मनोगत
मनोगत हे पुस्तकाच्या पहिल्या पानावर असलं तरी ते पुस्तकाचा तपशील लिहीलेलं व सर्वात शेवटंच पान असत. सर्वात आधी वाचल्याने कथांची माहीती होते.
पुस्तक लिहायचं असा चंग वगैरे करून मी इतक्या कथा लिहील्या नाहीत, तर कथा सुचत गेल्या त्यावर खुप जणांनी हक्क दाखवून अडथळे निर्माण केले लेखक म्हणून स्वताची नाव लिहायचा प्रयत्न केला. तरी कथा पुर्ण केल्या कारण लेखकाला, लिहील्या शिवाय चैन पडत नाही.
सगळ्यात आधी मी होळी ही कथा लिहीली, ती कथा मला सुचली ती मी आधीवासी भाषेत लिहीलेली आहे,ती लिहीताना मी त्यांच्या बोलीभाषेत ती कथा लिहीली, ती लिहीलेल्याला ७-८ वर्ष झाली.मोबाईल मधील शुद्ध भाषा त्यातील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहीत असे व मला ते परत बदलून त्यांच बोली भाषेत लिहावा लागे. मला ती भाषा अवगत करावी लागली नाही, तर त्या जीवन मानाची "ठाकूर" जमातीची लोक दरवर्षी शेतीची कामं, होळीत झाडे डुखण्यासाठी/तोडण्यासाठी आमच्या घरी येतं, मी लहान होती त्यामुळे त्यांची भाषा अवगत झाली होती. व मी त्या भाषेचा उपयोग, कथा लिहिण्यासाठी केला.
विदुषी म्हणजे हुशार स्त्री हे मी कथेचं नाव लिहीलं, पण नायीकेचं नाव वेगळे लिहीलं पण ब्लॉग वर वाचताना विदुषी का लिहीलंय हे सामान्य वाचकांना कळतं नव्हतं, मग मला त्याचा अर्थ लिहावा लागला,
पुस्तक हे बहुतेक सर्व कथा नायीकाप्रधान कथा असलेले असले तरी ,स्वताच्या/इतर कुणाच्या जीवनावर प्रेरीत होवून मी त्या लिहीलेल्या नाहीत.जे सुचलं, स्फुरले ते लिहीत गेले, आणि नवनविन कथा साकार झाल्या.
हे पुस्तक व कथा नक्कीच तुम्हाला आवडतील.
"शेजार" ही कथा माझं शेजार्याच्या बद्दल स्वप्न होतं, जे पुर्ण नसलं तरी कथा मात्र लिहायला त्याचा उपयोग झाला.आपल्याला आई वडिलांचा आधार देणारे, वेळ प्रसंगी मदत करणारे शेजारी असावेत, तसेच, त्यानाही वयोमानानुसार आपण मदत करावी, हा त्या कथे मागचा हेतू.
माझ्या कथांवर माझ्या लहानपणीचा पगडा आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर, होळी ह्या कथेतील नायक मुलगा, "पैका" कथेतील नायक मुलगा माझे बाल मित्र आहेत. मासे पकडणे, हा छंद मी जोपासलेला आहे. कथेतील मुले, मला माझ्या लहानपणी भेटलेली आहेत. "कात " आणि कर्ज, ह्यातील गरीबी मी माझ्या लहानपणी अनुभवलेली नसली, तरी अगदी जवळून पाहिलेली आहे, "कंपनी" ही 'कथा' ही माझ्या गावा जवळ स्थापित झालेल्या मोठय़ा कंपनी वरूनच मला सुचलेली आहे. लहानपणापासुन आता पर्यंत मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे "जत्रेला" हजेरी लावणे. त्या जत्रेचाही मी माझ्या कथे साठी वापर केला. लहानपणापासुन खिडकीत बसुन अनुभवलेला "पाउस" कथेसाठी मला पानावर उतरवासा वाटला. माझ आवडते पेय "चहा "आहे, त्याचे "मळे" मला माझ्या लहानपणापासून "प्रिय " चहाचा पानांचा आस्वाद घेतल्यावर आनंदाने उड्या मारणारी "बकरी " आणि त्याने नव्याने गावसनारे " पेय "मला प्रिय, मी तेही माझ्या स्वप्निल मनाने "नूर " कथेद्वारे कागदावर उतरवले."पुनर्जन्म" ही कथा मी त्या वलयांकित शब्दामुळे लिहिली. त्या बद्दल मला कुतूहल होते. आणि मी लिहिलेल्या कथे, सारखेच काहीतरी आसवे म्हणुन लिहिले. "दरवळ" ह्या शब्दातच एक गोड जाणीव आहे. तो तरलपणा मी फसलेल्या, पण हुशार नायिकेच्या प्रेमकथेतून मांडलाय. मी वयाच्या 13-14 व्या वर्षी पहिली कथा लिहिली ती अंकात छापायलाही दिली, पण ती काही छापुन आली नाही. मग मात्र माझ्या खट्टू मनाने सुचेल तसे लिहिले पण छापण्याचे धाडस केले नाही.
"तांबडी माती" ह्या कथेतील मुलगा जरी काल्पनिक आसला, तरी बैलगाड़ी शर्यत/त्यातून प्रवास 'गाई बैल,' "गोठा"हा लहानपणी माझ्या जीवनाचा भाग होता. कथातून माझ बालपण, उमटलेले असले, तरी त्या कथा माझ जीवन गाणे नाहीत. पण त्या माझ्या जवळून वाहणारा झरा मात्र आहेत. ज्या मला माझ्या बालपणाची ओळख दाखवून वेडावून निघून जातात.
पुस्तकाची लेखिका
वर्षा प्र. पाटील.
बी.एस.सी(मायक्रोब्राॅयलाॅजी)
डी. एम. एल. टी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा