सहप्रवासी
सहप्रवासी :आपण प्रवास करताना नेहमीच बरे वाईट अनुभव घेत असतो. कधी आपण चुकतो कधी समोरचा, कधी अतिशय चांगला अनुभव आपल्याला येतो.कधी मनाला त्रास होईल असा. (मरोळनाका )नेल्को येथे मी बस मध्ये चढली .तिकीट काढायला सर्व जवळ असलेल्या पर्स बघितल्या. सुट्टा पैसे संपलेले फक्त 4रू कंडक्टर जवळ आला, केविलवाणे मी पैसे सुट्टे नाहीत. 500रू नोट पाहुन बस मधून खाली उतरा, 10रू साठी इतके सुटेट देवू ,मलाही सुचेना cst जवळ गरीबाला 5रू दिल्याचे आठवून मन चुटपुटल नाइलाजारस्तव उतरायला गेले, तेवढ्यात एका तरूणीने थांबा उतरू नका, करून पर्स मधून 20ची नोट काढून दिली, मी कंडक्टर कडून 10ची नोट व 4 ची चिल्लर 14 रू परत केले. 6रू अनोळख्या मुलीचे कर्ज माझ्यावर राहीले .आपण कुणालाही देतो म्हणून ती विसरूनही जाईल.पण मला मात्र कायम स्मरणात राहील. वेळ एवढा कमी होता की मी तिचे नावही विचारले नाही, लक्षात ठेवून मला ती भेटणार ही नाही.कंडक्टरला 4रू घेवून मला तिकीट देता आल असतं किंवा सहप्रवासाकडून 500 सुट्टे देता आले असते.पण ह्कंया उलट कंडक्टरला सांगूनही त्याने मला...