पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कंपनी भाग:४

इमेज
 भाग ३ वरून पूढे चालू: भिवा मागच्या पडवीत गेला...  पाटील ओसरीवर जावून आईसाहेबांना मवाळ शब्दात म्हणाले,थोडक्यात नाजूक काम आहे, देवघरात बसून बोलू . बोलताना इतका हळवा होताना आपला पोरगा पाहून आईसाहेब गहिवरल्या. धनी जावून अजून वर्षही सरले नव्हते,तेव्हा दुसरे आणखीन काय संकट आले की मुलाला देवघरातच  हितगुज करायचे आहे. घरातीलच माणसं तेव्हा देवघरच निवास जागा गप्पांसठी योग्य. न्याय अन्याय होताना देव सक्षी बरा!  भिवा मागच्या दारातून गेला फांदीला त्यानेच बांधून दिलेल्या झोपाळ्यावर मोठ्या धन्याची १० वर्षाची मुलगी पाळणा खेळत होती किती गोड होती? काहीना काही निमित्ताने मोठे मालक, आईसाहेब, वाडीवर येत त्यांच्या बरोबर ती वाडीवर येई, वाडीच्या मुलांत खेळी, व  पाय दुखतात म्हणून परत येताना तिला खांद्यावर बसवून आणायला भिवा काकाच लागे, नवसा अवसा ने लग्नानंतर १० वर्षानंतर झालेली पोर सर्वांना जीव लावी ताई सहेबांनी. दिलेला चहा पिवून भिवाने गावचा रस्ता धरला.  क्रमश: वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई)ााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााा...

कंपनी भाग:३

इमेज
त्यांच्याच वस्तीच्या आजूबाजूला भरलेल्या कणसाच्या ठिक्या  रचून ठेवलेल्या असायच्या, खळ करून सारवून जागा साफ सुथरी करून ठेवलेली असायची, हे सर्व वस्ती वरच्या बायका दरवर्षी करत, तिथेच बाकड्यावर झोडणी व्हायची,  वर्षभर पुरेल इतका भात तिथेच मोठाली जाती मांडून दळली जायची, किड लागू नये,म्हणून कडीलिंब ,निरगुंडीच्या पानांची औषधी पावडर मिसळून पोती भरली जाई.ती पोती खटार्यात भरून वाड्यापर्यंत  घेवून जायचे, भाताचा एक भाग पोती भरून पुढल्या वर्षी साठी बियांण म्हणून गावासाठी,व स्वतासाठी सांभाळून ठेवलं जाई. मग भिवा व त्याच्या वस्ती वरची माणसे, ती पोती पाठीवर घेवून पायर्या चढून नेत, नी मागल्या पडवीच्या दाराच्या दगडी जीन्याने चढून वर कोठाराचे दार तात्पुरते उघडे केले जाई, आणि वरून कोठारात धान्याची पोती रीती करत, मग कोठारात वरून आख्खा भाताची बियाणांची पोती रचत.वर्षभरासाठी कोठाराची कवाडे कडी कुलपा सकट बंद होत.  त्या अंधार खोलीला स्वयंपाक घरातून एक छोटीखानी खिडकी होती.आणि त्या खिडकीतून हवे तसे हवे  तेवढे काढले जाईल.  दुसरा भाग जे उरलं सुरलं असेल ते बाजारपेठेत नेवून व्यापारी लोकांत न...

कंपनी भाग:२

 भाग :१ वरून पूढे चालू आबासाहेबांना  जावून आता वर्ष होईल, त्यांचा भारदार आवाज, करारी नजर आणि दरारा, ह्यापुढे गावच काय? घरातले देखील घाबरत असत,  कोणतीही चूक करून त्यांच्या पूढे कोणीही जायला धजत नसे, पण न्याय निवाडा सर्वांना पटेल, असा. त्या मुळेच तर घर नी गाव एकसंघ राहिला होता, त्यामानाने आईसाहेब थोड्या मउ पण करारी! एखादी गोष्ट होता कामा नये म्हणजे नाही, पण कुणाचा काही प्रश्न असेल तर अख्ख्या गाव आईसाहेबाकडे धाव घेई. मग आईसाहेब ती बाब आबासाहेबांच्या कानावर घालत, भिवा त्यांचा विश्वासू नोकर ,काही क्लिष्ट बाबतीत, तिसरं मत हव असेल तर गोष्ट भिवाच्या कानी घातली जाई, मग तोही जीवाची पर्वा न करता हवी ती मदत करत असे., इतक्या कडक वातावरणात वाढल्या मुळे मोठे मालक पारच मायाळू, त्यांची कारभारीण मोठ्या वहिनी साहेब तितकीच किंबहूना त्याच्याहून  अधिक मायाळू, त्यामूळे अख्ख्या गावचा राबता दिवसभर वाड्यावर असे. विड्याच्या सूपारीपासून, केळीची पान, पूजेची फूल ,फळ नारळ भाजीपाला हे गावाला वाड्यातूनच मिळे.त्यामूळे वाडा सतत गजबजलेला, आबा साहेब गेले, आणि वाडा रिकामा भासू लागला,.  डोंगराच्...

कंपनी भाग १

इमेज
 भिवा दगडी पायर्या चढत वर आला. देवालयाला चढायला जश्या मोठ्या दगडी पायर्या असतात, तश्याच पायर्या ह्या वाड्याच्या होत्या, वाडा भव्य आणि देखणा होता. छान आकार देवून कापलेल्या दगडात तो बांधला होता. वाडा वडिलोपार्जित होता. वाड्यात देव माणसंच रहात होती.  भिवा त्यांचा नोकर , कष्टाने कमावलेल शरीर भारदार मिश्या, उग्र काळा चेहरा अनोळखी लोकांना, त्याला पाहून धडकीच बसे.  आबा साहेबांच्या तालमीत तो लहानाचा मोठा झाला. मोठे मालक, धाकले मालक, आई साहेब ही त्याच्या साठी देव माणसं होती. त्यांच्या प्रत्येक दुख: सुखात तो त्यांच्या बरोबर होता.  पायर्या चढून आल्यावर ओटीवर बसत, मोठे मालक आलो मी म्हणून भिवाने आवाज दिला, मालकाला भेटायचं असेल तर लांबलचक ओटीवर येवून आवाज द्यायचा, आणि जेवायचं असेल काही घेवून आला असेल तर पाठीमागच्या दारात जावून वहिनी साहेबांना सांगायचा, घरात प्रवेश निषिध्द ही सवय त्यांनी स्वतः हून लावून घेतलेली, त्याच्या आधीच्या पिढीत, ही प्रथा पूर्वपार चालत आलेली, भिवाने ती अजून तशीच जपलेली, आत ओसरीला लागून आलेल्या मोठ्या खोलीत दगडी देवूळ होतं, त्यात शिवाची स्वयंभू पिडींची स्थापना...

मैत्री

 मैत्रीला, 🌹🌹🌹 ना बोलायची👄 गरज असते, ना भेटायची 👯!  ना काही द्यायची👛 गरज असते,  ती फक्त निभवायची  असते,  सहकार्य करून...... 👍 सदिच्छा देवून........ 💐 मैत्रीच्या अस्तित्वाची  जाणीव करून देवून.... 😢 आठवून.... 🤔 निरोप पाठवून..... 😊 वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

कला

 फूलांनी डवरलेलं झाड,  आसमंत तर सुशोभित  करतातच, पण......  जिथे त्याची पुष्प पडतात ती अवनीही सुंदर बनवतात. नटवण्याची कला अवगत असणं,  महत्वाचं.....  वर्षा प्र. पाटील. ©® उरण नवी मुंबई

पिल्लू

इमेज
 रूसलेल्या,  ह्या अबोल पिल्लाला समजावयाला तू 🏃‍♀️येशील ना?  गुलाबाच्या, पाकळी सम  नाजूक गालाचा ,  🌹 पापा, तू घेशील ना?  ओंथबलेल्या डोळ्यांना,  तू हळूच पुसशील ना?  लाल 🔴लाल नाकाला, . तू हळूच ओढशील ना? कुरळ्या कुरळ्या केसांवरून अलगद हात फिरवशील ना?   मुक्या मुक्या ओठांना👄 तू बोलतं करशील ना?  चंदामामा 🌙दाखवत,  तू घास 🍛भरवशील ना?  तुझ्या ह्या, पाडसाला  हळूच कुशीत घेशील ना?  गोड 🍭गोड आवाजात  अंगाईगीत म्हणशील ना?  सांग ना? आई तू सदा माझीच रहाशील ना? . ..  वर्षा प्र. पाटील. ©® उरण नवी मुंबई

पावसाचं पाणी

पावसाचं पाणी म्हणतं......  डबक्यात साचण्यापेक्षा,  शिंपल्यात साचलेले बंर! सुर्याच्या किरणांनी डबक्याचं अस्तित्वच संपत! त्यापेक्षा शिंपल्यात पडून, मोती बनून जीवनाला अमरत्व प्राप्त होतं....  वर्षा प्र पाटील.©® उरण नवी मुंबई

शाप

 सौंदर्याला नश्वरतेचा शाप!  सुर्यचंद्राला  ग्रहणाचा शाप!  कनकेला कलीचा शाप!  गुलाबाला काट्याचा शाप!  ह्या सर्वांची दृष्ट काढून तीट लावली तर !  शापमुक्त होतील काय? 🤔 वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

संगम

 भगवान ने फूल बनाते समय बडी होशियारी से बनाया / उसने फूल को हदय जैसा  कोमल बनाया और  मन को तरोताजा करनेवाली ,  खुशबू डाल दी/ फूल देते समय ,  सोच समजकर देना/ उसमें हद्य और मन का संगम है/ कहीं! गलत जगह ना पहुँच जाए?  वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

हौसले

 फूलोंसे जख्म खाएं है/ उन्हें, थोडा अंदाज से फेंका करो, / दोस्ताें,ने भी दिल दुखाए है/ थोडे आराम से मिला करो/ कोशीशे तो अब भी अच्छी है/ हौंसले बुंलद रखो/ वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

लाव्हा

इमेज
पृथ्वीच्या गर्भातील  " लाव्हा"  कधी पाहिलाय तुम्ही?  पहा! मग समजेल  तूम्हाला,  "विध्वंसतेतही!    किती सौदर्य असते ते!  वर्षा प्र पाटील।  © ® उरण

वरई (उपवासाचा पदार्थ)

इमेज
 वरई(भगर ) :- आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री ह्या  तिन्ही दिवशींचा उपवास हा दोन्ही वेळचे जेवण न घेता करायचा असतो, त्यावेळी खूपच कमी लोक काहीही न खाता उपवास करतात, पण बहुतेक जण उपवासाला चालणारे पदार्थ खावून हे सर्व उपवास करतात, उपवास करताना पित होवू नये असे  पदार्थ खातात, त्या पैकी एक म्हणजे वरीतांदूळ, वरई, भगर ,सामो राईस, किंवा जंगली राईस वनस्पती शास्त्रीय नाव  Proso Milletअशा अनेक नावाने ओळखला जातो.ह्याचे गोड(वरईची खांडवी) व तिखट(वरई भात)असे अनेक पदार्थ करता येतात.  वरईचे खाण्याचे फायदे :- १) वरीतांदळांतील प्रथिने तयार ९ आवश्यक आम्ल असतात. त्यामुळे ते पूर्ण प्रथिन आहे.  २) वरई मध्ये मॅग्नेशियम, जस्त, तांबे, फाँस्फरसअसते, मँगेनीज ही खनीज असतात.  ३) ह्यातील लेसीथीन ह्या घटकांमुळे नर्व्हस सिस्टीम मजबूत होते.  ४) ह्यातील बी6 व बी9 विटामिन मुळे मेंदू सप्तक राहण्यास मदत होते.  ५) ह्यात फायबरचे प्रमाणही चांगले असते,व पचनात हलकी असते. त्यामुळे भूकेच शमन  होते. त्यामुळे आजारी व्यक्तीला आहार म्हणून वापर करतात. ह्यातील इनसाँल्युबल फायबर मुळ...

गुलाबाचेे फूल

इमेज
तुझे विलोभनीय सौदर्य   कमी होत की काय म्हणून......  तुझा मोहक दरवळ,  तुझ्या अस्तित्वाची खूण पटवून देतो,  आसमंतात....  त्यातच दवबिंदूना गुफंले  जणू, शिंपल्यातील मोत्याची माळ,  अशी नजाकत पाहण्यास,  मकरंदानेही आमंत्रित केले भ्रमरास..  सृष्टीलाही तुझे हे लावण्य कसे जपावे? न समजे!  तिनेही रोवले काट्याला!  मोठ्या दिमाखात!  परि ते राेषास पात्र न होता होई तीट ती गुलाबास !!!  वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सोया वेगन शुगर फ्री बर्फी

इमेज
मी आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहून परत आपल्याच हेल्दी ह्या विषयाकडे वळणार आहे. वेगन हा असा ग्रुप आहे की ज्यात अंड, मासे, मांस खात नाहीत . पण असाही एक प्रकार त्यात आहे की ज्या लोकांना दुधाची अॅलर्जी आहे. म्हणजेच लँकटोज इनटाँलरन्ट आहेत. जे दुधाचे पदार्थ खात नाहीत. किंवा जनावरांवर अत्याचार होतात ते होवू नयेत. त्यांच्या पाडसांना दूध न मिळता ते बाजारात विकले जाते. असे अन्याय होवू नयेत म्हणून दूध व दूधाचे पदार्थ व्यर्ज करतात. प्राणी प्रेमी असल्याने मी ही तसे सुरू केले होते. म्हणजे सोया मिल्की चहा पिणे वैगरे. पण शेवटी चहाच सोडून दिला, मासे अंडी बंद केले पण दही, साजूक तूप सोडता येईना, मग पूर्ण वेगन बनू शकत नाही. त्यापेक्षा त्यावर अगदी सोपा उपाय म्हणजे आपण गोधन पाळून फक्त थोडसं आपल्या पूरक दूध वापरून बाकी दूध तिच्या बछड्यांना देवू शकतो पण शहरात हे शक्य नाही . आपण भारतातील सव्वाशे कोटी जनता त्यांना दूध व दूध जन्य पदार्थ मिळवण्यासाठी २० कोटी तरी गाई म्हशी आहेत का? हा विचारही आपल्या मनाला कधी शिवत नाही. सकाळी डेअरी वाल्या कडून १ली.दूध मात्र न चुकता घरी आले पाहीजे. भैयाला दुधात भेसळ नको जाड शायीचेच...

मका

इमेज
 मका:  १)मक्यात व्हिटामिन ' ए' आणि बिटा कॅरोटीन असते. त्यामुळे दृष्टी सुधारते.  मक्यात असलेले अँन्टीआँक्सीडंट लॅसीन, आणि जैक्सेन्थिन डोळ्यातील नजर वाचवण्याचे काम करतात.  २) मक्यात मँग्निशिअम, आणि लोह (आयन )असते, त्यामुळे हाडांना मजबूती येते.ह्याव्यतिरिक्त झिंक आणि फाँस्फरसअसते. त्यामुळे हाडासंबधी रोग दूर होतात. आर्थराईटीस, आणि आँस्टियोपोरोसिस या पासून संरक्षण होते.  ३) मक्याच कणीस खाल्याने दात मजबूत होतात.  ४) मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. दमल्यासारखे वाटत असेल तर आळस येत असेल तर मका खावा उत्साह येतो.  ५) व्हिटॅमिन बी काँम्प्लेक्स पचन संस्था सुधारते.  मक्यात भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता ह्या सारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. पोट स्वच्छ राहते.  ६) रोग प्रतिकार शक्ती वाढते.  ७) मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.  ८) मक्यात वात आणि पित्त कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे मका उकडताना त्यात हळद व मीठ घालून खाल्यास फायदेशीर ठरते.  ९) मक्यात असलेल्या फाँलिक अँसिड मूळे क...

तांबडी माती भाग : ७

इमेज
  भाग: ६ वरून पूढे चालू गावोगावच्या अनेक मल्लांनी ह्या सामन्यात भाग घेतला होता. मैदानात वेगवेगळ्या आखाड्यात कुस्तीचे सामने रंगले होते, लोक सभोवताली गोळा होवून त्यांना प्रोत्साहित करत होते. वरचढ होईल त्याच्या नावाने जल्लोष करत होते.  सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत १० फेरे पार पाडले. शेवटची फेरी अटीतटीची होती. त्यात रग्या होताच. अखेर रग्याने आपला प्रतिस्पर्धी तांबड्या मातीत लोळवून. ज्या तांबड्या मातीत रग्या जन्माला, वाढला खेळला आज ती लाल माती रग्या च्या अंगभर चिकटली होती. १० हजाराच ंप्रवेश शुल्कातून ठेवलेल्या बक्षिस रग्या जिंकला होता. तालुकास्तरीय ५० हजाराच गावाच्या नावे ठेवलेल बक्षिस व फिरता चषक पाटलाला मिळाला. १० हजाराच शर्यतीच बक्षिस रग्या च्या खिल्लारी जोडीला मिळालं. अशा तर्हेने बक्षिस समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला.  खिल्लारी बैलांना व छकडीला फुलांच्या माळेने सजवून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक पाटलाच्या वाड्यात आली. पाटलीनीने रग्याला व बैलाला ओवाळले. म्हातारीने दृष्ट काढून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकला. तिच्या बोळक्यात हसू आणि डोळ्यात आसू आले. ती गर्दीत भान हरपून भूतक...

तांबडी माती भाग:६

इमेज
भाग ५ वरून पूढे चालू: सर्वत्र छावणीचे स्वरूप आले होते. थोड्या थोड्या अंतरावर तंबू ठोकण्यात आले होते. गावच्या मागच्या बाजूच्या समुद्र किनारा च्या मोकळ्या धुळीने भरलेल्या रस्त्यावर शर्यत आयोजीत केली होती. एरवी एकांतवास लाभलेल्या रस्त्यावर शर्यत बघायला अलोट गर्दी जमली होती. आपापल्या गावचे लोक छकड्यावर व हातात आपापल्या गावच्या नावाचे झेंडे घेवून नाचत होते, नारे देत होते. ही सर्व व्यवस्था करताना पाटलाला खूप मेहनत घ्यावी लागली होती. सर्व व्यवस्थेची तयारी करायला लागणारी परवानगी घ्यायला साहेबाच्या घरी(हवेली) भेट द्यावी लागली होती. पाटलाने फीत कापून शर्यत सुरू करायलाही तोच साहेब मुद्दाम बोलावले होता. त्याच्या हातून फीत कापून शर्यतीचे व कुस्तीचे उद्घाटन करण्यात आले. टाळ्या, शिटी, शीळ ह्या आवाजाने सर्व परीसर दणाणून गेला.  रग्या पांढरे शुभ्र कपडे व तांबडा (लाल )फेटा बांधून रुबाबात छकड्यावर बसला होता. पाटलांनी जवळ येवून जुजबी सूचना दिल्या. रग्याची पाठ थोपटली. वर्षभर खिल्लारी बैल 🐂🐃 रग्या चा इशार्यआवर नाचत होते. बंदूकीचे ३बार झाले. व शर्यत सुरू झाली. रग्याने बैल चुचकारले. हातातील दोर्या(वेसण) ...

तांबडी माती भाग :५

इमेज
 भाग ४ वरून पूढे चालू पाटील रग्याला म्हणाला पारावर मस्त्या करून शरीर तर  मस्त कमावलसं, दररोज काम करून ते पिळदार ही होईल. तर येत्या जत्रेत कुस्ती लढवशील? पाटील काय बोलतोय त्याचा क्षणभर अर्थ ही रग्याच्या डोक्यात गेला नाही. त्याने तोंडात टाकलेल्या घासाचा त्याला जोरदार ठसका बसला., पाटील मध्येच अरे! असा घाबरू नकोस तूला नसेल जमणार तर नाही सांग मला राग नाही येणार! पाटलाला शर्यतीचा नी कुस्तीच भारी येड पण आपल्याला असं काही पाटील विचारेल असं रग्याला वाटलं नव्हतं .  तुमचा माझ्यावर इस्वासअसेल तर  घेईन मी  कुस्तीच्या सामन्यात भाग, रग्या उतरला,  पाटलांन आपलं बोलणं सुरू ठेवलं सकाळ संध्याकाळ चरवी भर दूध, नी दोन जेवणात कोंबड्याच्या रस्याचा रतीब . हे बोलत असताना रग्यानं जेवण संपवून हात धुवून आला. पाटलांन आपल्या व्यायाम शाळेची चावी रग्याच्या हातात दिली.  व्यायाम शाळेत डोंगरावरची तांबडी मती टाकून आखाडा तयार केला गेला होता.  सकाळी चार वाजता उठणारा रग्या कामात नाहीतर व्यायाम शाळेत व्यग्र असे. चरवी भर दूध पिताना त्याला अपराध्यासारख वाटे. पण पाटलाचा विश्वास आठवून तो शांत...

तांबडी माती भाग :४

इमेज
 भाग ३ वरून पूढे चालू: म्हातारीनं कोबंड बांग द्यायच्या आत रग्याला उठवलं रग्या तोंड धुवून यायच्या आत चुलीवर आधण ठेवलं, चहा तयार करून दोन पेल्यात ओतला, म्हातारी भीत भीत बोलली, रग्या कारण नसताना तोंड वेगांळून नोकरांना, पाटलांना बोलू नको. नोकरी गावली ती सोडू नको. रग्याने म्हातारी कडं पाहून म्हातारीला  बोलला आता नाय मी  तूला  लोकांची भांडी घासायला लावाचू . तू काळजीत पडू नग. तशी म्हातारी खूष झाली. रग्याने चहा संपवला नी पाटलाच्या वाड्याचा रस्ता धरला.  संगळ्याकडे शांतता होती. एखाद्या कुत्रा कुठेतरी भुंकत होतं. रस्ता निर्मनुष्य होता. रग्या वाड्यावर पोचला. गोठ्यात बल्बचा पिवळा उजेड फाकत होता.  जून्या नोकराने नेमून दिलेल्या कामा प्रमाणे रग्यान कामाला सुरूवात केली. गाई गुरांना चारा घातला. पाण्याच्या बादल्या गुरांना पाजल्या. बादल्या, किटल्या घासल्या, आणि दूध काढायला सुरूवात केली. भरलेल्या   किटल्यांची झाकण बंद केली. दोन खोड घेवून छकड्याला जोडले.  पहिल्या दिवशी घरचा जूना नोकर ठरलेले रस़्ते दाखवायला, तसेच ठरलेली दुघदधालय दखवायला  छकडयात बसला. किटल्या छ...

तांबडी माती भाग: ३

इमेज
 भाग २ वरून पूढे चालू गड्यान हातात बुतारा(माडाच्या जावळीच्या काड्यांचा झाडू) , टोपली, फावड रग्याच्या हातात दिला, ती गोठा दाखवला, मोट, मळा, बैल जोडीची माहीती दिली. सगळी काम समजावून सांगितली.  आठ दिवसापासून आधीचा नोकर सोडून गेला होता, तेव्हा गोठा अस्तवस्त होता. इतर नोकरांनी वर वरून साफसफाई केली होती. लग्नानंतर हातात झाडू घेतला व कामाला लागला , गोठा झाडून लख्ख साफ केला गवताचे भारे नीट लावले, गवताच्या गंजी सोडून प्रत्येक गाई बैलांना चारा दिला, कालच्या वेळूच्या अंगावरून हात फिरवला, खोडानी ओळखी खातर पाय पूढे मागे केले. टाकीतून पाण्याच्या बादल्या गायी बैलांच्या पुढ्यात मांडल् गुरं मनसोक्त पाणी प्याली.सारी जनावरे काथ्याने घासून धुवून काढली. मग गोठा चकाचक धुवून काढला. मोटीवर जावून बैल जुंपले, सारा मळा शिंपला, मग पाण्यानं हौद भरलं, गड्याला सांगितल, सारी काम पार पाडली. विहिरीवर हात पाय धुतल ,घटाघट पाणी प्याला.शरीरावर एका थंड स्पर्शाची लहर उमटली. गड्याला आवाज दिला, सारं चकाचक झालेल पाहून तेही इतक्या कमी वेळात! कामाचा आवाका पाहून गडी मालकाच्या कानावर घालायला धावला.पाटलांन सर्व साफसूफ पाहून...

तांबडी माती भाग: २

इमेज
 पाटलांन रघ्याला घरी बोलावलं, रघ्या खूष होत मिळालेल बक्षिस पोरात मिरवू लागला, मुलांनी " पार्टी" करून एकच गलका केला. पण रघ्या पटकन भानावर आला. मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, रघ्यान घरचा रस्ता धरला, पैसे म्हातारी च्या हातावर टेकवले, माझा पोर लई हुशार म्हणून म्हातारीने बोट मोडून दृष्ट काढली. महिनाभरात एका कामाचं पैसे गावतात ते त्यांना १तासात तिला मिळवून दिले होते. पण पोराला पाटलाकडून जाव की नाय कळेना तसेच का बोलावले ते बी कळेना? पण लई विचार करून कशाला बोलावलं ते तर कळल बक्षिसी तर देवून झालती शीळ घालत रघ्या पाटलाच्या वाड्यावर गेला, घाबरत घाबरत पायऱ्या चढून वर गेला. कुणीतरी आवाज दिला, काय काम काढलं? मघा पैकी हा नोकर नव्हता, म्हणजे हा घरचा नोकर होता. पाटलांनी बोलावलं होत, रघ्या उतरला, बस वटीवर मालक खाली आलं की कानावर घालतो, १/२तास झाला तरी कोन ही फिरकीना, कुठच्या कुठे आलो असं राघवला झालं, पण आता असचं जायचा निरोप मिळाल्या शिवाय जाता ही येईना, तेवढ्यात मघाचा नोकर आला, मालिक बोलवतात, ये आत म्हणाला रघ्या त्याच्या पाठोपाठ गेला, पाटीलआराम  खूर्चीवर बसल होत. हं काय काम काढलं? तुम्हीच...

तांबडी माती भाग:१

इमेज
 रघ्या(राघव) गावचा उनाड आई बापा विना पोरका पोरगा जन्मताच मजबूत बांध्याचा केस कुरळे, सावळा रंग उगाचच गावात उनाडक्या करत फिरत असायचा. पारावर पोर गोळा करून उगाचच मुलात मस्त्या लावत फिरायचा, पण तसा त्याचा गावात कुणालाही त्रास नसायचा, मुल स्वत:हून त्याच्या मागे मागे फिरायची, गरजेला ताे गावातल्यांना  लहान मोठी मदतच करायचा पण काही कमवायची अक्कल आली नव्हती. तेवढ शहाणपण तो शिकला नव्हता, घरात म्हातारी आजी एकटीच तिनेच रघ्याचा  सांभाळ केला. ती चार घरी धुणी भांडी करायची,रघ्यालाही तिची कणव यायची पण काम कसं, कुठ शोधायचं, हे उमजत नसे, कुणी पाण्याच्या चार खेपा आणायला सांगितल्या व त्या मोबदल्यात काही बाही दिलं की रघ्या खूष होवून आजीला द्यायचा, तेवढीच म्हातारीला मदत.  एकदा गावात पाटलाच्या खोड उधळलं,, गावभर पळाला लागलं, पाटलाचे नोकर त्या मागे धावून दमले, पण ते कुणाच्या हाताला लागलं नाही. बाकी कुणाची हिंम्मत ही होईना त्याला पकडायला, रस्त्यात पळापळ सुरू झाली. खोड हाताला लागत नाही, बघितल्यावर पाटीलही रस्त्यावर आला. पाटलांनी हाक घातली रस्त्यातून बाजूला व्हा. पारांपर्यत गावाला नी पाटलांना त्...

उंची सामान

 अगदी जूने हिंदी ,मराठी सिनेमा पाहिलेत तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. की त्या पिश्चर मधील  हिरोहिरोईन , श्रीमंत लोक, महागडे उंची कपडे, महागडया  गाड्या, बंगले, महागडी चप्पल  महागडी सेंट इत्यादी वापरत असत, म्हणजेच पूर्वीच्या काळी ही फॅशन होती. रुबाबात रहाणं होत , अगदी पूर्वीचा काळ घेतला तर असे लक्षात येत की तेव्हा आभूषणांनी स्वताला सुशोभित केले जायचं,  हे सर्व आपण सुंदर दिसण्यासाठी सुखासीन जिवन जगण्यासाठी करतो व  सर्वाना तसं जिवन जगण्याची आस निर्माण होते. ते योग्यच आहे पण एक अशी गोष्ट आहे की, आपण ह्य गोष्टी तरूणपणी वापरतो, तेव्हा आवड आणि तारूण्यात असलेली उर्मी आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्याकडे हवीच हे विचार , आपल्याला खरेदी करण्यापासून रोखू शकत नाही. दुसरं म्हणजे आपल्याला भविष्यकाळ माहीत नसतो. तेव्हा आपल्याला आवडेल ते आत्ताच लगेच मिळाल पाहीजे ही वृत्ती, मग ते कसही कर्ज काढून, चोरून किंवा स्वता कमवून ,वडिलोपार्जित संपत्तीतून.... तारूण्याचा जोश संपला की काहींना आपण कमावलेली संपती केलेला खोटेपणा खूपायला लागतो, पश्चाताप करावासा वाटतो. तर काहींना प्रायश्चित करावेसे ...

अग्नी

 वार्याच्या झुळूकेने निरांजन विझते,  पण त्याच वार्याने जंगलातील वणवा  पसरतो.  अग्नी एकच, वाराही एकच, फक्त  वार्यामागील दाब वेगळा,  नातीही अशीच,  माहेरच्याने दटावले तर प्रेमाने  सासरच्याने दटावले तर त्वेषाने  नात्याची गुफंण वेगळी वर्षा प्र पाटील. ©®

पूण्यस्मरण

 प्रिय आईस,  खरं सांगू? आई आणि मुलीच्या नात्याला कसलच बंधन नसतं ,वयाच सूद्धा. नव्वदीच्या पार केलेल्या बाईला आपली ६० वर्षाची मुलगी देखील प्रिय असते. आणि ६० वर्षाच्या मुलीला ही नव्वद वर्षाच्या आईला काही बाही खाउ घालायची इच्छा असते. पण आपलं नात इतक दीर्घायू नव्हत. मी तुझ्या घरी परतून आले, आणि मला वाटलं आपलं नात पूर्वीपेक्षा घट्ट होईल कारण तू जसे सासरी चटके खाल्ले होतेस तसेच मीही खाल्ले. व त्यामुळे च तूझ्या माझ्या नात्याची वीण अधिकच घट्ट झाली. नातीला तू खूप प्रेम लावलेस,तिच्या ताटातील घास खेचून खाणार्यात तिला आपले लाड करणारी एक आजी मिळाली. व ती अश्वस्त झाली.पण नियतीला हे मान्य नव्हते, आमच्याकडून तू जावू नयेस म्हणून तीने सूद्धा तूला शाळेत जाताना अट घातली, पण तू त्या लहानगी चे ऐकले नाहीस.आणि परत परतून आली नाहीस. तू आम्हा दोघींचा आधार होतीस. जे तिच्या ताटातील घास खेचून घेत होते. ते आपला आधार असलेली आजीही खेचून घेतील हे तिला त्या वयातही माहीत होते. म्हणून ती तूला जाण्यापासून आडवत होती. तूझा माझ्यावर ही खूप विश्वास होता. म्हणूनच तू तुझ्या मायेच्या धाग्याने बांधून ठेवलेले घरटे,मी तसेच ज...