पाउस भाग -१
शर्वरी हातातील कप तोंडाला लावत होती, तिचं चहा पिण्याकडे लक्ष नव्हतं, ती खिडकीतून बाहेर रस्त्यावरील गढूळलेल्या साचलेल्या पावसाच्या पाण्याकडे पहात होती. ज्या दिवशी तिचं संपूर्ण जिवन बदललं त्या दिवशीही सकाळ पासून असाच पाऊस पडत होता.
आज सकाळ पासूनच पावसाची रिपरिप चालू होती. शर्वरीला घरातून निघायला आज उशीर झाला होता, नेहमीची बस मिळणार नव्हती, तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे करुन बिल्डिंग मधून बाहेर आली,पायलला शेजारच्या बिल्डींग मधल्या काकांकडे ठेवायला जात असताना तिला काका गेट मध्येच भेटले, त्यांनी पायलला शर्वरिच्या हातातुन घेतलं,तिची बँग तिने काकांच्या हातात दिली, व घाईघाईत स्टँड वर पोहचली, ४-५मिनिट लेट झाला होता पण बस गेली नव्हती
,तिची नंतरची वाट पहाण्याची 15 मिनिट वाचली.समोरून बस आली, शर्वरी बस मध्ये चढली आणि आश्चर्य आज तिला विंडो सीट ही मिळाली सीटवरील पाण्याचे तुषार तिने हातातील छत्रीने टिपले आणि सीटवर बसली. तीने एका तासाच्या प्रवासात झोपायचा प्रयत्न केला. पण तिला झोप आली नाही. थोड्याच वेळात तिच्या शेजारी चारचौघात उठून दिसेल असा इसम येवून बसला, शर्वरीला उगाचच अवघडल्यासारखे सारखे झाले, ती बाहेर रिमझिम पडत असलेला पाउस पाहू लागली, त्या माणसाने एक छानसा लेदर कव्हरवाला फोल्डर बाहेर काढला , त्यातील पेपर चाळू लागला, शर्वरीला थोडा टाईमपास मिळाला, ती त्या फोल्डर मध्ये टोकावू लागली, त्यातील अक्षर फारच छान होते, बहुतेक पहिल्याच पानावर त्याचा रिझ्युम होता. नंतरचंच पानावर काहीतरी स्क्रीप्ट लिहलेलं होतं, तिने त्याच नाव वाचलं होतं जय प्रधान असंच।काहीतरी। होतं तिचा स्टाॅप आला ती उतरायला उठली, तिच्यामागच्याच सीटवर नर्स बसली होती, दोघीही एकत्र उतरल्या .चालता चालता नर्सने विचारले, "मॅडम तो तुमचा नवरा होता का? नाही, की एवढा हँडसम नवरा मिळायचं माझ भाग्य कुठून? शर्वरी हसत हसत उतरली.पण उतरताना तुम्ही त्याला काहीतरी म्हणालात. अग माझी छत्री त्याला लागली तेव्हा मी साँरी म्हटलं, त्यावर तो नेस्ट स्टाॅप म्हणाला, ये पण त्याला कसं? माहीत मी एक स्टाॅप आधीच उठले. व मी कोणत्या स्टाॅप वर उतरते ते, नेहमीचा प्रवासी तर नव्हता वाटत, जाऊ दे म्हणत त्या हाँस्पीटलच्या आवारात शिरल्या़....
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा