज
मैत्रीला कुणाच्या धाकाची झालर नसावी,  मैत्रीला प्रेमाची किनार असावी,  पण ती  प्रेमा पेक्षा श्रेष़्ठ असावी,  मैत्रीत फसवणुकीला जागा नसावी,  मैत्रीत, निर्मळता,सहनशीलता सहाय्यता,  संवेदनशीलता, मोकळेपणा, ह्या  गुणांच्या रंगाची उधळण असावी,  धुलीवंदनाच्या शुभेच्छा 🌹🌹 वर्षा प्र पाटील.  लोणी काळभोर

"जख्म"

हमने भी जख्म खाए है उनके नाचीज हरकतोंसे हम  भी बेवक्त शिकार हुए है उनके तरकिब भरे कारनामोंसे इसलिए ...  हम भी बनाते चले है कारवाँ मंझिंल तर पहूँचने के लिए वर्षा प्र पाटील.  लोनी, कारभोर

रस्ता

इमेज
 तू ज्या रस्त्यावर नाहीस,  त्या रस्त्यावर मी ढुंकूनही पहात नाही...  भले तो मार्ग फुलांनी  अंथरलेला असो की ती  वाट स्वर्गाची असो.  वर्षा प्र पाटील ©®  उरण. 

हाव

हाव : आपल्याला  एकट्याला सर्वच काही हवं असतं, म्हणजे बघा,! आपल्याकडे भरभरून सर्व  असेल आणि तरीही एखादी अनमोल वस्तु  अथक प्रयत्न करूनही मिळत नसेल, आणि ती एखाद्या सामान्य माणसाकडे असेल, तर आपल्या मनात असुया निर्माण होते,  मला न मिळता त्याला कशी मिळाली, ? "ती," इर्ष्या असते, आपल्यापेक्षा दुसर्याला जास्त मिळू नये, / फक्त आपल्यालाच मिळावं .आपलं मन का ?तृप्त होत नाही. का? आपण इतकं अभिलाषी होतो.  कोरोना सुरू कोरोना सुरू झाल्यापासून मला माझ्या वडिलांनी लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सारखी आठवते, एकदा एका गरीब शेतकर्याला देव प्रसन्न झाला, माग हवे ते म्हणाला  त्याने मी गरीब शेतकरी आहे तेव्हा मला जमिन द्या म्हणाला, देवाने त्याला उद्या डोंगराच्या पायथ्याशी सुर्याेदयापासून सूर्यास्ता पर्यत जेवढी जमिन व्यापशील तेवढी तूझी होईल असा वर दिला, शेतकरी खूष होवून रात्रीच  डोंगर पायथ्याशी जावून बसला, पहाटे तो चालू लागला, नंतर धावू लागला दूपारी सुर्य माथ्यावर तळपू लागला त्याला चटके लागू लागले तहान भूक लागली, पण जमिन जास्त हवी म्हणून तो थांबला  नाही  सुर्यास्ता  पर...

झोप

शरीर थकले की शांत झोप लागते,  मन थकले की झोप उडते.     उरण,  नवी मुंबई  

शेजार भाग ४

इमेज
 कामवाली आधुनिक यंत्र सामुग्री वापरत नाही. ती तशीच पडून आहेत, आम्हाला ती वापरता येत नाहीत, कामवालीला ही ती वापरायला जमत नाहीत,  आम्हा दोघांना काय काम असणार ४ चपात्या भाजी, पण आताशा मला त्या करायला होत नाही, काकी उद्गारल्या, आपल्याशी बोलायला कुणीतरी मिळाल्याचा दोघांच्या चेहर्यावर आंनद दिसत होता, काही काही कामासाठी सोसायटीची जूना माणसं मदत करतात, जसं की बँकेचं काम, कधी काही डाँ, कडील औषधे आणून देण्याचं काम मुलींनी आधुनिक सर्व सुखसोयी करून दिल्यात पण वयपरत्वे त्या नीट करायला जमत नाहीत, काका उद्गारले, अर्पणा ने मनाशीच काही खूणगाठ बांधली व दोघांचा निरोप घेवून घरी आली, तिने संध्याकाळी सर्व प्रथम आपल्या मुलांची ओळख आपल्या नविन आजी आजोबांशी करून दिली. त्यांनतर रात्री आपल्या नवर्याला आपल्याला लाभलेले शेजारी दाखवून त्यांच्याशीही ओळख करून दिली. दोन्ही मुली 👭रात्री विडीओ काँल करत, त्याऐवजी आजी आजोबांना विडीओ काँल कसा करायचा ते शिकवले, आपला पूर्ण परिवार दाखवून स्वताच्या परिवाराची ओळख करून दिली,आम्ही आजी आजोबांची काळजी घेण्यास आहोत तरी तुम्ही निश्चिंत रहा सांगितले. कामवाली सकाळच्या वेळेस य...

भाग:३ शेजार

इमेज
सकाळची काम आटपून  अपर्णा  चहाचा कप घेवून वर्तमान पत्र वाचत बसली, आणि अचानक तिच्या मनात कालचा विचार डोकावून गेला. तशी ती लगबगीने उठली, आणि गॅसवर आधण ठेवलं , डब्यातून रवा शोधून काढला, साजूक तुपात खरपूस भाजून काढला त्यात, दूध उकळवून ओतले, वेलची ची बारीक पूड ,चारोळी, काजू, बदाम, किशमिस, जायफळ टाकले, फळातील दोन केळी कुस्करून त्यात टाकली, रवा शिजलाय का पाहून, त्यात साखर घालून बाजूने साजूक तूप सोडले व ़झाकण लावून एक दणाणून वाफ आणली, फ्रिजमध्ये फूल ,फळ ,काढली देवाची पूजा केली. फूल वाहीली, फळांचा, शिर्याचा नैवेद्य दाखवला. नैवेद्याचा शिरा नविन डबा घासून स्वच्छ पुसुन त्यात भरला, चार प्रकारची फळ पिशवीत भरली, पानांत गुंडाळलेले दोन गजर्यापैकी एक गजरा स्वताच्या डोक्यात माळला दूसरा पिशवीत टाकला, नी बाजारात जाण्याइतपत नवी साडी नेसून घराची चावी घेवून लँच लावले, व समोरच्या फ्लॅटची बेल दाबली, खूप वेळाने ८५-९० कडे झुकलेल्या गृहस्थाने दार उघडले, व त्रासिक नजरेने  पाहून विचारले काय आहे? त्यांच्या प्रश्नाने अपर्णा ला आपण उगाचच शहाणपणा केला असं झालं, ती क्षणभर थांबून म्हणाली , मी अर्पणा तूमच...