पाऊस भाग:८
डाॅ. च्या रूम मधल्या खुर्चीत बसत शर्वरी बोलली: doctor its not good,केव्हा केव्हा rule शिथील करायला हवेत. मला जर रिलीव्हर मिळाला असता तर मी लँब ओपन ठेवून गेले असते व मला असा प्रश्नच आला नसता. डॉ. ने. खुर्चीवरून उठत म्हणाले तू या बाबत मॅनेजमेंट कडे तक्रार करू शकतेस. त्यांनी हाँस्पिटल कॅन्टीन मध्ये इंटरकाँम वरून फोन लावला. Canteen चालू होती. शर्वरीला त्यांनी विचारलं आपण इथे चहा मागवूयात की कॅन्टीन मध्ये जावूयात, एक राउंड होईल. गपा मारत दोघे कॅन्टीन पर्यत पोहचले. कॅन्टीन तशी रिकामीच होती. फँन सुरू करताच शर्वरीच्या अंगातून एक शिरशिरी उठली. तिला थंड वातावरणाची जाणीव झाली. आणि पायलचं गरम ब्लँकेट न दिल्याची जाणीव झाली.
दोघानी टोस्ट सँडविच व चहा मागवला,दूपरचा चहा शर्वरी प्यालीच नव्हती कामाच्या घाईत तिने तो नाकारला होता. आता तिला कडकडून भूक लागली होती पण ती एक आई सुद्धा होती तिला पायलची काळजी लागली होती ती व्यवस्थित झोपलेली आहे इतकी खूशाली सुद्धा तिला पुरेशी होती, पण फोन डेड असल्या मुळे तिही खुशाली तिला मिळत नव्हती.जवळ जवळ रात्रीचा 1 वाजला होता.शर्वरीने कांउटरला थांबण्याचा निर्णय घेतला ,डाँ .ने मी वाँर्डमध्ये 2nd round मारून येतो, तू माझ्या केबिन मध्येच थांब. ठीक आहे. म्हणून शर्वरी केबिन कडे निघून गेली. जवळ जवळ पाउण एक तासाने डॉ परतले. संपूर्ण दिवसाच्या श्रमाने ती थकली होती. व टेबलवर डोक ठेवून खुर्चीवरच झोपली होती. डॉक्टर ने कोट स्वतःच्या खुर्चीवर अडकवला आणि बाहेर जावून बाल्कनीतून पाउस न्याहाळू लागला. केव्हातरी शर्वरीची झोपेची लिंक तुटली, ती भानावर आली डाँ. चा अँप्रन तिथेच होता म्हणजे डॉ रूम मध्ये येवून गेले होते. हे म्हणजे कसं उंटाने मालकालाच तंबूतून हाकलून देणे.तिन बेसिन मध्ये तोंड धुतले ,डॉक्टर नक्की कुठे आहे हे तिला माहीत नव्हतं, तिने इंटरकाँम वरून दोन चहा मागवले व त्या मुलाला डॉ . बाल्कनीत असतील तर त्यांना निरोप दे स्ंगितलं. मुलांनी चहा घेवून येताना डाँ रांना निरोप दिला. मागच्या गप्पा चहा पिता पिता continue सुरू झाल्या. सकाळी ज्या अपरिचीत माणसांमुळे थांबाव लागलं होतं म्हणून राग आला होता .. त्याच्या बरोबरच आज ती रात्र उलटे पर्यंत होती. त्त्याच्याशीच आज तिच्या गप्पा रंगल्या होत्या.
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा