हरपला
कोण कोण आम्हास सोडून गेले,
पित्याचे छत्र गेले, मातेचे आचलं गेले,
भावाचे हृदय गेले, मुलीचे प्रेम गेले,
माझ्यातील सत्व गेले.
सानेगुरूजींचे, वात्सल्य गेले,
बालगोपालांचे नेहरू गेले,
कष्टकरी शेतकऱ्यांचे मायबाप गेले,
कंपन्यांचे स्टोअरकिपर गेले,
बाजारभावाचे
एक रुपयाचे हिशोब गेले,
खातेदारांचे विश्वास गेले
बँकेचे, सबनीस(हिशबनीस) गेले
घोडेवाल्यांचे साहेब गेले
पोस्टाचे व्यवहार गेले
ऊसाचे शेत गेले
चरखेवाल्याचे ज्यूस गेले
बांधकाम क्षेत्रातील, हात गेला,
दूधवाल्यांचा भाउ गेला,
आणखी काय काय गेले
माहीत नसले तरी
वठलेला आम्रवृक्ष गेला,
वनवासातील राम गेला,
सीतेला रक्षणारा लक्ष्मण गेला,
सीतेला, शोधणारा हनुमान गेला,
जीर्ण, पुरातन वटवृक्ष गेला.
मुलांचा आधार स्तंभ आणि
दीपस्तंभ कोसळला.
एक मायाळू आजोबा हरपला.
वर्षा पाटील©️®️🙏🌹🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा