14 दरवळ
कुणीच घरी फोन केला नाही बरीच रात्र झाली तरी कुणी परत आलं नाही, केतकी ह्या सर्वात खूप थकली होती. काकू घरात जे पसारा म्हणून काम दिसत होते ते करत होती. केतकी कडून हो नाही एवढीच उत्तरे मिळत होती. पहाटे पहाटे काका व आई दोघे परत आले, काकूंनी सर्व सोपास्कार पार पाडले. काकांना आईला खूप खोदून विचारले, ते काहीतरी कुजबुले पण केतकीला काही कळले नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी बाबा एकटे आले, खूप दुःखी कष्टी झाले होते एकुलत्या एक मुलीचे लग्न तेही इतक्या वाईट तरहेने तुटले. आईने विचारल्यावर बाबांनी बैठकीच्या खोलीत सर्वांना बोलावले विश्वराज गाडी चालवत होता, त्याचे आई वडिल पाठच्या सीटवर बसले होते एवढा प्रवास व नंतर जागरण बहुतेक त्याला डोळ्यावर झापड आली किंवा गाडीवरच नियंत्रण सुटले व अँक्सीडंट झाला, त्यात विश्वराज जागेवरच गेला आई वडिल दोघेही किरकोळ जखमी झालेत पण ते धक्यातून लगेच सावरणे शक्य नाही. केतकी बद्दल आपण काही बोलूच शकत नाही बोलण्या सारखे काही राहीले नाही. तेव्हा मामा, ...