पाउस भाग :९
आज मी खरं तर लॅबमध्ये किटस् /सोल्यूशन ह्यांची लिस्ट बनवणर होते. काही नविन सोल्यूशन तयार करणार होते. काही requirements ची लिस्ट तयार करणार होते. पण मला चावी उपलब्ध झाली नाही. आजच्या कामाचे तूला extra money मिळणार होते का? डॉक्टर ने प्रतिप्रश्न केला, नसले तर नसले तरी ती कामं माझीच आहेत व ती मला पूर्ण करावीच लागतात ती मी माझ्या assistant कडे नाही देवू शकत. मग आजचा वेळ मी माझ्यासाठी कारणी लावला असता ना! तूला इथे काही problemआहे का? म्हणजे? शर्वरी चमकली. आपण ठरवून आज एकत्र आलो नसलो तरी आपली एक छान मैत्री तयार झाली असं नाही का तुला वाटत, नाही नाही मला माझा टाईम वेस्ट केलेला आवडत नाही, हे सांगताना मी हा वेळ किंवा हा दिवस नाही विसरू शकणार ह्यात मुलगी, संसार ह्याच जे टेंशन आहे. ते मला माझ्या वाटण्याचा विचार नाही करू देतं. तूम्ही आज मला जर मदत केली नसती तर आख्खी रात्र मी कुठे तरी बस मध्ये डुलक्या देत असुरक्षित घालवली असती. तू माझ्या केबिन मध्ये स्वताला सुरक्षित समजतेस? Yes !of course.पण तू on duty नाही आहेस! इथे जर काहीही तूझ्या मनाविरूद्ध घडलं तर प्रथम hospital management तूझ्या इथे उपस्थित असण्यावर प्रश्न उठवेल. आणि घडलेल्या घटना बद्दल हात वरती करेलं. तर! मग मी माझ्या जबाबदारीवर बसमधून प्रवास करायला हवा होता. मी ज्या trust ने तूमच्या कार मध्ये बसले, त्याच विश्वासाने इथेही बसले. शर्वरीला आता रडू कोसळले. आपण अजाणतेपणी ज्याने मदत केली त्याच्यावरच वेळेचा अपव्यय झाल्याचा आरोप केला. शर्वरीने डाँ ला sorry म्हटले. डॉ. ने शर्वरीला म्हटले. It's alright मी थोडा थट्टेच्या मूडमध्ये तू कसा response देतेस मी असं बोलल्यावर ते पहात होतो. जवळ जवळ पहाटेचे 4 वाजून गेले होते . इमरजन्सी services बंद पडल्या होत्या. लाईट 11-12 वाजताच गेली होती. Hospitalची light generator वर होती त्यामुळे ठराविकच दिवे चालू ठेवण्यात आले होते.भरपूर प्रकाशझोत असा नव्हताच.
क्रमशः
Varsha Patil७©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा