पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नैसर्गिक आपत्ती

 नैसर्गिक आपत्ती: भूकंप, भूस्खलन,पूर वादळे, लाव्हा, सुनामी केव्हाही येतात. कधी येेतील तेही नीट तपशीलवार  सांगता येत नाही. अशा नैसर्गिक आपत्तीना तोंड देत  वसुंधरा आपला जरही तोल ढळू न देता मार्गक्रमण करते. बरे! आपल्या लाडक्या मुलाचा भार खांद्यावर वहावा तसा ,मानव जातीचा भार सतत वाहते. "थकले " म्हणून तिला कुठे जरा खाली, बाजूला  आपला भार ठेवता येत नाही. आपण मात्र क्षणभंगूर  जिवन जगताना  ,   अपयशातून  अनेक विध्वसंक कामे करतो.  वसूंधरेला इजा करतो.वृक्ष तेडतो, डोंगर खणतो, नैसर्गिक तोल बिघडवतो. पण तेच आपल्या मनाविरूद्ध काही घडले की लगेच आत्महत्येचा प्रयत्न करतो.  पण जर का पृथ्वीने मी आता थकले आहे तूमचा भार वाहून ! मीही जरा विश्रांती साठी थांबते.म्टंहले तर.... , म्हटले तर!  आपण निर्सगाचे म्हणणे ऐकण्यास बांधील आहोत. हे मान्य करत नाही.  वर्षा प्र पाटील. ©®

बैचेनी

 बैचेनी ही विचारातून येते,  वैचारिक अस्थिरता ही कारणीभूत  असलेल्या घटनेतून येते.  वर्षा पाटील©®

राग

 राग वाईट, पण त्याहून  राग आणणारे  वाईट ! वर्षा प्र पाटील. ©® 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एकटी

इमेज
  मी सगळ्यात एकटी पडल्याचं  वाईट  वाटतं, नाही . वाईट वाटतं ते, एकटी असले तरी  सगळ्यानांच परत माझी गरज भासते  त्याच. ...  वर्षा पाटील©® 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷.

दु:ख:

 दु:ख परक्याने सतवल्याच नसतं,  फसवल्याचंही नसतं.  दु:ख......!  आपलेही त्यात सामील असल्याच असतं वर्षा प्र पाटील©® 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

वर्तणूक

 वाईट वागणार्या माणसांकडून  चांगली भेट मिळाली,  की तो माणूस चांगला होतो का?. की,  ती लाच असते. की? अमिष....  चांगल्या माणसाने  एखाद पुष्प दिलं तरी पुरेस असतंं वर्तणूक महत्वाची..  वर्षा पाटील. ©® 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

छंद

 छंद जोपासणे,  म्हणजे आवड जपणे. आवड जपायला नावड असणे,  गरजेच आहे.  तरच दोघातील खरा..  भेद कळतो.  म्हणजे नावडीमुळे  आवडीचा छंद  जोपासता येतो. 🤔 😊😊😊😊😊😊 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  वर्षा पाटील. ©®

वाट

इमेज
 वाट   :  वळणा वळणाची मला कधी  तूझ्या घरी घेवून आलीच नाही . आणि कधी  माझ्याही घरीही घेवून गेली नाही.  मी तिच्यावर विश्वासून  चालत राहीली पण..  कायम ती मला  चकवा देत राहीली.  वाट आयुष्याची  मला कधी  माझ्या ध्येयपूर्तीकडे  घेवून गेलीच नाही.पण..   तरी ,मी  कठीण चढण चढतच राहीली.  कारण ती संपत नव्हती,  तिनेच मला चालण्याची स्फूर्ति दिली.  वाट,  मना मनाची  कायम मला  विचारांची चालना देत राहीली.   म्हणूनच  मला ती आवडत गेली वर्षा प्र पाटील©® ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

बहाणा

जगाच काही माहीत नाही?  पण आमच्या कडे, सध्या एका मागून एक, "मेंढी " दरीत उड्या मारते,  काय असेल? राव!  एवढ त्या दरीत...  अलीबाबाचा खजिना  की ? कपाळमोक्ष करण्याचा हा एक नविन बहाणा!!!!!  वर्षा प्र पाटील. ©® 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कर्ज भाग २

 कर्ज:भाग २ नविन आणलेली कापड अंगालापण लावली नायत तेव्हाच कोपलास तू!  बाच धोतर घेवून शेताकडं धावलो , झाडाला टांगल! पोरांचा चेहरा डोळ्या समोर आला. मीच खचलो ! तर पोरांच काय होईलं ?  बाप नसलेली पोरकी पोर कर्जात काय करतील  ? पोरींनी मागून आवाज दिला आज्या धोतर शोधतोय ? कशाला घेवून आलास ? मी उतरलो आकाश फाटलंय ! नी नशीब फूटलयं ! कुठं ठिगळ लावायला जमतयं का पाहतुयं ?  पावसाच्या धारात डोळ्याच्या धारा लपवता येतात का पहातुय....  समाप्त वर्षा प्र पाटील ©® 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कर्ज भाग १

 कर्ज:भाग१  मी तूला हातात घेताना खूप हारकलो ! फार नाही बा ला धोतर ,आयला लुगडं तिला काचोळी ,नी पोराला सदरा ,नी पोरीला परकर,! इतकच नाय थोड बियाण, थोड खताणं ,नी थोड भाकरीला पीठ, नी थोडा कडबा , घरला घेवून आलो.  शेत नांगरून बियाणं पेरलं ,खताणं मारलं,  हिरवं वार्यावर डोलू लागलं, मन कसं आनंदान भरून आलं.  आवकाळी पावसानं घेरलं ,कशी? ढगफूटी झाली रे देवा! होत्याचं नव्हत केलसं ! क्रमश: वर्षा प्र पाटील. ©® उरण, नवी मुंबई

नूर भाग ५

इमेज
ऊ 4संकोचलेली नूर गाडीत फारस काही बोलू शकत नव्हती. पण अनिष नी तिच्या  दिसण्याच कौतुक केलं, तो एक बि़झनेसमँन होता. आणि लोकल लोकांना आपलंसं केल्यावरच त्याचे दोन्ही ़धंदे व्यवस्थित चालणार होते. पण नूर बाबत तो पूर्ण वेगळ्या विचाराचा होता. तिथे त्याची भावनिक गुंतवणूक झाली होती. ती इतरांहून वेगळी होती. तिच्याच बागायती मध्ये ती स्वाभिमानाने काम करत होती. त्याची गोष्ट ह्याहून वेगळी नव्हती. नूर जे जिवन जगत होती, ते त्याच्या आई सारखं होतं म्हणजे त्यालाही आई़शिवाय दुसरं कुणी नव्हतं, तो  मोठा झाला होता. ते त्याच्या बुद्धीमत्तेवर व अचूक निर्णयक्षमतेवर झाला होता. तोही अनाथासारखाच वाढला होता. तो इथे आपलं गाव सोडून स्थाईक होण्यासाठी आला होता. तो नूर व तिच्या मुलाची जबाबदारी घ्यायला तयार झाला होता. खर तर आजच्या पार्टीत च तो ते जाहीर करणार होता. पण  त्याची  आई गावातील सर्व व्यवहार आटपून येवू शकली नाही. आणि त्यामुळे त्याला नूरशीही व्यवस्थित बोलता आले  नव्हते.  नूरच्या घराच्या थोड्या लाब अंतरावर त्याने गाडी थांबवली ,व बोलायला सुरूवात केली. मी तूझी व तूझ्या मुलाची जबाबदारी...

नूर भाग ४

इमेज
 नूर ही न्यू इयर पार्टी बद्दल उत्सूक होती. तिलाही त्या पार्टीचे आकर्षण होते. एवढ्या मोठ्या होटल मध्ये ती कधी गेली नव्हती. तिथला शाही थाट तिला अनोळखी होता, पण तिथे जाण्यासाठी तिला साजेसे कपडे लागणार होते. रात्री तिने लवकर कामे आटपून जूने कपाट उघडले त्यात टाळेबंद केलेली संदूक होती तीने ती उघडली. त्यात तिच्या लग्नातील लेंहेगा होता, तो परत तिने कधी घातला नव्हता. ह्यापेक्षा चांगला व महागडा पेहराव नूर कडे नव्हता. पण खडीचे काम असलेला हा पेहराव नक्कीच पार्टी साठी योग्य होता.  बाबाला सांगून , त्याची न्यू इयर पार्टी साठी परवानगी मागून, नूर दुसर्या दिवशी होटल मधून सरळ घरी न येता बाजारपेठेत गेली, निळ्या ड्रेस साठी निळ्या बांगड्या व खड् यांच कानातले व नेकलेस खरेदी केला. हे खर्चिक होत, पण नुकतेच तिला खेळण्यांचे पैसे मिळाले होते. व मोठ्या पार्टी साठी अनिवार्य होतं,  न्यू इयर पार्टी ला जाताना नूर ने आपल्या बरोबर काम करणार्या मुलीला बरोबर बोलवलं होतं,  निळ्या रंगाचा लेहगा त्यावर खड् यांचे वर्क व कानात गळ्यात खड् यांचे नेकलेस, हातभर निळ्या बांगड्या डोळ्यात काजळ, ओठावर लाली नूर एखाद्या...

नूर भाग: ३

इमेज
 नूर भाग २ वरून पूढे काहीतरी विचार करून नूरचे पाय बाजारपेठेकडे वळले. तिने आजच्या मजूरीतून काही लहान सहान ठोकळे, काही रंग व १-२कँनव्हाँस बोर्ड विकत घेतले. काय माहीत कदाचित वडिलांच्या ह्याच कामात आता तिला हातभार लावावा लागेल. सामान बास्केट मध्ये टाकत तिची पावले,घराकडे वळली, ती झरझर पावले टाकत घराकडे निघाली, आपण जर कामावरुन काढले गेलो तर कदाचित बोर्ड रंगवू, किंवा ठोकळ्यांना आकार देवू पण त्याच बरोबर आपला मुलगा आपल्या बरोबर असेल, ह्या विचाराने जरा ती खूश झाली. दारात पानांचा जूडा बकरीला टाकून त्यांना तिन् गोंजारलं ते उगाचच शहरलं हळूच बँ करून ओरडलं, घरात जावून स्वत:च पटापट आवरून, बकरीचे दूध काढून चहा तयार केला. बाहेरचं कुड लावलं, बाजारातून आणलेल सामान वडिलांना दिलं ते, पाहून ते कसनुसं हसले. मागच्या खेळण्याचे पैसे अजून आले नव्हते, मुलीला ते नविन सामान आणायला कसं सांगणार? मुलीला त्याच्या चेहर्यावर च हसू पाहून बरं वाटलं, काम आटपून ती गादीवर विसावली. कितीही लवकर उठलं, तरी दररोजची ५-१०मिनीटाचां उशीर ठरलेलाच होता. जून्या ठेकेदाराला ते माहीत होत. पण आता ते चालणार नव्हतं. विचार करता करता नूर ला झ...

नूर भाग:२

इमेज
  बाप दिवसभर पेंटींग काढायचा, किंवा लाकडी खेळणी बनवायचा, बाप एकदम शांत. मुलीशी मोजकेच बोलायचा म्हणजे त्यांच बोलणंच बंद झाले होत, काय आणि कशावर चर्चा करणार खेळणी व पेंटींग दुकानात द्यायला स्वता जायचा पण मोबदला फारच कमी मिळायचा, ते पैसे रंग व बोर्ड आणण्यातच खर्च व्हायचे ते पाहून नूरने ते काम स्वतःकडे घेतलं, पैसे वस्तू विकल्या शिवाय आधी मिळत नसायचे ,त्यामूळे बेभरवशाचे  वेळेवर हवे तेव्हा मिळणं कठीण ,त्यामूळे नूरच्या रोजंदारीवरच घरखर्च चालायचा,  सकाळी स्वताच आटपून बकर्यांना दिवसभराचा पाला टाकून बाप-पोराच जेवण करून नूर कामावर जायला तयार झाली. दोन झाडांच्या मध्ये अडकवलेल्या दोरीवर पटकन कपडे आडकवत होती. नूर सूदंर गोरीपान गुलाबी गालाची उंच  रूंद बांध्याची दोन नाकाच्या मध्ये आडकवलेली चांदीची वाळी, उंच मानेत अडकवलेल चांदीची कडं, हातभर हस्तीदंताच्या बांगड्या व चांदीची कडी तशीच कडी दोन्ही पायात आणि कानात डुल,लांब पायापर्यंत पसरलेला घेरदार स्कर्ट आणि त्यावर गडद हिरव्या कंच रंगाचा लांब हताचा स्वेटर हा नेहमीचा नूरचा पेहराव. जस तिचं दिसणं सुंदर तसचं तिचं सहज खळखळून हसणं,पाहताच कुणाची...

नूर भाग : १

इमेज
नूर भरभर चढ चढत शेवटची कितारारू(बास्केट) आधीच्या राशीत पालथे घातले, ठेकेदारा कडून दिवसाची मजूरी घेतली व चढण चढता चढता पान खूडत बास्केट मध्ये टाकत मेन रस्त्याला लागली. झरझर रस्ता कापत घराकडे वळली. दारातच बास्केट उतरून बांधलेल्या बकर्यांना पाला टाकून घरात शिरली.  चुलीवर पाणी चढवून आतल्या खोलीत डोकावली, बाप पानाची वळी ओढत पाळणा हलवत होता.नहाणं आटपून चुलीवर पाणी चढवून पान धुवून त्यात टाकली. उकळून काढा तयार केला. थाळीत ओतून बापाला दिला. पोरगं मांडीवर घेवून त्याला घोट घोट पाजला! कडवट चव असून पोरगा आईला ओळखून खुदकन  हसला. परत  तिने त्याला पाळण्यात टाकून स्वताला काढा घेतला. गरम गरम काढा पोटात गेल्यावर खूप उत्साह वाटला दिवसभराचा क्षीण कुठल्या कुठे निघून गेला. बाप परत पानाच्या वळकटीत तंबाखू भरून ओढू लागला. तिने मघाची मजूरी हातात घेतली. थोडीशी चिल्लर डब्यातून काढून घेतली, व बाहेरची कडी लावून परत झरझर पावले टाकत दुकानात शिरली २किलो तांदूळ १/२किलो  डाळ ,साखर नी बिस्कीट पुडा घेवून परत चालू लागली. बाहेर गार वारा जाणवत होता, आजूबाजूला अंधार दाटून  रस्त्यावरचे दिवे मिणमिणत होते....

सच

   सच कडवा क्यू है, और झूठ मधूर क्यू है, लोग झूठ सुनना ज्यादा पंसद करते है, क्यू ? अगर ऐसा ना होता तो,? तो रामायण ,महाभारत का इतिहास अलग होता. धोबी सिता मय्या के बारे मे झूठ ना बोलता श्रीराम ना उसे त्याग  देते. और लवकुश आश्रम मे ना जन्म लेते, ना ही वो(सिताजी) धरती मे समा जाने की बात करती,  ना महाभारत मे कुंती अपने जेष्ठ पुत्र को खो देती, ना ही कर्ण अपने चार अच्छे विचार के भाईयों को खोकर  दुर्याेेधन के पास जाता, नाही धर्म अपने गुरू से जीवनभर का एकही झूठ बोलता, झूठ से विनाश है ये पता होकर भी हर एक झूठ बोलता है क्योंकी झूठ से राहत मिलती है,  सच ,सच है, सच आईना है ,फिर भी सच से मुहँ मोडके सच को ठुकराके, सब झूठ का सहारा लेते है, क्योंकी सच का आईना संदरता नही दिखाता, सत्य किसको पसंद नही आता. जिनके विचार मे ताकद है, जिन्हे जिवन का अर्थ मालुम है वो सच और झूठ के फेरे मे नाही अटकते,वो सच का स्विकार करके अपना जिवन व्यतित करते है,  झुठ हर जगह है, लेकीन नेचर मे प्राणि मात्रा मे पशू पक्षीयोंमे नही है,  पानी मे ,हवा मे नही है, झूठ एक विचार की धारा है, वो गलत है ...

बोन्साय

इमेज
 विचारांच बोन्साय होवू देवू नका,   त्यांच्या मुळांना खोलवर रूजू द्या,  त्यांच्या फांद्या  दूरवर विस्तारू द्या,  विचारांच्या फांद्या पानां, फुलां, फळांनी लगडू द्या.  बोन्साय दिसायला सुंदर असलं तरी, त्याची मुळ तारांनी आवळलेली असतात, त्या मुळांना मुक्तपणे पसरू द्या, मातीत रूजणं,रुजून, विस्तारणं,               वाढून फळ, फुलणं, हाच निसर्ग नियम आहे.  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 वर्षा प्र पाटील©® उरण नवी मुंबई

दिपावली भाग २

 दिवाळी सुरू होत असे. सुगीचे दिवस सुरू झाले पिक घरी आली. की शेतात काम केलेल्या बैलांना विश्रांती सुरू होत असे. त्यांनी पावसाळ्या पसून शेतात राबून पिक घरी घेवून येई पर्यंत कष्ट केलेले असतात. तेव्हा त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा सण. ह्या दिवशी बैलांची आंघोळ करून त्यांची शिंग रंगवून झालर टाकून गळ्यात माळा टाकून नटवून नंतर त्यांची पूजा करून गोडाचे(गूळ घालून केलेले पदार्थ) पदार्थ खाउ घालत.  धनत्रयोदशी:ह्या दिवसापासून पहाटे लवकर उठून दिव्यांची पूजा करून अंगणात दिपांची(पणत्यांची) माळा लावण्याची प्रथा असे.दिव्यामध्ये काही दिवे मातीचे, काही मिनगुट(निवडुंग)चे काही पिठाचे असत. ते दिवे वेगवेगळ्या जागी तेवत ठेवत  गोठ्यात, विहिरीजवळ, तूळशीजवळ, मोरीजवळ, माळ्यावर, माजघरात, जवळ शेत असेल तर त्यांच्या बांधावर ठेवण्यात येत असत. हेतू हा की आपल्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याजागा प्रकाशमान कराव्यात.   नरकचतुर्दशी: ह्या दिवशी पहाटे ४ला उठत असू. व गावात सर्व प्रथम उठणारे प्रथम फटाके  🎇 वाजवत असतं, काही महाभाग रात्रभर रांगोळी काढत बसत ...

दिपावली भाग:१

इमेज
आम्ही बी घडलो, ह्या मध्ये द्विअर्थी कोटी आहे. म्हणजे आम्ही पण घडलो., म्हणजे च तयार झालो, शिकलो. आणि आम्ही बिघडलेा. आता तुम्ही म्हणाल ह्या वाक्याचा आणि दिवाळीचा काय संबंध तर? तुम्हाला लेखाच्या शेवटी ह्या वाक्याची मेख लक्षात येईल.             आमच्या लहानपणी (हे वाक्य लहांनासाठी आहे. कारण समवयस्कांचे बालपण जवळ जवळ सारखंच असणार फक्त ते कलम हातात घेवून लिहीत नाहीत. )सहामयी परिक्षा झाली की दिवाळीची सुट्टी पडत असे. परिक्षेचा ताण,क्षीण निघून गेलेला असे. पास, नापास ,नंबर,  ह्याची २१ दिवस तरी  खंत नसे.     आता मोहीम फत्ते करायची असे. खूप सारी कामे असत, सर्वात प्रथम प्रत्येक गावाच्या अंगणात  लहान/मोठे अंगण तयार करायचे असे, त्या साठी कुदळ फावडे घेवून साधारण ४,बाय सहा फूट लांब आयत आखून  तो खणून त्यावर पाणी शिंपडले जाई, मग त्या ढेपळांना फोडून मऊ करून चोपटण्याने चोपून  गुळगुळीत जमीन तयार करून त्याचे ६ते ८ इंच उंच अंगण बनवून दिवाळी  यायच्या आठ दिवसा आगोदर पर्यंत दररोज चोपून छान अंगणात अंगण तयार करून त्यावर सारवण केले जाई. स...

अंलकार

इमेज
  चोरांच्या भितीने मी सोन्याचे 'अलंकार'  वापरत नाही.  'शब्दालंकार' कुणी चोरत असेल असे मला वाटत नाही.  👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

तडजोड

तडजोड  विचांराबाबत करता येत नाही. तशी ती छंदात बाबत सूद्धा करता येत नाही.  🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠 वर्षा प्र पाटील. ©® उरण, नवी मुंबई

ओरखडा

 कल्पनेच्या राज्यात सुखद अनुभव येतात.  प्रत्यक्षात मात्र तिथेच ओरखडे उमटलेले असतात.  🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

साकव

 डोळ्यांनी डोळ्या बरोबर बांधलेला साकव जरी अदृश्य असला तरी,  तो भक्कम असल्याचा पुरावा मना जवळ आहे. कारण ... तेव्हा जोडलेली मन अजूनही  तशीच जोडलेली आहेत.  ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

उध्वस्त

 तू तूझ् आयुष्य उध्वस्त करताना,  माझ ही केलस् ,  तूला  ते कळले की नाही.  कारण आपण एकाच धाग्याच्या  दोन टोकांना बांधले गेलो होतो.  कदाचित! एखाद्या अवचित क्षणी  आपण एकमेकांना भेटणार होतो.  एकमेकांच्या हातात हात गुंफणार होतो.  अति धाडसाने ! दोन्ही कडून खेचले गेलो.  तुटलो! खोल गर्तेत जावून पडलो.  वर्षा पाटील©®

माझ शहर, /माझ गाव.

 माझं, शहर जगाच्या, देशाच्या नकाशावर छोटसं न दिसण्या,इतपत छोट,. पण मुंबई शहरापासून जवळ. त्यामूळे त्याला महत्व प्राप्त झालेलं. तुरळक वस्ती असलेलं. मी लग्न होवून गेले, तेव्हा मला जवळ जवळ सर्वच ओळखायचे. ४ वर्षातच मी परत आले. पण मला एक गोष्ट जाणवली. इथले रस्ते निर्मनुष्य झालेले, सगळी लोक गेली कुठे?  झाडावरून पक्षी उडून गेलेली ,पानगळीतील झाडाचे शेंडे कसे बोडके, भकास दिसतात. तसे माझ्या शहराचे झाले होते. पण जे लोक कुणी राहिले होते, ते मला पहिल्या सारखेच ओळखत होते. आणि अचानक! शाळा सुटावी, व रस्ता भर मुलांचे जथ्थे दिसावेत, तशी माणसं दिसू लागली. मुंगीलाही शिरायला जागा नसावी. इतकी माणसं सर्व अनोळखी, माणूसकी नसलेली, काय कमवायला आली ?आणि काय मिळवायला? कुठून आलेली? कशाचा थांगपत्ता नसलेली. हवरटा /आधाश्या सारख सगळं लुटत बसलेली.  आज १५ वर्षांनी परत हेच गाव, / शहर सोडायची वेळ माझ्यावर आली. अनोळखी लोकांनी मला काय दिलं? आणि काय हिसकावून घेतलं,? काय हिशोब केला? काय न्याय केला?....... 🌹 प्रथम मी ज्या गावात  जन्म घेतला, मी लहानाची मोठी झाली. ते गाव दूर दूर पर्यत माझ गावचं, नाही. जिथे हसले...

प्राजक्त(पहाटे चंद्र नभातच असतो, तेव्हाच्या स्थितीचे वर्णन)

इमेज
             पिठूर चांदणे त्यात चंद्रमा,     आज अंगणात माझ्या उतरला     स्वागतासाठी रविकिरणे ही      त्यात सम्मिलत झाली.           काय हा अभास           की फितुरी ही            की मिलनाचा             हा भास होता,             सुहास हा मंद पसरे          केसरी ही हळूच डोकवे,          प्राजक्त हा हळूच पहुडला         मंद वार्याच्या झुळकेतूनी             वाळके पर्ण ही,             नभीचा चद्रमा दिसे.            क्षणभर चाले खेळ हा             भास अभासांचे,             मला वाटे दारी माझ्या          लख्ख चांदण्यात चंद्रमा ...

मनस्थिती

         जूने, निसटून गेलेले,            घट्ट पकडून ठेवावेसे वाटते,            तेव्हा दुर्लक्षून गेलेले ,           आज हवेहवेसे वाटते.  वर्षा प्र पाटील. ©® उरण, नवी मुंबई. 

चंद्र

इमेज
 तूझ्या चेहर्याचा चंद्र,  मी ओंजळीत घेतला,  अन, अकाशातील चंद्र🌙 मला निस्तेज भासला.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 वर्षा प्र पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

हवन

 आष्टमीच्या रात्री, ढोलताशांच्या गजरात हळदीकुंकू वाहून, हार घालून पूजन करतात थिजलेले कोकरू आहुती साठी तयार करतात.  काहींच्या जेव्हा प्रसादासाठी चटावतात, एक निरागस जीव, देवीच्या नावाने बळी देतात,  ह्यालाच हवन संपन्न झाला म्हणतात.    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 व प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सावरीच झाडं

 सावरीच्या झाडाला काटे ही खूप असतात,  आणि पानगळीत पानेही नसतात,  शिमग्यात नटवायला नी जाळायला सारेच जमतात. .  .. . .  वर्षा प्र पाटील©® 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लिखीत

 तेरे हाथों के लिखीत मे , तेरे हाथों की खुशबू थी,  वहीं मेरे होठो पे मुस्कूराहट थी,  और वही अपना पन. . ... . अब तेरे संदेश मे ना  तेरे हाथों की खुशबू है,  ना मेरे होठो पे मुस्कूराहट,  और ना वोअपना पन....  है तो वो सिर्फ अहसास.. !  जहाँ हम उम्मीद लेकर बैठे है.  🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई

समाधान

 कधी कधी चांगल असतं आहे ,त्यात समाधान मानणं.  एखाद्याने, नशीबच चोरलं म्हणताना, नशीब🐞🍀 चोरणं, हेच प्राक्तनात लिहीलेलं असेल तर..........  🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸वर्षा प्र पाटील. ©® उरण(नवी मुंबई) 

शोध

 आज तूला शोधून  सापडतो का ? पहायचा विचार केला,  अन माझ्या मनातच मी चाचपडायला सुरूवात केली 🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕 वर्षा पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

'वाचाल तर वाचालं'

 वाचाल तर वाचाल  म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही चांगले वाचत रहालं,  चांगले लिहीत, बोलत रहाल, तर थोड्याच दिवसात  तूमच्या नकळत तूमचे विचार बदलत राहतील, चांगले  विचार मनात आले, की ते आचरणात यायला वेळ  लागत नाही. चांगल्या विचारांचा पगडा विचारात आणि  आचरणात असला की संगत ही सम विचारांची  चलगणार मग.....  वाचाल ना?  फक्त आपल्या मनातील वाईट विचार आपल्यावर हवी  होवू देवू नका.  🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️ टीप:वाचाल तर वाचाल हे वाक्य प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांचं आहे. व लहानपणी कधीतरी अभ्यासात असताना त्या वाक्यानी मी प्रेरीत होवून सगळे फलक, जाहीराती, मासिक, पुस्तक, वाचायची. व त्यामुळे वाचनाची व लिहायची गोडी वाढीस लागली.  🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 वर्षा प्र. पाटील. ©® उरण नवी मुंबई

अंतर

 तूझ्या ंमाझ्यातील संवाद तूझ्या माझ्यातील दुवा आहे.  तूझ्या माझ्यातील वाद तूझ्या माझ्यातील अंतर  आहे.......  ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ वर्षा प्र पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

चूका

    काही चूका सुधारता येत नाहीत.      ते क्षम्य अपराध असतात.     एक तर ते घडायचे नसतात.     किंवा ते शिक्षेस पात्र असतात.     त्याचे प्रायश्चित करायचे असते.    अक्षम्य अपराधाला माफीचीही    तजवीज नाही.  🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒 वर्षा प्र पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

प्रश्न

इमेज
                दुसर्याच्या प्रश्नाला उत्तर                 देणं सोप्प असत, त्याने                 त्याला मार्गही सापडू शकतो.                  पण.........                  दुसर्याचा प्रश्न आपला समजून                त्याचा प्रश्नच जगणं कठीण.........  🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇वर्षा प्र. पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

शिवार

इमेज
  घरी आई जगदंबा बसली.  नभ भरून आले, त्याला शिवार उघडे पडले,  कसे म्हणू तुझी कृपादृष्टी झाली,  जेव्हा माझे शेतच वाहुन गेले.  🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓वर्षा प्र. पाटील. ©® उरण(नवी मुंबई) 

पावसाचा एक "थेंब"💧

 पावसाच्या , धारांच्या गर्दीत, 🌧 भर रस्त्यात मोती नक्षत्रातील ,  एक '"थेंब"💦 घाईघाईने चालला होता.  त्याला अनमोल शिंपल्यात जावून पहुडायचे होते. मोती बनून  गळ्यातील 'हार 'आणि मनातील ' ताईत'  बनून , जीवनाचे सार अनुभवायचे होते. आपले अनमोल जीवन सार्थक बनवायचे होते.  पण अचानक एका वाार्च्याया झुळूकेने  त्याच जिवन अस्तवस्त झाले.   पटकन एका चातकाच्या मुखात जावून विसावले.  खुळा !  तोंडात पडता पडता म्हणाला , अरे !  असे, कसे ?  माझे जिवन क्षणभंगुर झाले. .. .  💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦🌧🌧

चांदण्या

बंदिस्त घराच्या खिडकीतून पाहिले जेव्हा डोकावून अमावस्येच्या रात्री  अंगणात माझ्या चांदण्या उतरल्या होत्या ओळखीचा चंद्र नसे त्यात परि शामल प्रकाश,गंधीतवार्या सह  माझ्या घरात  शिरत होता.  ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ वर्षा प्र. पाटील. ©® उरण नवी मुंबई

विष

      मलाच मी एकदा भेटून गेले       वदले, इथेच  समोर रिचवले        विषाचे प्याले.          मी विस्मयाने पाहीले,          विस्मृतीचे एक एक पान उलगडले         बालकास न उमजली मेख,          उदकाची तृष्टता मोठी        जल समजून विषास केले प्राशन,          परि हरी, तू साथ ना सोडी,          तयाचे रंगच न्यारे,         पून्हा भेटून आठवून देशील सारे        ती तर तुझीच बाललीला रे       तूला, मला पून्हा भेटावेसे वाटे,        ह्यातच आले सारे...  . ...   🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺       वर्षा प्र. पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

एक संवाद: वटवृक्ष आणि हिमालय

Dt.9/6/95 Varsha Patil Uran          एकदा एका विस्तिर्ण वटवृक्षाने जोमाने वाढायला सुरूवात केली. आपण उंच उंच जाऊन त्या गगनाला भिडायच खूप काही सांगायच,आकाशाला भिडल्यावर खूप काही पहायच,वाढता वाढता त्याला दिसला हिमालय, अरे ! हा तर आपल्याहून उंच आहे हजारो मैल ,बहुतेक हा आकाशाला भिडलेला.         वटवृक्षाने हिमालयाला विचारले, हे तूझे रूप पाहून मी मोहीत झालो आहे. अन तू किती नशीबवान आहेस ,इतक्या उंचावरून कस दिसत हे जग? अन आकाशाशी गप्पा केल्यास ? त्याच हे उंच दूरवर राहण मला आवडत.          हिमालयाने एक सुस्कार सोडला,!  वटवृक्ष म्हणाला : मला याहून आता आणखी काही वाढता येत नाही ,तेव्हा असं कर  तूच मला रसभरीत वर्णन करून सांग अन माझा आणि आकाशाचा सुसंवाद घडवून आण.                हिमालयाने आपल बोलण सुरू केल,,हे दोस्ता जस तूझ्या मनात आकाशाला गवसणी घालायचे विचार आले तशाच ध्येयाने मी प्रेरीत झालो होतो. अन दुप्पट तिप्पट वेगाने वाढायला सुरूवात केली.उंचच उंच ! पण अजून मी गगनाला गवसणी घातलेली ...

आई

इमेज
Afternoon 12:00   06/02/15 To Arina    आई काय असते? मी तूला का सांगावे?  ते मूलीनेच समझावे. चांगल्या वाईटीची जाणीव  करून देते. कधी रागावते,  कधी पाठीत धपाटे घालते. कधी ऐकत नाही, म्हणून त्रागा करते. अशी आई मला का आवडवी? मी फूलपाखरू होवून बागडावे,  पक्षी होवून आकाशी झेप घ्यावी,  मासा होवून पृथ्वीचा तळ गाठावा,  तर मग हीने मला का दटवावे? आई देखील एक मूलगीच असते. थोडी काळाने ठोकारलेली,  थोडी अनुभवाचे निखारे हातावर घेवून वाट चाललेली! तीच वाट चालताना तू  ना कुठे धडपडावे,  ना कुठल्या किटकाने तूला भक्ष्य करावे,  ना कुणी तूझे पंख छाटावे! पाण्याविना तूला कुणी ना तडफडावे,  म्हणून दिपस्तभांसारखे तूला मार्गदर्शन करणारी! पण तूला कसे ते रूचावे? तूला वाटते हीने माझ्या रस्त्यात,  मधे मधे का यावे? जेव्हा तूझ्या- हातावर असलेली आईच्या मायेची पकड सैल पडावी कळीचे तू फूल व्हावे,  भ्रमराने तूला सतवावे,  आईचे मग बोल आठवावे,  सहचर्याला तू निवडावे,  आईचे तू आईपण घ्यावे,  तूच बरोबर म्हणून डोळे टिपावे,  इतुक...

दर्द

 दर्द दूवा है दर्द दवा है दर्द वो अहसास है , जहाँ देनेवाला  बदनाम है Varsha Patil. ©® Bsc(micro) DMLT.  9819406813 Uran

ती

   अजूनही ती तशीच आहे का?    सोन चाफ्याच्याफूलापरी!    अजूनही ती तशीच दिसते का?    मावळत्या सूर्यकिरणांनीआरक्त      झालेल्या आकाशापरी!      तीच आमची सखी होती.      तीच आमची मैत्रीण होती.       अजूनही ती तशीच अवखळ हासते का?      खळखळत्या निर्मळ झऱ्यापरी!      मोरपिसी स्पर्शाविना अजूनही ती तशीच        लाजते का?      मी ही कुठे इथे मस्त आहे,      मी ही इथे कोमजलो आहे,      बकुळीच्या फुलापरी!      पण राखून आहे गंध तयाचा!       जेव्हा स्पर्श होता मखमली! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 Varsha patil. ©® Bsc DMLT.  9819406813 Uran.

भावना

 9/6/95  कधी कधी भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात  मग् अश्रुच मदतीला येतात. भावनाशील् माणूस कर्तव्यशून्य असतो. पण भावना जगायचा मार्ग दाखवतात. कर्तव्यनिष्ठ माणूस भावनाशून्य असतो. आपल्या कर्तव्यात जगायच देखील असत हेच विसरतो वर्षा प्र पाटील.©® उरण(नवी मुंबई).

महाल

इमेज
 चारित्र्याच्या नावाने टाहो फोडणार्याला, खिडकीतून सतत देवदासीचा महाल दिसत असेल तर....  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 वर्षा प्र पाटील. ©® उरण (नवी मुंबई) 

हार

इमेज
  एखादा फडात उतरल्यावर  आपली हार निश्चित आहे.  हे समजल्यावर, त्याला तालमीतच उतरून दिलं नाही?  तर.......  जीत एकाच बाजूने होते की?  दोन्ही बाजूने....  वर्षा प्र पाटील©® उरण (नवी मुंबई) 

अस्तित्व

 पावसाचा थेंब म्हणत डबक्यात पडण्यातपेक्षा शिंपल्यात पडलेल्या ब्ंर!  सुर्याच्या तिरीपीने डबक्याच  अस्तित्वच संपत.  शिंपल्यात पडून मोती बनून,  जीवनाला अमरत्व प्राप्त होतं.  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  वर्षा प्र पाटील. ©® उरण (नविन मुंबई)  जीवनाला अमरत्व प्राप्त होतं. 

योग साधना

इमेज
माझं शालेय जीवन संपले, नी मी काँलेज ला जाण्यास सुरूवात केली. शाळेतील मधल्या सुट्टीत, पी. टी. च्या तासाला खेळताना होणारा व्यायाम बंद झाला. अर्थात दररोज घरातील कामे,विहीरीचे पाणी शेंदून गाईगुरांना पाणी नेवून पाजणे, झाडांना पाणी घालणे, पीठ मिळणे वाटण वाटणे, हा व्यायाम होत असे. पण तरी शाळेतील खेळ, कसरती बर्यापैकी कमी झाल्या होत्या. मी सुट्टीत माझ्या आत्याकडे गेली. तिथे माझी आते बहिण योगा क्लासला जात असे. अर्थात आता जसे उघड्यावर योगासना करतात. तसे न करता बंद ़खोलीत करत असे. मला शिकायचे तर होतेच, पण त्याहून कसे करतात पहायचे होते. खूप आढेवेढे घेतल्यानंतर तीने मला व तिच्या लहान बहिणीला पहायला खोलीत प्रवेश दिला. ३-४दिवसांनी मग तीने मला योगासने शिकवला सुरूवात केली. तिचे पाहून मी करत असे. आम्ही तिघीही थोड्या स्थूलते कडे वळत होतो. त्यामुळे घरी आल्यावर मी तिचे, पाहिलेले, व शिकवलेले योगासने ,नित्यनियमाने करू लागले. कारण मला स्थूल मुळीच व्हायचे नव्हते.त्यावेळी मी रहात असलेल्या शहरात योगा क्लासेस नव्हते.  माझे काका तेही मुंबईलाच रहात असतं त्यांनी संपूर्ण योगा क्लासेस केले होते. व योगदान म्हणू...

लेखणी:

  आपल्या तोडांतून ध्वनी बाहेर येतो. हे मानवास समजले. मग त्या ध्वनींच्या माध्यमातून स्वर, अक्षर शब्द भाषा व लिपी उदयास आली. वाल्मिकी ऋषीनी पहिले रामायण हे महाकाव्य रचिले.  पूरातन काळी लिहिण्यासाठी पक्षांची पिसे, लेखणी म्हणून वापरीत, मोरपीस हे लांब ,रूंद, आकर्षक  असते म्हणून त्याचा वापर होत असे, विविध जंगली फळांचा गडद रस शाई म्हणून वापरली जात असे.  महाभारत लिहीताना व्यास ऋषींनां बुद्धीमान लेखनीक हवा होता , म्हणून त्यांनी गणपतीस निवडले, गणपतीस लिहायचा कंटाळा होता, म्हणून त्यांनी मी न थांबता लिहीन. जर मी लेखणी थांबवली, तर पूढे लिहीणार नाही. असे व्यास ऋषींनी सांगितले . व्यास ऋषींना विचार करायला वेळ हवा होता. म्हणून त्यांनी मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजल्या शिवाय लिहायचे नाही, असे सांगितले. पूढे लिहीत असताना गणपतीस लेखणीचा त्रास होवू लागला, म्हणून त्यांनी आपला दात तोडला. व त्याची लेखणी बनवून महाभारत लिहीले. व स्वत: एकदंत म्हणून प्रसिद्ध झाले. (एकप्रकारे त्यांनी हस्तंदती लेखणी वापरली. )  त्यानंतर गेरू, ही बांबूच्या किंवा इतर झाडाच्या छोट्या लवचीक काड्या तासून त्याप...