खंड १ला टाईम मशीन भाग:४
जेव्हा आपण घरंदाज, घरााणेशाहीी /शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या लक्षात असं येत की पूर्वी राजा पासून ते पाटील नाईक, ठाकूर/ इतर पद हे त्या माणसाच्या गुणांवर प्राप्त होत असे. हुशारी, नेतृत्व गुण , कुळ, प्रामाणिकपणा, इ. इ. आणि मग असं गणित असायचे की ९६ कुळी म्हणजे ज्याच्या ९६ कुळांची माहीती आहे/उल्लेख सापडतो असा मग ते चांगले असणारचं.पूर्वी लग्न ही अशीच घरांची माहीती, पद पाहूनच केली जात असत, त्यात बोलीभाषा, बोलण्याची, चालण्याची, वागण्याची, पद्धत, पाहीली जात असे.३६ गुण जमले तरच लग्न पार पाडत. अशा लग्नात सहसा कोणती विघ्ने येत नसत, अगदी नैसर्गिक विघ्न आली तरच! (मृत्यु वैगरे) बाकी संस्कारच असे कडक असायचे की धोपटमार्ग सोडून कुणी काही धाडस, फसवणूक करीत नसत. क्रमशः ४ वर्षा प्र पाटील. ©®