पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्तिक

 मला अस्तिक आणि पापभिरू  माणसं आवडतात, कारण पाप पुण्यावर  विश्वास ठेवून, ते पाप करावयास घाबरतात, त्या मूळे त्यांच्या हातून पाप  कमी होवून पूण्यच जास्त होतात. पण काही आपण अस्तिक आहोत  दाखवून श्रींमतीचा देखावा करण्यासाठी,  दूसर्याला कमीपणा आणण्यासाठी, शानशोैकी करण्यासाठी,  मोठ मोठे संभारभ ,पूजा अर्चा करतात.  काही आपल्या गुणांनी  अमाप संपत्ती मिळवतात . व ती आयुष्याची शिदोरी  दानधर्म करून मनशांती  व समाधान मिळवतात. वर्षा प्र पाटील. ©® उरण, नवी मुंबई

मनाचे कांगोरे

 केव्हा केव्हा, आपल्याच माणसाच्या अस्तित्वाची आपण  दखल घेत नाही, पुर्ण दुर्लक्षित करतो, जाणीवपूर्वक!  पण तो जाताच, ते रित पण खायला उठतं,  जसं की रस्त्याच्या मधोमध असलेलं,  भलमोठ वडाच 🌳झाड,! जाता येता त्याच्या फांद्या सतत  आपल्याला टोचत असतात, त्याची मूळ🌱 स्पीड ब्रेकर सारखी  आडवी येत असतात, त्याची सतत आपल्याला अडचण वाटते, पण जेव्हा ते झाड 🌳 तोडलं जात, तेव्हा तो रस्ता भकास, उजाड, रखरखीत, होतो, त्यांनी दिलेल्या सावलीची, वार्याच्या झुळूकीची, जाणीव अनाहूत पणे मनाला होते, मन त्या शितल, शांत सावलीची आठवण काढून दुखावत, बावरत,मनाला आपराध्यासारखं वाटतं ज्याच अस्तित्वच आपल्याला नको असतं, ते दुरावल्याचं दु:ख कशाला?  पण हे ंंमनाचे कांगोरे आहेत, ते उलगडत नाहीत. एखाद्या निळ्याशार डोहातील पाण्यासारखे खोल खोल, वरती कितीही उजेड असला तरी आत गुडूप अंधार काळोख!  वर्षा प्र पाटील. ©® नवी मुंबई, उरण

पालेभाजी

  पालक, मुळा ,मेथी  आले  मोठ्या थाटात,   बसले ऐटीत ताटात,  चिरताना कांदा, नी  मिरचीचे तुकडे, पाहून  हसले हळूच गालात !  चढली कढई शेगडीवर ओतले तेल कढईत सरली मिरची आत चरकन वाजला कांदा  कानात!  जिर, मिर, हळद, हिंगाने मारल्या  उड्या भराभर ! पाण्याच्या वाडग्यात  पदर सावरत ,   हसत खेळत ,  हिंदकळले सारे!  स्वयंपाकाच्या  हतातली सुरी पाहून सगळे बसले  धाब्यावर!   चरचर चालली सूरी ताई  रड रड रडली ,पालक बाई  खोबरे, मीठ,, सर्वाना घेवून गडबडा लोळले, कढईभर!  ताटातील भाकरीवर  जावून पडले!   कढईतील भाजी अशी झाली, संपन्न खाणार्यानी दिली तृप्तीची ढेकर!  वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

पूर्नजन्म भाग १२

इमेज
 पुर्नजन्म भाग ११ पासून पूढे ् ज्या गावांनी तिचा भाउ आणि लग्नाला आलेला पाहुणा म्हणजे नवरा तिच्या पासून हिरावला होता, ती सासरच्या माणसाबरोबर आपलं कायमचं माहेर टाकून निघून गेली. कारण भाऊसाहेबांचा वंशज तिच्या गर्भात वाढत होता, व त्याचा तिला नीट सांभाळ करायचा होता. त्यानंतर ती आपल्या मुलाला घेवून  रमणच्या लग्नाला आली. मधला काळ माहेर तिच्यासाठी नव्हतच.  तिच्या तिन्ही भावांना अटक झाली. पण वडिलांच्या ओळखीने लगेच दुसर्या दिवशी सुटका झाली. त्याच रात्री 🌙⏰ त्यांनी गावातून पळून जायचा निर्णय घेतला, त्यांच्या डाृयव्हर ने त्यांना घेवून जाण्यास नकार दिला. पण मध्यरात्री  पेट्रोल भरून  गाडी तयार ठेवून सर्व सामान दुसर्या गाडीत भरून पाठवण्याचे  आश्वासन दिले. गाडीत तीन भावांचे परिवार व आई वडील होते, गाडी दुसर्या राज्यात पोहचण्याऐवजी दरीत कोसळली, एवढे मोठे पातक करून मनावर दडपण असताना, गाडी चालवताना गाडीवरील ताबा सुटला, म्हणून म्हटलं नियती तिला हवं तसंच करते, आमचे सर्व वैरी एकाच दिवशी  गेले. त्या घरातील सर्व सामान जसेच तसंच राहीलं कुणीही त्या हवेली कडे फिरकत नाही. कुणी चोर...

पूर्नजन्म भाग ११

इमेज
  पूर्नजन्म भाग १० वरून पूढे चालू दोघे तयार होवून निघत होते इतक्यात.....  संध्याकाळ झाली, पूजेचा मुहूर्त निघून गेला,  तरी दोघेही अजून आले नव्हते कुणाला पहायला पूढे पाठवायची सोय नव्हती. काय करावे कळेना एवढ्यात भाऊसाहेबांनी पुढाकार घेवून जयंताच्या बाबांना म्हटले, मी ़जावून पाहून येतो, का? एवढा उशीर झाला,  खरं तर त्यांना कालच्या आपल्या चिडखोरपणाची लाज वाटत होती, तशी त्यांनी जयतांच्या बाबांची माफीही मागितली होती. बरोबर दोन नोकर व डा्यव्हर घेवून ते इनामदाराच्या घरी रवाना झाले,  त्यांच्या घरी पोहचताच, त्यांच तसं स्वागत करायला कुणी नव्हतं, पण नोकरने छोटे मालक आहेत का? म्हणून आवाज दिला, बाहेर नंदीनीचा मोठा भाउ आला, नमस्कार करून भाऊसाहेब म्हणाले, नवदाम्पंत्य अजून घरी आले नाहीत, पूजेसाठी सर्वजण खोंळबले आहेत, त्यावर आधी आपण पाहुणचार घ्या मग सावकाश बोलू आपण, असे विक्षिप्तपणाने नंदीनीचा भाउ म्हणाला, तरीही आवाजावर नियंत्रण राखत भाऊसाहेब म्हणाले, आम्हाला वेळ होतोय, बोलवा त्यांना पटकन, तेवढ्यात त्यांच्या घरातील कामवाली ४ ग्लास सरबत घेवून आली, भाऊसाहब  व डा्यव्हर ने ते...

पूर्नजन्म भाग १०

इमेज
पूर्नजन्म भाग ९ वरून सुरू तिचं नाव नंदीनी होतं  ती भावांचीअतिशय लाडकी होती. अतिशय लाडात पण कडक वातावरणात वाढलेली, त्यांच्या बहिणीने खरतर तिन्ही भावांचा विश्वासघात केला होता, ती त्यांच्या वंश परंपरागत विरोधक आलेल्या ,खानदानी वैर असलेल्या , घरातील मुलाच्या  प्रेमात पडली होती. तिच्या मर्जीखातर त्यांना तिचे लग्न जयंता बरोबर करून द्यावे लागले होते, पण त्यांना हेही ठावूक होते, की त्या घरात ती सुखी राहू शकत नाही.  जयंता नि नंदीनी  गाडीतून खाली उतरले, सर्वजण त्यांना ओवाळायला नी स्वागताला जमले, त्यांना ओवाळून झाल्यावर खांब सोडले (कापले,) गेले, व  त्यांनी घरात प्रवेश केला. आत गेल्यावर सर्वांचे लक्ष तिच्या पायातील पैंजणां कडे गेले, कारण गेले आठवडा भर जो आवाज खणखणत  होता , तो आवाज आज येत नव्हता तिला विचारलं गेल, पण  तिने असेच काहीतरी कारण सांगून टाळले, मग तिच्या उतरलेल्या व सुजलेल्या चेहर्यावरून विचारले, पण अपुर्या झोपे मुळे सांगितले, दोन्ही भावाने तिला खोलीत बोलावून आजची  भेट म्हणून घुंगरांचे कडे व बिंदी दिली, आणि बहिणीला रडू कोसळले,  तिने भावाला द...

पूर्नजन्म भाग ९

इमेज
पुर्नजन्म भाग ८ वरून त्या अटी अशा होत्या: पहिली अट दोघांचे, लग्न खूप ़धामधुमीत व्हायला हवे ,दुसरी अट-ज्या  दिवशी त्यांच्या बहिणीला ह्या घरात अपमानकारक वागणूक मिळेल, त्या दिवशी आम्ही हे लग्न तोडून टाकू. लग्न धामधुमीत करायचे होते कारण इतर  गावांना ते कळलं पाहीजे. की लग्न दोन वैमनस्य असलेल्या घरात होत आहे , असल्या वाह्यात "अटी", त्याही मुलींकडच्या लोकांनी घालाव्यात, हे रमण च्या आजोबांना आवडलं नाही. पण मुलगा बापा जवळ गडगडून  विनंती करू लागला की, ती लोक स्वतः हून तयार झालीत तर कशाला वाकड्यात शिरून माझ्या पसंती वर पाणी फिरवताय, आपल्या मुलाच त्या मुलीवरच प्रेम पाहून ह्यांच्याकडून मान्यता दिली.पण जर अटींना आम्ही तयार झालो नसतो तर अब्रू त्यांच्याच मुलीची जाणार होती, पण आम्ही वैमनस्य न राखता मुलाच्या सुखाकडे पाहीले. मग काय दोन्ही घरात लग्नाच्या जोरात तयारी सुरू झाल्या. जयंतान तर काही ठराविक लोंकासाठी स्वत; चित्रून सुबक पत्रिका तयार केल्या. 💛सोनेरी अक्षरात, मोरपीसाचं सौदर्य त्यावर उतरवलं होतं, मेधाला त्या पत्रिकेचे आणि चित्रातील जोडप्याचे रहस्य उलगडलं होतं, दोन्ही घरात ४ ...

पूर्नजन्म भाग ८

इमेज
पूर्नजन्म भाग :७ आजी पूढे सांगू लागली: आम्ही नाईक निंबाळकर, पण आजोबा फक्त निंबाळकर आडनाव लावत. आम्हाला चार अपत्य, १ मुलगी, ३ मुले. सर्वात मोठे रमणचे बाबा, रमण माझा सर्वात मोठा नातु त्याच्याही जन्माआगोदरची गोष्ट, निंबाळकर हे मोठ्या घराण्यचे नाव वंश परंपरेने चालत आलेले पद त्यामुळे गावात मोठा मान, दिसायला माझी चारही मुले सुंदर , मी शहरातली ह्या खेड्यात येवून पडले, घरची गरिबी,  पण श्रीमंत सासर मिळाले, चारही मुलांना प्राथमिक शिक्षण संपल्यावर वडिलांकडे शिकायला ठेवले, तेवढीच वडिलांना मदत, मुलीचे मॅट्रिक पर्यत शिक्षण होताच तिचे लग्न लावून दिले. तिचे नाव निर्मला  लाडाने तिला  आम्ही नमु  म्हणत तिच्या पाठोपाठ लगेच २ महिन्यात वसंताचे लग्न केले. म्हणजे रमण च्या बाबाचे, ३रा जयंता अतिशय सालस, गुणी त्याला चित्र रेखायचे वेड , निर्सगाची चित्र काढण्यासाठी तो समुदकाठी, डोंगरावर, देवळात, तासनतास बसत असे, माणसांचे ही चित्र तो हुबेहूब काढी. त्यानंतरचा नंदन दोंघांची खिल्लारी जोडी, जिथे जातील तिथे, एकत्र, तिघांनाही शहरात नोकर्या लागल्या, पण वडिलांची एकच अट गावचे पद जावू द्यायचे नाही. नुसत्या...

पूर्न जन्म भाग ७

इमेज
  पूर्नजन्म भाग ६ वरून पूढे सुरू,  मेधाची सासुही घाईघाईने तिच्या खोलीत गेली. तिचा ताप पाहून काही घरगुती काढे घेवून आली. तासाभराने ताप उतरून खणखणीत बरी होईल असे वाटले, पण काही फरक पडेना फक्त मेघाला गाढ झोप  लागली होती. सकाळी सासरे स्वतः डाॅक्टर कडे जावून डाँ. घेवून आले, डाँ. ने इंजेक्शन, काही औषधे 💊💉लिहून दिली. संध्याकाळ झाली तरी मेधाचा ताप उतरत नाही, म्हंटल्यावर रमणला 📞 केला, तातडीने ये, म्हणून निरोप पाठविला, रात्री, नोकरा करवी दही ,भात(आंबट भात) अंगावरून ओढून समुद्रच्या रस्त्याला फेकला., पहाटे आजे सासूने मीठ मोहरीची दृष्ट काढली. पण मेघाला आराम मिळेना, मग मात्र सासु, आजेसासुनी शितलला वेठीस धरले खरं सांगायचं तुम्ही समुद्रावर कुठे कुठे गेला होतात.  शितलने  झालेला वृतांत कथन केला. मेधा काहीही न विचारता वर्षानुवर्षे  वैर असलेल्या लोकांच्या जागेत फक्त कुतूहल म्हणून गेली होती........ सासूने भल्या पहाटे खणा, नारळाच्या ओटीसह देवीच्या देवळात जावून नवस बोलून आली. येताना गाभ्यारातील कुंकू , , विभूति आणून मेधाच्या कपाळाला लावली, औषधे चालू होतीच,   कामावरून...

पूर्नजन्म भाग:६

इमेज
र्नजन्म भाग ५ वरून चालू असाच सतत अबोला खूप दिवस चालू राहीला, तर चांगला हसता खेळता संसार उजाडेल हे शितलला समजून चुकले.  तिने  मेधाला परत आपण गावी जावून आराम करून येवूयात का? मनातील मळभ माणसात मिसळून निघून जाईल. म्हणून  विचारले. दुसर्या दिवशी मेधाने चांगली २ महिन्यांची सिक लिव टाकली. परत १ दोन महिन्यांची सामानाची बांधाबाध केली. दोघींनी आराम बसने गावी जायचा निर्णय घेतला. घुंगरूच्या आवाज बंद झाल्यापासून, रमणची डोके दुखी बंद झाली होती. अबोला खेरीज घरात त्याला काही वावगे दिसत नव्हतं. तरी नोकरी सोडायच्या नादाने तिने अशी भरमसाठ सुट्टी घेतली असावी, असा त्याने तर्क केला. कामावरील ड्रायव्हर ची सोय करून त्याने त्याच्या स्वत:च्या गाडीने तिंघींना गावी पाठवले. फालतु कारणा साठी त्याच्या जवळ सुट्ट्या नव्हत्या............  गावी सर्वाना परत तीघीच आल्याने आश्चर्य वाटले ,सासूनी खूप खोदून विचारले, पण दोघींनी काहीही कारण सांगितले नाही. मात्र सर्व घरातील काम आटपून त्या दोघी दररोज समुद्रावर फिरायला जात. एक दिवस मनाचा हिय्या करून मेधा शितलला घेवून त्या हवेलीच्या जागेत शिरली. समोर विस्तृत जागा...

पूर्नजन्म भाग ५

इमेज
 पूर्नजन्म: भाग : ४ वरून सुरू संध्याकाळी रमण आँफीस मधून घरी आला. मुलगी दार उघडायला पुढे आली. त्याने लगेच तिला उचलून घेतलं.  पण ती खाली उतरून पायाने आवाज करून  पैजण दाखवायला लागली. त्याने कौतुक करून  तो फ्रेश व्हायला गेला. यशदा घरभर  घुंगरू चा आवाज करत फिरू लागली. थोड्या वेळात रमणचे डोक दुखायला लागले. त्याला चैन पडेना तो सैरभैर होवू लागला. व औषधाची गोळी घेवून झोपायला गेला, मेधाला खर तर काही कळेना कामावर काही बिनसले तरी तो घरी राग काढत नसे.  दुसर्या दिवशी त्याच्या बाँसने फॅमिली पार्टीचे आयोजन केले होते. सकाळी मेधाला कामावरून लवकर येवून आवरून तयार रहा, आपल्याला पार्टी ला जायचे आहे सांगून गेला संध्याकाळी  नविन चांदीच्या करडींतील कुकंवाने तिने (हेअर स्टाईल )करून भांग भरला, केसात घुंगरू चं फूल घातल, आणि उत्सवात मिळालेली सुंदर बुट्टयांची सिल्क ची साडी नेसली, मुलगी व शितल तयार झाली. रमण आँफीस मधून आल्यावर लगेचच तयार होवून पार्टीला निघून गेले. खर तर मेधा आज खूपच वेगळी दिसत होती. ती कधीही केसात भांग भरत नव्हती, हेअर स्टाईल करत नव्हती जातायेता जसे यशदाचे पैंजण वा...

पूर्नजन्म भाग: ४

इमेज
 पूर्नजन्म भाग: ३ वरून पूढे चालू सामान गाडीतून उतरवून ब्लॉक मधे नेले. रमणने गाडी पार्क केली. सर्वच प्रवासाने थकले होते. यशदा गार वार्याने झोपली होती.थोडा आराम करून दोघीही संध्याकाळच्या  जेवणाच्या तयारी ला लागल्या. गप्पा करता करता शितलला मेधाने  गावच्या माडी विषयी विचारले. पण तिला तितकेसे सांगता आले नाही. ती कुणा इनामदार कुटूंबाची होती. ती लोक गावात रहात नव्हती. ती गाव सोडून गेली होती.......  मेधा दुसर्या दिवशी आँफीसला गेली, येताना सगळ्यांनी प्रेमाने दिलेल्या पैशाने यशदा साठी  पैजण घ्यायला गेली. फक्त घुंगरू चे पैजण बरेच महाग होते. पण तिला ते ़खूप च आवडले. तिने ते विकत घेतले. त्याच बरोबर एक अँन्टीक पिस असलेली कुंकवाची करंडी, व एक केसात माळण्यासाठी घुंगराचे फूल घेतले. तिने ते सर्व पँक करून  घरी आली. तिने ते उत्साहात शीतलला दाखवले, त्यावर ती म्हणाली आपण हे दादाला दाखवायच्या आधीच तिच्या पायात घालूया, म्हणजे  तिच्या पायातील घुंगरू च्या आवाजने तो लगेच ओळखेल. तिने ते मेधा कडून घेवून यशदाच्या पायात घातले. आवाजने यशदा खूपच खूश झाली. फ्रेश होवून मेधा खिडकीत ...

पूर्नजन्म भाग :३

इमेज
 पूर्नजन्म भाग: ३ हळूहळू घरातील पाहुणी मंडळी ज्याच्या त्याच्या घरी परतू लागली. आणि मेधाने आपण संध्याकाळी गावात फेरफटका मारून यायचे ठरवले, गावातील शांत ,अल्हादायक  वातावरणात  मन प्रसन्न करणारे होते, दोन्ही बाजूला झाडी आणि मधे गावची वळण वाट आणि अशी ही नाग मोडी वळण वाट  थेट समुद्रावर संपत होती. दोघे फिरत असताना, अचानक एक हवेली रस्त्यात लागली. ती जीर्ण झालेली असली तरी तिचे सौन्दर्य जाणवत होते. पूढे प्रशस्त जागा होती. मेघाला त्या जागेच  कुतूहल वाटलं, पण रमणने  त्या हवेली बद्दल सांगायला नकार दिला. आहे जूनी पडीक माडी त्यात काय एवढ सांगायचं करून तो विषय टाळला, व ते समुद्रावर फिरण्यास गेले, वाळूत किती वेळ त्यांनी घालवला, दिवे लागण्याची वेळ झाली , ते त्यांना कळलच नाही. दोघेही घरी घाईघाईत परतले. पण घरी ओरडा हा खावाच लागला. आईने अरे! दिवे लागणीपर्यत थांबू नकोस लवकर परत ये सांगितले होते ना?. म्हणून लाडकी दम दिला. त्यात काळजी ही होतीच.  रात्रीची जेवणे झाली. सर्व जण अंगणात  गप्पा मारण्यास जमले, मुले पत्ते खेळत होते. यशदा चीडचीड करत होती. तिला झोपावण्यास मेधा तीच...

पूर्नजन्म भाग:२

इमेज
वीच्या उत्सवाचा आदल्या दिवशी, रमण, शितल, यशदा, आणि मेधा गावी आले, गाडीतून सामान उतरवले, १ वर्षानंतर येतोय म्हटल्यावर सर्वांसाठी भेटवस्तू उत्सवाचे सामान, आणि चौघांचे सामान एवढ सगळ्या  सामानाच्या पिशव्या  शितलने खोलीत नेवून ठेवल्या.व ताई मी घरी जावून आईला भेटून परत उद्याची तयारी करायला येते. सांगून तिच्या घरी गेली.  यशदाच पाउल पहिल्यांदाच ह्या घराला लागत होते. तिची दृष्ट काढून, तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. सुनेच्या हातातून सासुने मुलगी घेतली. व सर्वजण यशदा यशदा करत सभोवताली गोळा झाले. मेधा सर्वां मोठांच्या पाया पडली. व सर्वांचे हालचाल विचारण्यात मग्न झाली. ती दिसायला खूपच सुंदर होती. पण बोलायला ही लाघवी होती. तिचं माहेरच कुटूंब  लहान  असलं तरी सासरचा गोतावळा मोठा होता. आणि उत्सवासाठी सगळेच जमले होते.  चहापाणी, जेवण, आराम करून उद्याच्या प्रसादाची(महाभोग) तयारी पूजा, होम सजावट, ह्यात सारी रात्र गेली. पहाटे उठून सडा, रांगोळी होमाची तयारी करून , पूजेला अर्थात रमण व मेधा नवीन जोडपं बसले. त्यानंतर होम हवन गाव जेवणावळ त्यांच आगत, स्वागत, तीर्थ प्रसाद ह्यात सा...

पूर्नजन्म भाग १

इमेज
पूर्नजन्म :भाग १ रमण नी मेधा नी आपल्या मुलीच नाव यशदा ठेवलं, नाव जसं छान तशी मुलगीही गोंडस, हसरी, जीव लावणारी, दोघांची नोकरी आणि मुलगी लहान तिला सांभाळायला त्यांनी गावाहून एक मुलगी आणली १७-१८वर्षाची गुणी चुणचुणीत मुलगी. यशदाचा  काहीही त्रास नव्हता, गुबगुबीत होती. त्यामुळे घरभर फिरून डोळा चुकवून कुठे जायची भिती नाही. फतकल  घालून एकाच जागी बसली तर १/२तास जागेवरून हलायची  नाही, फक्त पुढ्यात खाउ, खेळणं असं काही तरी हवं, त्यामुळे कामात चुणचुणीत असलेल्या शितल, ताई साठी काही काम ठेवत नसे, सर्व कामे ती कामावरून घरी यायच्या आधीच आटपत असे, त्यामुळे ती कामावरून येवून फ्रेश होवून  मुलीला खेळवत असे. सुट्टीच्या दिवशी एक दिवस शितलचे बाबा घरी आले. चहा, जेवण आटोपल्यावर त्यांनी रमणच्या आईचा निरोप सांगितला गावच्या देवीच्या उत्सवाला मुलीला देवळात न्यायला या. त्याच्याबरोबर २ दिवस आपलीही मुलगी येईल हा त्यामागचा हेतु. निरोपाने दोघेही खूष झाले. त्या निमित्ताने ४ दिवस गावची मोकळी हवा खाता येईल, तसे लग्न झाल्यावर मेधा १ महिना गावात राहिली होती लग्न गावीच ़झालं होतं. पण रिसेप्शन मात्र मुं...

नियम व बंधन

   चोरांना नियमांच बंधन नसतं,    तसच वेशीच कुंपण ही नसतं,     नियम व कुंपण हे     सामान्यासाठी(प्रामाणिकांसाठी)     असतात. ते सांभाळूनच चाकोरीबद्ध     जीवन त्यांनी जगायच असतं,     वर्षा प्र पाटील. ©®    उरण , नवी मुंबई

जीवन घडण: भाग १,२,३,

 जीवन घडण:भाग १  आपण लहानपणी खूप लोकांत( नातेवाईक, शेजारी) मिसळलो की त्यांचे विचार ,सवयी , शिक्षण ह्याचा आपल्यावर पगडा बसून आपण चुणचुणीत होतो, मग आपल्या  हुशारीवर (अपवाद)आपल्याला उच्च शिक्षण प्राप्त होते . त्याने चांगली नोकरी, व्यवसाय मिळतो, त्यामुळे अनेक चांगले लोक आपल्या सानिध्यात येतात, शिक्षण, अनुभव ह्याने विचारात प्रगल्भता येते.    🌹🌹🌹 जीवन घडण भाग:२  ती आपल्याला चांगल्या श्रेणीचे निवडण्याची सवय लावते. मग आपण इतरांना संस्कारीत करण्याचा प्रयत्न करतो, व आपल्याला विरोधक तयार होतात, आपण तर चांगलेच विचार पूढे न्यायचा प्रयत्न करत असतो, मग विरोध का? तर वैचारिक दरी, भेद, पातळी, या मुळे आपण किताही चांगले विचार मांडले तरी त्या विचाराला विरोध करणारी / ते विचार न समजू शकणारा एक सामान्य सामाजिक स्तर असतो. 🌹🌹🌹 जडण घडण भाग:३ दोघात एक सूक्ष्म वैचारिक रेख तयार होते. विरोधाला कटाळून तुम्ही तुमचे मत /भाष्य, करणे टाळता,विरोध मावळतो,तूमचे विचार आतल्या आत कोंडले जातात,जिवाची तगमग हेाते. चांगले विचार संस्कार लोप पावायला लागतात,हे सहन न होवून तूम्ही धारदार लेखणी उच...

काजवा

इमेज
 काजवा होवून प्रकाशताना थंड रहावं लागत,  पणती म्हणून जळताना, तप्त व्हावं लागतं, नि पतंग होवून जगताना जाळून घ्यावं लागतं,  चकोर म्हणून जगताना प्यास रहावं लागतं निर्सगाचे नियम तोडताना,  त्याच्या परिणामांना ही सामोर  जाव लागतं..... 

कंपनी भाग १२

इमेज
कंपनी भाग ११ वरून सुरू गावात पद जावून ज्याच्याकडे जास्त पैसा, त्याकडे वर्चस्व आले होते, मोठ्या मालकांचे वर्चस्व जावून सर्वांचे हक्क समान झाले होते.  भिवाच्या वस्तीवर आता वेगळेच वातावरण होते, त्यांच्या झोपड्या पाडून पक्की घरे झाली होती, त्याची मुले शाळेत जावू लागली होती. गावठी दारू जावून इंग्लिश दारू आली  होती, कामाने/कष्टाने, कमावलेली शरीर दारूत झिंगत होती. प्रत्येकाकडे दोन,/चार चाकी गाड्या आल्या होत्या. पण आता धुरळा न उडता त्या सुसाट डांबरी रस्त्यावर पळत होत्या. पैसा व चैनीच्या वस्तू सहज मिळत होत्या, तरूणांचे लग्नाच बार उडत होते. भिवाच्या मुलाला नोकरी व कंत्राट दोन्ही मिळाले होते, त्यानेही आपल्या लग्नाचा बार जोरा शोहरात उडवून दिला होता. त्याच्याही घरी इंग्लिश बाटल्या रित्या होत होत्या. भिवा मात्र ह्या सर्वांपसून अलिप्त रहात होता.     भिवा रोज वाड्यावर मळ्यात पाणी सोडायला जात होता. भिवा ओटीवर बसून आई साहेबांना गावच्या  घडामोडी सांगत होता. आईसाहेब हातात माळ घेवून 'त्या ' दारात बसून ऐकत होत्या, भिवाला वेळ मिळताच तो धाकट्या मालकीणीला पाठीवर बसवून घोडा घोडा खेळ...

कंपनी भाग ११

इमेज
कंपनी भाग १० वरून चालू  वहिनी साहोबांचा धाकटा मुलगा फक्त उच्च शिक्षित नव्हता तर त्या कडे चांगली  नोकरी व अनुभव होता, चांगल्या टेक्निकल लोकांचा स्टाफ त्याच्या हाताखाली काम करत होता, वेळेला त्याला त्यांचा उपयोग  करता येणार होता, त्या शिवाय त्याच्या कामावरच्या कंपनीत , खूप सारे मोठे कंत्राटदार येत होते, त्यांच्याशी त्याची चांगली ओळख होती, ती ओळख त्याला स्वत:च्या व्यवसायात उपयोगी येणार होती टेंडर उघडण्याचा दिवस आला, भिवाच्या मुलाला छोटे मोठे .कंत्राट मिळाले होते,पण हाय रे दुदैर्व! कोटीचे टेंडर धाकट्या मुलाला मिळाले नव्हते. शेजारच्या गावातील अशाच एका उच्च शिक्षितानी ते मिळवले होते, खूप सारे दबाव आणले गेले, बाचाबाची झाली पण पाटलापेक्षा कमी टेंडर भरून ते मिळवले गेले, पाटलाच्या टेंडर मध्ये काही त्रुटी होत्या, एक तर त्यांचे दाखले, पेपर, खरे तर मुंबई च्या पत्यावर होते, तेथे उभे राहून देखरेख करण्यासाठी असणाऱ्या वहिनीसाहेब ह्या घरदांज होत्या त्यामुळे त्या स्वत: कंपनीत जाणे शक्य नव्हते, पाटील तातडीने पाटीलकीचा राजीनामा देणे शक्य नव्हते,  धाकट्या मालकाचे पेपर गावच्या पत्यावर करणे...

कंपनी भाग १०

इमेज
कंपनी: भाग ९ वरून पूढे चालू: बाहेरून फिरून आल्यावर धाकट्या भावाने आईसाहेबाशी व मोठ्या भावाशी सल्लामसलत करून काही निर्णय घेतले. दोघही धाकट्या ंंमुलाच्या विचाराशी सहमत नव्हते. पण तरीही, त्यांनी त्याच्या इच्छेसाठी तयार झाले. विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक सर्व टेंडर पेपर तयार केले. पण कंत्राट कुणाच्या नावावर घ्यावे? हे प्रश्न चिन्ह होते. वडिल नुकतेच वारले होते, व गाव तसा मागासलेलाच होता. आई साहेबांच्या नावावर घेता येत नव्हते. वडिल भाउ पाटील होता. म्हणजे सरकारी माणूस व वहिनी सहेब पाटलीन,  तेव्हा त्यांच्याही नावे घेवू शकत नव्हते. जावई चे नाव नोकरी मिळण्याच्या यादीत होते.(जावयाला दिली नाही तर मुलीला) त्यामुळे ताईसाहेबांचे नावही रद्द झाले होते. स्वत: व मुल व पत्नी हे कित्येक वर्ष मुंबईत रहात होते. भिवाचा ंंमुलगा स्वत: नोकरीच्या यादीत होता. व तो स्वत:साठी छोटी मोठी कंत्राट भावाच्या नावे घेवू इच्छित होता. मग  टेंडर पेपर कुणाच्या नावे सादर करणार? अचानक त्याला  भावाची १० वर्षाची लहान मुलगी आठवली, मुंबईहून येताना त्याने तिच्यासाठी छानसा फ्राँक आणला होता.पण ती वयाने छोटी होती. त...

कंपनी भाग ९

इमेज
भाग ८ वरून पूढे चालू: आई साहेबांचे बोलणं पूढे तसचं चालू होत..  वाडा,! वाडा जवळील , मालवा, त्या जागेतील फळाफूलांनी डवरलेली 🌲झाडे🌲🌳🌴 त्याचं उत्पादन ,आईसाहेब जिंवत असेपर्यत तसचं वाड्यातील खर्चासाठी वापरले जाईल, पैसा, भात नाही. म्हणून वाड्यावरुन कोणताही सण बंद होणार नाही. मी नसल्यावर  सर्वच्या सर्व तिघांत वाटून घ्यावे किंवा अशीच एकत्र पध्दत चालू ठेवावी. एकही नोकर माणूस वाड्यातून काढला जाणार नाही. व ते स्वताहून जाणारं असतील तर त्यांचा मोबदला देवून त्यांची सन्मानाने रवानगी करावी. हे कधीना कधी करावचं लागणार होतं, त्यातच शहाणपण होतं, पण त्याला कंपनी निमित्त ंंमात्र झाली. ही वाटणी आक्षेपार्ह वाटत नसेल, तर आपण कागदपत्रे ही अशीच करूयात. आई साहेबांचे बोलणं थांबले त्याचा आवाज घोगरा झाला. डोळे पाणावले, आबासाहेबाच्यां मागे त्यांनी खूप खंबीरपणे, धीराने निर्णय घेतला, होता. त्यांची आज्ञाधारक मुले त्यांची चूकही सांगणार नाहीत किंवा हरकत ही घेणार नाहीत. हा निर्णय घेताना त्यांना फक्त एक आबासाहेबाच्यां डाव्या हाताने मदत केली. होती. त्यांनी फक्त भिवाची मदत घेतली होती. कारण गावात जे चाललं होत...

कंपनी भाग ८

इमेज
भाग ७ वरून पूढे चालू वरंवार   बैठकीच्या बैठकी वाड्यावर झडत होत्या. अनेक मतलबी, कारस्थानी निर्णय घेतले जात होते. घोडे उधळल्या सारखे अनेक जण बे मतलब पळत होते. गावात धूळीचे लोट उडवत सरकारी अधिकारांच्या गाड्या येत होत्या, वातावरण उत्साहाचे असलं तरी लोकांना ठावूक होतं, खोट्या पैशाचं अमिष दाखवून त्यांच्या तोडचा  घास काढून घेतला जात होता. काळी आई एकदा घेतली की परत मिळणार नव्हती. त्यांची कोठार आता कायम रिती पडणार होती.आणखी भलतीच कुजबूज तरुणात चालली होती. नोकरी पेक्षा नवनविन बांधकामे  रस्ता, टाक्या , मातीच्या भरावाची कामे, मिळवून ठेकेदार बनून जास्त पैसा कमावला जावू शकतो, व ते मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ लागली होती. सर्वांच लक्ष आता बांधकाम करण्याची कामे मिळवण्याकडे लागले होते. गावात एकी राहणार नव्हती. कारण सर्वांना आपला खिसा खुळखुळ वाजणारा हवा होता.  अशीच एक  सरकारी अधिकार्याची गाडी धूळीचे लोळ उडवत गावात शिरली ,पण ती डोंगराच्या दिशेने न जाता वाड्याकडे वळली. आई साहेबांनी धाकट्या मुलाला तातडीने निरोप पाठवून बोलावून घेतले, गावात कंपनी येते हे त्यालाही...

कंपनी भाग ७

इमेज
पान ६ वरून पूढे चालू आईसाहेब भिंतीला टेकून देवघरात माळ ओढत बसल्या होत्या. माळेचे जप करत असतानाच त्या विचारात ओढल्या गेल्या, पार भूतकाळात जाउन विसावल्या.स्वत:च्या मोठ्या मुलाचं लग्न हे त्यांच्या घरातील पहिले लग्न त्यामुळे ८ दिवस लग्नाचा थाट चालू होता, गावच्या गाव लग्नात सामील झालेली. मुलगी स्वत: मालकांनी पसंद केलेली, खरोखरच १०० नंबरी सोन, रूपानं गुणांनी, सुंदर सुशील सून घराण्याला मिळाली, पण समारंभाला गाल बोट हे लागलं, ताई साहेबांना ही लग्नात एका मुलांने मागणी घातली,खरं तर  तो एक सुनियोजित डाव होता. एका सरळ साध्या शिक्षकाच्या मुलाने लग्नात एवढ धाडस दाखवावे, पण मुलीची ही तिच पसंती असावी. कडक स्वभावाचे वडील नाराज झाले, पण सुंदर सुशिक्षित सरळ साधा मुलगा आई साहेबांना ही आवडून गेला, मुलीच मन मोडून घराणं शोधायचं त्यापेक्षा तिच्या सुखात आपला आनंद, त्यांचही लग्न त्याच मांडवात करून दिलं, पाटलाला खरं तर तो अपमान खूप मनाला लागून गेला. थोड्याच दिवसांत लाडाकोडात श्रींमतीत वाढलेली मुलगी घरी परत आली. आता मात्र आईसाहेबांतील करारी स्त्री जागी झाली, त्यांनी गावकीत मिळवलेला मान असा  कुणी पायदळी तु...

कंपनी :भाग ६

इमेज
भाग ५ वरून पूढे सुरू संध्याकाळी ५ वाजता बैठक सुरू होणार होती. पण कुतूहल म्हणून जागा आडवायला म्हणून ४ वाजल्यापासून गावकरी, चावडीवाले ,वस्तीवाले लोक जमू लागले , वाड्यावर गजबज दिसू लागली . बसण्यासाठी ताडपत्री आंथरली गेली. पाण्याच्या टाक्या एका कोपर्यात उभारल्या गेल्या. पोलीस जागोजागी उभे होते. गोंधळ, मारपीट, तसेच पाटलाला संरक्षण म्हणून जागेचा ताबा घेईपर्यंत कलेक्टर कडून सोय केली गेली होती.  सर्व वरीष्ठ सदस्य खूर्चीत बसले, सरपंचाने आवेशात भाषणांला सुरूवात केली : गावात सरकारने डोंगर पोखरायला उंदीर सोडले, त्यांच्यापासून आपल्याला गाव व जमिनी वाचवायच्या आहेत , तेव्हा सर्वांनी आंदोलनास तयार रहा. सर्वांनी आवेशात होय होय म्हणून 'नारा' लावला. गावात जर जमीनी राहणार नाहीत, शेतीच राहणार नाही ,जर भातच पिकणार नाही. गुरांना चारा, पाणी नाय, डोंगर नाय, दुध नाय म्हणजे आमच्या नी जनावरांच्या तोडांतील घास काढून, आमी काय खायचं नी कसली नोकरी करायची? नी कागदाच पैक घेवून काय करायच? , नी असली नोकरी काय कामाची? आणि आमी गाववाल काय नोकरी करनार,? आमाला शेती नी गुरं राखण्यापलिकडं काय बी येत नाय, गाववाले त्वेषान...

कंपनी : भाग ५

 भाग ४ वरून पूढे  काय काम काढल? आईसाहेबांनी चिंतातूर पोराच्या चेहर्याकडे पाहून विचारले , कसं सांगाव कळत नाही? पण आज संध्याकाळी वाड्यावर तातडीची बैठक आयोजित केली आहे. देवघरातील खूर्ची वर बसत मोठा मुलगा आईसाहेबांना म्हणाला, गावात काही भानगडी? दुसर्या खूर्चीत आसनस्थ होत आईसाहेब उद्गारल्या! , नाही पण सरकारने मोठा निर्णय घेतलाय, तालुक्यातून कागद पण आलाय, लवकरात लवकर सरकारला आपली डोंगराखालची सगळी जमीन कंपनी काढायला पाहीजे . आपली एकट्याची नाही गावकीची,वाडी वरील वस्तीची सर्वच जमीन सरकार ताब्यात घेणार आहे. वाडा, सरपंचाची घर सोडून गावात वीज नाही, मध्येच एखादा खांब सोडला तर रस्त्यावर रात्री उजेड नाही. गावात, वस्तीवर , रस्त्यावर ,कंपनी बरोबर घरा घरात वीज येईल, जमीनीच्या बदल्यात पैसे, घरटी नोकरी व ज्यांची जागा जाईल त्यांना घरासाठी हवी तिथे जागा मिळेल. काळी असली म्हणून काय? झाले! काळी आई विकायची तीही कसदार, अरे भाकड गाय ही कसायाला विकत नाहीत. तीही पोसायला जड नाही तिथे कसदार जमिन विकायची? आई साहेब त्वेषाने म्हणाल्या, जागेचा खरा मालक गेला, तेव्हा जागेला आपल्याकडून सेवा करून घ्यायची नसेल, मुलग...