श्रद्धांजली
आभाळालाही रडू कोसळले,
धरणीलाही कंप फुटला
असा अवचित एक श्वास हरपला,
स्वतःला खोल खाणीत कित्येक
वर्ष गाढून घेतलेला एक पुरातन
अनमोल हिरा हरपला, !
कित्येक वर्ष तूमची सहचरणी
दुसर्या जगात तूमची
वाट पहात होती, तरी
तुम्हाला आम्ही थांबवून
ठेवले होते. लहान, सहानांनाही
तूमचा आधार हवा होता,
जसा एखादा हेर शत्रुच्या राज्यात
जावून घुसखोरी करतो, तसा मृत्यु
बांधलेली कडी तोडून आम्हाला
पोरके करून तूम्हाला घेवून गेला,
त्या श्वानानेही स्वताला माफ केले
नाही, ज्याला तूमचा मृत्यू आडवता
आला नाही, तोही तूमच्या मागून
आम्हाला सोडून गेला,
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
वर्षा पाटील ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा