पाऊस भाग ४
तिने इंटरकाँम वरून सिस्टर्स फोन लावला पाऊस पडतोय, मला आज असिस्टंट नाही मी उद्या लवकर येवून टेस्ट केल्या तर नाही का चालणार? नविन डाँ. चा पेशंट आहे, टेस्ट अर्जंट आहेत म्हणूनच सांगितलं, ठीक आहे, मी येते, म्हणून तिने फोन खाली ठेवला.अँडमिट आणि बाहेरील पेशंटच्या फाईल मध्ये रिपोर्ट लावून इनडोअर पेशंटची फाईल व कलेक्शन किट घेवून शर्वरी वार्ड मध्ये गेली. पेशन्टचे ब्लड खूप गेले होते व तो अल्कोहोलिक होता, त्यामुळे त्याचे एचबी अर्जंट हवे होते. शर्वरी लँब मध्ये आली. ब्लड सेटल करत ठेवले, स्वताची बँग आवरली काँम्प्यूटरवर पेशंटचा रिपोर्ट नाव नंबर सहित फीड केला सर्व मशीन परत आँन केल्या, भराभर टेस्ट सुरू केल्या टेस्ट भरपूर होत्या . सकाळी बरोबर आलेली नर्स ड्युटी संपली मँडम निघुयात का? म्हणून विचारायला आली इतर वेळी ठीक पण पावसात गाड्यंची गडबड अशा वेळी तिला थांबवणं ठीक नव्हत.अजून तिचं बरच काम बाकी होतं, नर्स निघून गेली. पटापट शर्वरीने काम संपवलं. घड्याळात पाहिलं चक्क एक तास जास्त होवून गेला. नेहमीपेक्षा तिने वाँशरूम मध्ये जावून वाँश घेवून फ्रेश झाली. वाँर्डबाँय कडे रिपोर्ट फाईल दिली. व पर्स घेवून लँबला लाँक लावून चावी काऊंटरवर परत वाँर्डबाँय कडे देताना वाँर्डबाँय म्हणाला :- मॅडम इतका वेळ नव्हत थांबायचे गाड्यांना जाम गर्दी आहे. टँफीक पण खूप आहे. पाउस पण खूप कोसळतो आहे .बरेच जण आज लवकर सटकलेत तूम्ही पण जायचं , तुमची लहान पोर आहे. सकाळपासून दोनदा फोन झाला होता परत तिने काऊंटर वरून पाळणाघरातील काकूंना फोन केला. कदाचित टृँफीक मध्ये अडकली तर मी येईपर्यंत पायलला थोड सांभाळा मला घरी पोहचे पर्यंत फोन करता येणार नाही.त्या बर म्हणाल्या
.पँसेज मध्ये खूप गर्दी होती पेशंटच्य नातेवाईकांची. जो तो घरी जायच्या गडबडीत होता. पाउस धूवांदार कोसळत होत्या छत्री असूनही तिचा काही टिकाव लागणार नव्हता .हाँस्पिटल कॅम्पस मधील परिसर उथळ असल्यामुळे किती पाणी साचलं ह्याचा अंदाज येत नव्हता, तिने पाण्यातून चालायला सुरूवात केली. हाँस्पिटल कॅम्पस संपायच्या आत तिच्या बाजूला एक कार येवून उभी राहीली.मघाचचा डॉ.त्यची गाडी घेवून होता. तो म्हणाला या मॅडम माझ्या पेशंटमुळे तुम्हाला लेट झाला ती संकोचली. स्टाँपवर बस मिळली नाहीतर दोन्ही जायचं ,तिला पायलसाठी लवकर घरी जायचे होते. दार उघडून शर्वरी गाडीत बसली. गाडी सुरू झाली.. ......
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा