टिंब

 


माणसाचा जन्म होतो, तेव्हा तो एक शुन्य किंवा टिंब असतो त्याच्या आईशी त्याची नाळ जुळते, तेव्हा त्यांच्यांत एक ममतेच नातं निर्माण होतं, तेव्हा दोघांच्यात एक रेख निर्माण होते. मग गणिती नियमा नुसार भाऊ, बहिण, आजी, आजोबा,बाबा अशी त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन नात्याचे कोन तयार होतात, ही कडी जोडत एक वलंयाकींत वर्तुळ तयार होत, व मग वर्तुळाचे चक्र,किंवा चाक तयार होवून गतीमान जिवनाचा प्रवास सुरू होतो.अहंकाराची चकाकी त्या चक्रावर चढून प्रगतीची एक एक अरि त्याला जोडत जाते. आणी माणूस त्याने आपल्या अस्तित्वावर अहंकारी होतो. व त्यापुढे त्याला सर्व तुच्छ वाटते. हळूहळू नात्यातील सुंदर वीण विस्कटून वर्तुळातील एक एक टिंब निखळून अष्ट, सप्तकोन करत एक एक नातं गळून पडतं .चक्राचे एक एक आरे निखळते. आणि कुठेतरी एका टिंबाला जोडून एक रेख राहते. जसा जिवनाचा प्रवास सूरु झाला होता ,तशाच टिंबावर येवून जिवन पून्हा शुन्य होतं.  एका मोठ्या शुन्यातून परत जन्मताच होता तसा छोटा शुन्य.जिवनाच्या डबगाड्यात तो टिंबही केव्हातरी पूसून जातो. 
पृथ्वी ही एक भलामोठा टिंब  आणि ब्लॅकहोल ही कितीतरी प्रंचड मोठा टिंब  असे अंनत प्रवासातील भले मोठे अगणित टिंब....

याला जिवन ऐसे नाव 

शुन्याकडून शुन्याकडे प्रवास. 


वर्षा पाटील. ©®



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4