पाऊस भाग१८
हाँस्पिटल मध्ये शर्वरीने लँब असिस्टंट ला विचारले त्या दिवशी खूप पाऊस पडला तेव्हा तू खरोखर आजारी होतास की पाऊस बघून आला नव्हतास, की वेधशाळेच्या इशार्या नुसार आठवड्याची रजा टाकलीस.
नाही मॅडम मी इतका नीच नाही ,मी खरंच आजारी होतो, एखाद्या लांबच्या बहिणीनी सांगितले तर.. .असा वागू शकतोस ना?
मला माझी नोकरी घालवायची नाही. तूम्ही मला कशातही अडकवू शकता? जसं तिने माझ्या नवर्याला आडकवलं
शर्वरीने एक उसासा टाकला, मी ती नाही ना! मला नाही वागता येत तसं!
काही झालं का? मी जाँब सोडते. का? माझ्या नवर्याची बदली झालीयं त्याच्या बरोबर शिफ्ट व्हायचं आहे? खरच! तूम्ही पण जाणार आहात, कारण दोनही सिसटर काही वेगळं बोलत होत्या, तुमच्या बद्दल .
काय बोलत होत्या..
तुम्ही त्या दिवशी डॉ. बरोबर होतात म्हणून तूमच्या नवर्याने तुम्हाला सोडलं! शर्वरी हताश झाली. गोष्टी घडायच्या आगोदरच पसरतात, की आधी पसरतात मग घडवतात.
लँब मधल्या गोष्टी तू सिस्टरशी शेअर करतोस तेही दररोज.. .
हो तसं लँब मध्ये सिरियस लपवण्यासारखं काही नसतं सहज बोलून जातो, त्यात काय?
मी एक महीना रजेवर जातेय तूला असिस्टंट मागून घे, करून
शर्वरीने एक महीना रजेचा अर्ज टाकला.
संध्याकाळी पायलला घेवून घरी गेली. दार उघडलं घरातील दिनेशचं सामान, बँग त्याचे कपडे नव्हते, तो बहुतेक मेघना कडे निघून गेला होता.
तिने पायलला बेडवर ठेवलं नी स्वतःला झोकून दिलं येण्यासारखं काही नव्हतं, तीने फ्लॅट ओनरला फोन केला,रेंटं पेड होतं, पायलची बँग भरली आईला मी येते सांगून लाँक लावून तीने रिक्षा गाठली. ...
सकाळी टेंपोत सामान भरून सरळ आईच्या घरात टाकलं, लावे पर्यंत आठवडा गेला.
नोकरीत त्या सिस्टर, तो असिस्टंट तिला नको होती. अगदी डॉ अमोघ सुद्धा.. ...
पायल साठी जाँब करणं गरजेच होतं तिने नविन जाब शोधणं सुरू केलं. . .
दारावरची बेल वाजली तशी शर्वरी दचकून विचारातून जागी झाली.
दारात आई उभी होती. बरोबर 10 वर्षाची गोड मुलगी होती.ही कोण? अग थांब सांगते ,घरात तर येवून दे, मुलीला हात धुवून चहा, खाऊ देवून पायल बरोबर खेळायला दिलं नी आई चहा पिता पिता सांगू लागली, अग भाजी मार्केट मध्ये माझी जुनी मैत्रीण भेटली, गप्पा मारता मारता चल घरी म्हणाली, गेले मग! तिच्या मुलाची मुलगी आहे, आई गेली सोडून 3 वर्ष झाली. आजी आजोबा बरोबरच रहाते ,म्हटलं येतेस का घरी, पण रहावं लागेल, रात्री लगेच परत येता येणार नाही, लगेच तयार झाली. आले मग घेवून ,बाप रात्री कामावरून येतो तेव्हा झोपलेली असते..मला तिच्यात आपल्या छोटया पायलचं रूप दिसलं, येताना तिच्या आवडीच्या भाज्या आणल्यत,आणि छान ताजे पाव पण आणलेत,छान पाव भाजी कर...
अग मी कणिक मळलींय त्याचं काय करू, ?सांगितल कुणी तूला मला न विचारता स्वयंपाकाची तयारी करायला म्हणत शर्वरीची आई छोट्या दोघींशी खेळायला निघून गेली.
समाप्त .
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा