पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कात भाग(२)31/1/2022

   दररोज आता मंजी (ती) गुरं घेवून कुरणातल्या मैदानात न थांबता दाट जंगलात गूरं सोडून त्या मुलांच्या झोपडी जवळ जावू लागली,  त्यांना  भाकर्या जेवण करून देवू लागली. ती थांबत असे तो पर्यंत  त्या पोरांचा  बाप पलीकडच्या  बाजूला असलेल्या गावात उतरून हव्या त्या वस्तू  आणत असे कारण आता त्याला मुल ंंएकटीच झोपडीत टाकून जायला लागत नव्हते.  एक महीना तिने आपला दररोजचा परिपाठ चालू ठेवला, दवबिंदूत भिजलेलं ओलं कुरण खावून गाई म्हशी भरपूर दूध देवू लागल्या, तशी भावजय  खुश झाली.  आपल्या मुलांना सांभाळायला, आपला संसार  सावरायला एक बाई मिळते, हा विचार करून त्यांनी मंजीला माझ्या झोपडीत कायम येवून राहशील का?माझ्या दोन लहान मुलांना सांभाळशील का?  विचारले.  तिच्या मनात हा विचार असला तरी घरी भावाला सांगणे तिला जमण्यासारखे नव्हत तिने दोन दिवसात झोपड्यात रहायला येईन. पण परत कधी मला तोडून गावात जायची वेळ येता कामा नये  सांगितले. आता ती खुश झाली होती.  तिने घरी जावून पेटारा   खोलला  साड्या काही  आणखी जुने नवे कपडे बेचक्य...

कात भाग (१)13/1/2022

  ती काम आटपून परसात झाडाखाली चौपाई वर बसली होती. अचानक तिचे लक्ष झाडाच्या बुंद्याजवळ गेले. पांढरीशुभ्र जवळ जवळ सहा फूट लांब कात पडली होती. जनावर कात टाकून चकाकतं अंग घेवून त्यातून बाहेर पडल होतं, ती विचार करत  बाजूवर पहुडली  काय? चुकलं होतं तिचं ! ती अशिक्षित असली तरी तिलाही मन होतं,  आपला जीव प्यारा होता.  घरात नवरा दोन  नणंदा, दिर, सासु सासरा, नवरा मंद कुणीही काहीही सांगितले  तर  नंदी बैलासारखी मान डूलवायचा,  आणी डोक्यात  राख घालून घरी येवून वायकोला  मारायचा सासू सर्वाशी गोड गोड बोलायची पण घरात फटाकडी कधी चुलीवर पडेल नी वाजेल नेम नाय, सासरा बेरकी, बाता करण्यात पटाईत ,इथे चौर्या कर मार्या कर. लबाड्या कर.नणंदा छचोर, कामचोर, लाडीक नटण्याथटण्यात पटाईट! दिर रागीट जणू डोळ्यातच विष ओढलेल्या नजरेचा ,त्यात पाण्याची पंचाईत उन्हात, तासनतास चालत जावून सात सात भांडी डोक्यावर घेवून यायचं, इतक्या माणसाचं कपडे रोज एकटीन धुवायचं, जेवणं करायची! भांडी घासायची नी डोंगर  धुडाळाला जायचं,  नकळत तिच्या डोळयात पाणी  चमकलं,आकाशत नजर लावत ति...

मिलन

  तुम्हारे एक मिलन को  न्यौछावर कर दिया  अगले  हजारो  मिलन के लिए....... वर्षा पाटील©®🌹

सिलसिला

  गुनाह किसी और ने किया और  ख्वाब हमारे तुट गए  कत्ल किसी और ने किया और सजा हमने पायी बेवफा  कोई और था और बदनाम हम हुए मकान किसी और ने तोडा और बेघर हम हो गए  पैगाम किसी और के लिए था, और मरना हमें पडा.... ये सिलसिला बरसों से चालू रहा,रोकने वाला कोई न था..  हाथ अपनोंने छोडा  थामने वाला कोई न था... . वर्षा पाटिल ©️®️🌹

इज्जत(लाज)10/2/2022

 लड़की के सिर से दुप्पटा  गिर जाए, तो लडकी  की इज्जत (लाज)नही जाती...  बुरे नजर से देखने वालों की नियत दिखती है... वर्षा पाटिल ©️®️🌹

अंदाज 10/2/2022

 अंदाज नव्हता मला     तुझ्या वाराचा     बेसावध क्षणी   केलेल्या घावाचा!  नव्हतेच कधी बंध जोडण्याचा प्रश्नच नव्हता तुटताना मात्र अंदाज नव्हता तुझ्या खेळीचा ! वर्षा पाटील ©️®️🌹

अनुभव

 चांगल सुचायला आयुष्यात काहीतरी चांगल असायला हवं ना? 🤔अनुभव जसं असेल तसे लिहायला सांगणार ना?  वर्षा पाटील ©®🌹

उसूल2/2/2022

 जिंदगी के कुछ उसुल होते है ,  कुछ पाने के लिए वो तोडना,   या शाॅर्टकट अपनाना  ये मंजूर नही, वर्षा पाटील. ©®🌹

लब्ज2/12/2022

 दो लब्जों से जिंदगी    संवर जाती है,   या उजड जाती है,   हर एक लब्ज की   अलग कहानी.   वर्षा पाटील.©️®️🌹

किंमत 02/02/2022

 एखादा तूम्हाला डावलून दुसरीकडे जातो, तेव्हा तुमची किंमत शुन्य ठरवायचा प्रयत्न होतो. पण आपल्याला नाकारणारा ज्ञानी असेलच असं नाही. तो मार्ग  चुकलेलाही असू शकतो, किंवा त्याचंं अतिंम ध्येय हे आपल्या ध्येयापेक्षा, किंवा आपल्या कडील असलेल्या गोष्टी/विचारापांसून वेगळ असू शकतं  वर्षा पाटील©®🌹

दानशूर 4/02/2022

 दुसंर्याच चोरून स्वताची  झोळी भरली  आणि  कितीही श्रींमती वाढली तरी ती  भीकच असते, आणि कितीही दानशुराचा  आव आणला तरी पुण्य ज्याच चोरलं  त्याच्यच पदरी....  वर्षा पाटील. ©️️ ®️🌹

प्यार

 क्या प्यार  दुश्मनसे हो जाए  तो वो दुश्मनी भूलाकर  प्यार मे बदल जाएगा,  या वही मौके का फायदा  उठाकर हमें  जिंदगीसे उठा लेगा प्यार क्या सोच समझकर करने की  चीज है?  वर्षा पाटील. 🌹©®

गलती

 एक बार प्यार मे धोका खानेवाला  बार बार वहीं गलती नही करेगा?  उससे क्या होगा सचमुच का प्यार भी  उसके नशीब मे  नही होगा एक बार दुध से मुहॅ जलने के बाद  छाछ भी फूंक फूक कर पी लेते है   वर्षा पाटील©®🌹

भावना

 शब्दाला अर्थ असतो तसेच त्याने भावना व्यक्त करता येतात.म्हणूनच सात्वनांपर भाषणं प्रेमपत्र, लिहीली जातात.लिहीलेल़ एखाद्याला समजत नसेल तर त्याची समज/बुध्यांक कमी असतो.भाषा ही भावना व्यक्त करण्याच़ माध्यम आहे भावना कळत नसत्या तर प्रेम कविता लिहील्याच गेल्या नसत्या. इतकच आहे की कोमल मनाला त्या जितक्या भिडतात तितक्या कठोर अंत:करणावर आपला प्रभाव टाकू शकत नाही.  वर्षा पाटील. ©®🌹

विश्वासघात

 काल मी तूला दुसरीच्या  मिठीत पाहीले, आणि  प्रेमावर  लिहीलेली  कविता हारले  वर्षा पाटील©️®️🌹

साथ

 अपनोनें साथ छोडा तो लगा  प्यार धोका नही देगा.. 🌹 लेकीन प्यार ने कहा, मै  अकेला क्या कर सकता हूँ  जब काफीला तुम्हें छोडकर  आगे निकल गया....  मैंने कहां , मै जिकर क्या करू जब रब नेही साथ छोडा... वर्षा ©️®️🌹

मोम

 जब गुस्सा हो जाओगे  तो मोम की तरह  पिघल जाना  दुसरो को रोशनी  देकर तुम खुद  नम हो जाना  दुसरो के जिवन का अंधेरा  मिट जाएगा  धागा भी खत्म होगा  तुम बिखर के  रह जाओगे खुद को समिटकर  अस्तित्व बनाकर  रखना ....🌹 वर्षा पाटील©️®️🌹

छटा

 एकाच माणसाचे वागणे हे दोन वेग वेगळ्या माणसांशी वेगवेगळे असते. त्यामागे प्रेम, स्वार्थ, मैत्री, शत्रुता,आपुलकी, ऋणानंबध , अशा अनेक छटा असतात, आणि  एका साठी तो चांगला व दुसर्या साठी तो वाईट असतो. दोघांसाठी त्याचा भिन्न  स्वभाव ,हा त्याच्या वैयक्तिक, फायद्यातोटायावर अवलंबून असतो. 🌹 वर्षा पाटील©️®️🌹

आठवण

 भंगलेल्या वास्तूचे रूप पाहून मला उमजून  आले.   आपल्या प्रेमाची साक्षही  आपली साथ सोडू पाहते,  तो वळणा वळणाचा रस्ता  आता डांबरी होवून राहीला    तो झाडावरील  कोकीळ  साद घालीनाशी झाला,  खळखळता  झराही आता नाल्यात जमा  झाला.    खेळलेले खेळही  आताशी इतिहासजमा झाले.  आंबा बोरीची झाडे जळिफाट्या मध्ये गेली  आताशी मलाही तुझी  आठवण होवू लागली.  वर्षा पाटील. 🌹©️®️

प्रेमभंग

 जेव्हा शब्द ही भावना व्यक्त करायला नकार देतात.....  जेव्हा डोळे ही बोलावयास  नकार देतात. . ज़ेव्हा ओठही विलग होताना   थऱथरतात ... तेव्हा प्रेमभंगाची लक्षणे दिसू लागतात.  वर्षा पाटील. ©️®️🌹

संयम

 निस्सीम प्रेम ,वागण्यात सहजता, वाईट गोष्टीपासून चार हात दूर,  आणि कधी वाट चुकलातच, तर मनावर संयम ठेवा ,तुम्ही कधी कुणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आणि जीवनात अर्धा अधिक  ताण निघून जाईल.  वर्षा पाटील©®🌹

एनर्जी

 तुम्ही कारण नसताना जेवढ्या धुर्त  खेळी खेळाल, तेवढे त्या रचण्यात आणि कुटील चाली खेळण्यात आपली चांगली एनर्जी  फुकट घालवाल. वर्षा पाटील©®🌹

विचारांच पुस्तक 3/2/2022

 दुसर्‍याने लिहीलेलं चोरुन आपल्या नावाने प्रसिदध करता येईल. पण विचारांच पुस्तक चोरता येईल का कधी?  वर्षा पाटील ©®️🌹

क्षल्य

 काहीच अपेक्षा नसताना एखादी गोष्ट मिळाली तर त्याचा आनंद वेगळा असतो, अपेक्षाभंगाच क्षल्य टोचत रहात.. वर्षा पाटील©®🌹

क्षमा

 पून्हा एकदा मी तूझ्या दाराशी आले,  चुक झाली म्हणून क्षमा मागून गेले.  क्षमा मिळाली,दर्शन ही मिळाले अपराध नसताना मला अशी  कोणती शिक्षा मिळाली  वर्षा पाटील©®🌹

मी

 तुझ्या कडे "मी "होते,  पण "मी" नव्हते,  तुझ्या मिठीत "मी "होते  पण "मी" नव्हते,  तू मला गोंजारले,  तू मला कुरवाळले  तरी "ती" "मी" नव्हते,  तु स्पर्शले ,ते "मी "जाणीले  तरी ''तीी'' "मी "नव्हते,  कान्हाने राधीकेला छेडले,  ते सत्यभामेने हेरले  रुख्मिणीला स्पशले,  कशी सांगू मी 'हे ' "प्रेम"  त्या प्रेमाहून ''वेगळे. ..''   वर्षा पाटील ©️®️🌹

विस्थापन

 तूझे आणि माझे जीवन पाण्यात पडलेले आपलेच प्रतिबिंब! तू काठावर अन मी पाण्यात.....  आपले ‘जिवन,‘ कितीही सारखे असले तरी एकत्र नाही येवू शकत. . तूझ्या विस्थापनाने माझे अस्तित्व संपून जाते   वर्षा पाटील ©®🌹

पहाट

 जिवनाला काही अर्थच नाही उरला असे जेव्हा वाटते ,तेव्हा सर्व स्वप्न भग्न  पावलेली असतात, पण पहाट मात्र  व्हायची राहून गेलेली असते.   वर्षा पाटील. ©®🌹

शापित बाळे

 स्वर्गातील शापीत बाळे  अवनीवर येवून पडतात,    शांत तेजस्वी चेहर्याने               आपले वेगळे  अस्तीत्व   दाखवू पाहतात...   निसर्गात लीन होतात,    आपल्या परीने जगू   पाहतात, पण....   पातकी आत्मे आपल्या   क्रुरतेने, त्यांचे   जिवन उध्वस्त    करतात.    वर्षा पाटील.©®🌹 उरण नवी मुंबई 

स्वप्न

 कशी असतात ना,  स्वप्न आपली, ? पूर्णत्वाला येतात,  तेव्हा आयुष्याची संध्याकाळ झालेली असते.  तरी त्यातूनच पहाटेची  वाट पहायची असते.  वर्षा पाटील. ©️®️🌹

भ्रम

    गोड बोलून फसवण्यापेक्षा,     खरं बोलून आपली नियत       दाखवावी, म्हणजे माणूस       भ्रमात रहात नाही.  वर्षा पाटील. ©®🌹

विश्वासाचं नात

 असं विश्वासाचं घट्ट नातं  तयार करा,  की कुणीही कितीही त्यात काटा घातला तरी त्यात कटूता येणार नाही. लबाडी/कपटानी नाती संपुष्टात येतात, आणि  त्यांनी मिळणारा फायदाही दिर्घकाळ नसतो.  परत तसंच  विश्वासाचं नातं त्याच  माणसाशी तयारही करता येत नाही. वर्षा पाटील.©®🌹

गणित

 एखाद्या  माणसाने आपल्याला मदत केली असेल किंवा आपल्यावर एखाद्याचे उपकार झाले असतील, नकळतपणे त्याच्याकडून सेवा घडली असेल तर त्याचे आभार माना, परतफेड करता  आली  नाही तरी चालेल, पण गरज संपली की  त्यालाच धडा शिकवण्याचे गणित करू नका.  वर्षा पाटील©️®️🌹

शिक्कामोर्तब

 तुमचं लिखाण 📝तुम्हीच लिहीता ✒️यावर तुमच्या नावाचं  🖊शिक्कामोर्तब 📧असतं की दुसर्या दिवशी  त्यावर कुणी हक्क 🔨दाखवतं मला पडलेला गहन प्रश्न ❓‼️🤔🤔 वर्षा ©️®️🌹

ताण-तणाव

 निस्सीम प्रेम ,वागण्यात सहजता, वाईट गोष्टीपासून चार हात दूर,  आणि कधी वाट चुकलात, तर मनावर संयम ठेवा ,तुम्ही कधी कुणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आणि जीवनातील अर्धा अधिक  ताण तणाव निघून जाईल.  वर्षा पाटील©®🌹

एनर्जी

 तुम्ही कारण नसताना जेवढ्या धुर्त  खेळी खेळाल, तेवढे त्या रचण्यात आणि कुटील चाली खेळण्यात तुमची चांगली एनर्जी  फुकट घालवाल. वर्षा पाटील©®🌹

व्यवहार

 पैसा हे व्यवहाराच माध्यम कधीपासून आहे, हे माहीत नाही, पण ते माणसाला इतकं प्रिय झालं की.त्यासाठी लोक माणूसकी,भाउबंदकी विसरून गेले.त्याने जी जी सुख लाभू शकतात ती ती मिळवू लागले. त्यासाठी आपल्या आतल्या आवाजाला दाबून चोर्या,लुटमार,दरोडे घालू लागले. प्रंचड अफरात अफर करू लागले. पैसा हे फक्त व्यवहाराचं साधन आहे हे लोक साफ विसरून गेले.पण काही व्यक्ती इतक्या नीच असतात की ते एखाद्याच्या नशीबातील काढून तिसर्याच कुणाला तरी देतात. ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, वडिलोपार्जित ,        ( उच्च शिक्षित,व्यापारी डोक्याने एकाजागी बसून कमवतात) स्वत : कमावलेला पैसा त्याला मिळू नये म्हणून हजारो उच्चापात्या करतात. जसं आपल मन आपलं शरीर सुख लोलुप असतं तसं प्रत्येक नश्वर  शरीर उंची कपडे, दागिने, सौर्दयप्रसाधन वापरण्यास इच्छुक असतं. सांगण्याचा मुद्दा ज्याचं त्याच्यापाशी रहावं म्हणून बँक नावाची सुरक्षाव्यवस्था सुरू केली.आता बँकेतही डोक्यात किडे वळवळणारा माणूस नावाचा क्षुद्र प्राणी आपल्याला  नेमून दिलेले काम न करत,आपल्या कामाशी प्रामाणिक न राहता त्यातही भ्रष्टाचार, अफरात अफरी करू लागल...

उंची

 एका ठराविक उंचीच्या श्रींमतीनंतर  सारे जनहितासाठी असते. आणि तो माणूस जगाला आदर्श असतो. पण ती उंची त्याच्याजवळच असायला पाहिजे.  वर्षा पाटील ©®🌹

चूका

 चूका करून चुकातूंन शिकण्यापेक्षा चुकाचं करू नका, त्यासाठी आईवडिल/इतर योग्य गुरू निवडा, चांगल-वाईट काय ह्याची योग्य जाण ठेवा. यश हात जोडून तुमच्या जवळ उभं राहील.  ©®🌹

काम

 दुर्लक्षित  केलेला माणूस कोलाहल पासून दूर आपलं हवं ते काम सहज पार पाडून जातो. ते इतरांच्या तुलनेत दुय्यम असलं तरी त्यात अडथळे  नसतात.  वर्षा पाटील©️®️🌹