भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

शाळेला सुट्टी पडल्या  की आम्ही  द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू,  पावसाळ्यात  गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन,  सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध,  पाण्याचे ओहळ, आणि  एक  निसर्गाची  निरागस मनाला लागलेली ओढ.  हा  एक  ऋणानुबंध होता  त्या  नकळत्या  वयात  द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक  विश्वास असायचा,  त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे. 
दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड  पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे,  माणसे सुद्धा, घेवून  वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून आडवत आसू. तो प्रचंड ओढा आमच्या गावातील बसक्या घरात सामावून जायचा. नंतर सर्व डोंगरां लगतची जमीन, ओएनजीसी  कंपनी ने, व्यापून टाकली. वाहणारा ओढयाचा रस्ता वळवून, बदलून समुद्रात सोडला. आमचा वीरयात मुरुम  टाकून त्याचा कच्चा रस्ता बनवला.आशा प्रकारे नाला बंद करून, डोंगरा भोवती विजेच्या तारांचे कुंपण घालून  गुरांचे, बालगोपालानचे वावरणे बंद झाले. नंतर नंतर परवानगीने वर ती डोंगरावर जाण्याची मुभा दिली, पण आम्ही तिथपर्यंत मोठे होवून व्यस्त झालो  होतो....
आता परत एकदा बालपणीच्या आठवणी साद घालू लागल्या होत्या, मनाचे दार ठोठावू लागल्या. आणि परत एकदा बालपणात डोकावून पहायचे ठरवले....
7 ऑगस्ट ला,  मी मनाने निश्चय करून संध्याकाळी डोंगराच्या पायथ्याशी गेले,  तिथे, अगणित डोंगर व्यापून झोपड्यात संसार सुरू केला होता, डोंगरावर जाताना नवख्या लोकांना तीच आदिवासी मार्गदर्शन करत असत, दुसर्‍या दिवशी रविवार होता,  2-3 मुलाने माझ्या बरोबर यायचे मान्य केले.......

क्रमशः भाग 1
@वर्षा पाटील. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4