page 1
दुपारचे दोन वाजले होते, मनोहर रावाने आपले किराणा मालाचे दुकान बंद केले, आणि भर उन्हात चालू लागले आता त्यांना पूर्वी सारखे कष्ट होत नव्हते. आणि तसे दुकान सांभाळायची गरज नव्हती पण नाईलाज होता. ते विचार करत स्वताच्या हवेली पर्यंत पोहोचले. पायर्या चढून, एक दीर्घ श्वास घेतला, खिश्यातून रुमाल काढून घाम पुसला, आणि समोर टांगलेल्या पाळण्यावर जावून बसले. आत ,लक्ष्मी म्हणुन आवाज दिला,... त्यांची बायको, घाईघाईने पाण्याची घागर घेवून आली. त्यानी त्या थंडगार पाण्याने आपले, तोंड धुतले.. आणि हाताने थांब सांगितले, त्यांच्या बायकोने आपला डोक्यावरचा पदर नीट केला आणि थांबली. खर तर त्यांच्या मुलीचे नाव लक्ष्मी होते, आणि बायकोचे नाव लीला होते. मुलीचे लग्न होवून ती सासरी निघून गेली होती. तिच्या आठवणीने मनोहर ने आपल्या गाईच्या बछडयाचे नाव लक्ष्मी ठेवले होते. तो मुलगी झाल्या पासून बायकोला लक्ष्मीची आई म्हणुन हाक मारा...