मागे वळून

 मी मागे  वळून  पहात नाही

मला, "मागे वळून पहायला आवडत नाही".

असे मी नेहमी म्हणत असे, 

माझ सुंदर छोटे "गाव" काळा सोबत  

कधीच मागे पडले, ..

जिथे मला कधीच परतून जाता नाही आले, 

तिथल्या "आठवणीं" मला जपता नाही आल्या

एक एक करून माझे साथी मागे पडत गेले, 

त्यांना सोडत मी शिखर चढत गेले, 

 काळ म्हणाला , "मागे वळून पहात नाही 

ह्या वर घमेंड  नको करू

शिखरावरून  खाली पहात मी भयकंपीत झाले. 

जीवन माझे सारे डळमळीत झाले, तोल सावरत 

स्वताचा, मी थोडेसे चिंतन केले, काळ म्हणाला : 

त्यावर लक्ष केंद्रित  केले, 

माझे साथी, एक एक करून चट्टान चढत होते, 

माझ्या समावेत यायला तेही  तयार होते.. .. 

पल्याड उतरंड उतरताच गाव मला कवेत घ्यायत्ला

तयार होते



वर्षा  पाटील ©️®️



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4