त्या माणसाला पाहूनच मला काठी उचलायची ईच्छा झाली होती. पूढे चालू.... पावसाळा असल्यामुळे रानटी फळे फुले भाज्या उगवल्या होत्या.सुर्य जसा माथायावर येत होता तस तशी सर्व किरणे झाडातून डोकावत होती आणि आक्रामक साडे आकरालाच अंगाची लाही लाही होत होती पावसाळा आणि संपूर्ण डोंगर हिरवागार असूनही वारा वाहत नव्हता. अंग भाजून निघत होतं,मी पाणी विसरलेली होती, .अंगात कोट नव्हता ,मला तहान लागली होती,मी पाण्याने व्याकूळ झाली होती.एकटी असतानाही मला घरी परतून जावेसे वाटत नव्हते.चढण्याची जिद्द चिकाटी तशीच होती.शिवसैनिकांचे आभार मानायला हवेत कारण त्यांनी लाकडी भरीव ओडकें चा छान वापर करून पायऱ्यां तयार केलेल्या आहेत. एकटीच चढण चढत 2वाजता डोंगर चढले.आणखी दोन शार्टकट आहेत तिथून चढताना कमी वेळात चढता येते मी एकटीच होते, तेव्हा थोडी थांबत आणि पायऱ्यांवर चढले.समोरच 5-6कुत्रे माझ्या स्वागता साठी होते.ते मला पाहून भुंकले नाहीत किंवा अंगावर देखील आले नाहीत.समोरच दोन पत्र्यांची घरे बांधलेली होती.खाली उतरणार्या माणसाने वरती कुणी नाही सांगितले ,त्यामुळे तिथे ...
मनोगत हे पुस्तकाच्या पहिल्या पानावर असलं तरी ते पुस्तकाचा तपशील लिहीलेलं व सर्वात शेवटंच पान असत. सर्वात आधी वाचल्याने कथांची माहीती होते. पुस्तक लिहायचं असा चंग वगैरे करून मी इतक्या कथा लिहील्या नाहीत, तर कथा सुचत गेल्या त्यावर खुप जणांनी हक्क दाखवून अडथळे निर्माण केले लेखक म्हणून स्वताची नाव लिहायचा प्रयत्न केला. तरी कथा पुर्ण केल्या कारण लेखकाला, लिहील्या शिवाय चैन पडत नाही. सगळ्यात आधी मी होळी ही कथा लिहीली, ती कथा मला सुचली ती मी आधीवासी भाषेत लिहीलेली आहे,ती लिहीताना मी त्यांच्या बोलीभाषेत ती कथा लिहीली, ती लिहीलेल्याला ७-८ वर्ष झाली.मोबाईल मधील शुद्ध भाषा त्यातील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहीत असे व मला ते परत बदलून त्यांच बोली भाषेत लिहावा लागे. मला ती भाषा अवगत करावी लागली नाही, तर त्या जीवन मानाची "ठाकूर" जमातीची लोक दरवर्षी शेतीची कामं, होळीत झाडे डुखण्यासाठी/तोडण्यासाठी आमच्या घरी येतं, मी लहान होती त्यामुळे त्यांची भाषा अवगत झाली होती. व मी त्या भाषेचा उपयोग, कथा लिहिण्यासाठी केला. विदुषी म्हणजे हुशार स्त्री हे मी कथेचं नाव लिहीलं, पण नायीक...
शाळेला सुट्टी पडल्या की आम्ही द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू, पावसाळ्यात गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन, सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध, पाण्याचे ओहळ, आणि एक निसर्गाची निरागस मनाला लागलेली ओढ. हा एक ऋणानुबंध होता त्या नकळत्या वयात द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक विश्वास असायचा, त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे. दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे, माणसे सुद्धा, घेवून वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा