पाऊस भाग :३
शर्वरीन पर्स लाँकर मध्ये ठेवली. अँप्रन घातला, नर्स ने पाठवलेली पेशंन्टची लिस्ट पाहिली, नाव नंबर नुसार पेशन्टचे ब्लड लेबल बरोबर आहे की नाही पाहीले, काही पेशन्टचे ब्लड कलेक्ट करायचे राहीले होते, प्रल्हाद आल्यावर ते तो करणारच होता, तिने टेस्ट सुरू करण्यासाठी मशीन स्टार्ट केल्या. तेवढ्यात फोनची रिंग वाजली प्रल्हादचा फोन होता, तो आजारी होता व आज उद्या कदाचित आठवडाभर येणार नव्हता, म्हणजे आजचं सर्व काम एकटीला करावं लागणार होतं, उद्या त्याच्या ऐवजी रिप्लेसमेंट असिस्टंट मिळणार होती. त्यामुळे आजचं काम फक्त तिला एकटीला करायचं होतं.
विचरात असतानाच चहा आला, वातावरण थंड असताना उबदार चहाची रंगत न्यारी, पण आज चहा रमत गमत पिता येणार नव्हता, चहा पिताना अचानक तिला फास्टींग पेशंन्टची आठवण झाली, एका दमात चहा संपवून तिने इंटरकाँम वरून सिस्टरला येत असल्याचा फोन केला, व किट घेवून पेशन्टच्या वार्ड मध्ये निघून गेली. नर्सने ब्लड कलेक्शन चे पेशन्ट तयार ठेवले, ब्लड कलेक्ट करून ते सेटल करायला ठेवून तिने आधीच्या पेशंट चा ।सॅम्पल टेस्ट करायला घेतले, लंच टाईम पर्यंत तिचे कामाव्यतिरिक्त कुठेही लक्ष नव्हते, बाहेर धुवाधार पावसाला सुरूवात झाली होती, तिला अचानक जाणीव झाली ट्रँफीक जाम झाली तर!..या जाणीवेने तीने डबा अर्धवट सोडून ती रिपोर्ट फाईल कमप्लीट करायला लागली, तेवढ्यात इमरजन्सी मध्ये केस भरती झाली व ब्लड चेकिंग साठी सिस्टरने फोन केला नी शर्वरीच्या पोटात गोळा आला... ..
वर्षा पाटील ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा