भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4
त्या माणसाला पाहूनच मला काठी उचलायची ईच्छा झाली होती.
पूढे चालू....
पावसाळा असल्यामुळे रानटी फळे फुले भाज्या उगवल्या होत्या.सुर्य जसा माथायावर येत होता तस तशी सर्व किरणे झाडातून डोकावत होती आणि आक्रामक साडे आकरालाच अंगाची लाही लाही होत होती पावसाळा आणि संपूर्ण डोंगर हिरवागार असूनही वारा वाहत नव्हता. अंग भाजून निघत होतं,मी पाणी विसरलेली होती, .अंगात कोट नव्हता ,मला तहान लागली होती,मी पाण्याने व्याकूळ झाली होती.एकटी असतानाही मला घरी परतून जावेसे वाटत नव्हते.चढण्याची जिद्द चिकाटी तशीच होती.शिवसैनिकांचे आभार मानायला हवेत कारण त्यांनी लाकडी भरीव ओडकें चा छान वापर करून पायऱ्यां तयार केलेल्या आहेत. एकटीच चढण चढत 2वाजता डोंगर चढले.आणखी दोन शार्टकट आहेत तिथून चढताना कमी वेळात चढता येते मी एकटीच होते, तेव्हा थोडी थांबत आणि पायऱ्यांवर चढले.समोरच 5-6कुत्रे माझ्या स्वागता साठी होते.ते मला पाहून भुंकले नाहीत किंवा अंगावर देखील आले नाहीत.समोरच दोन पत्र्यांची घरे बांधलेली होती.खाली उतरणार्या माणसाने वरती कुणी नाही सांगितले ,त्यामुळे तिथे कुणी असेल असे वाटले नव्हते. पण दोन सोल्जर तिथे गस्ती घालण्यासाठी व टेहाळणी करण्यासाठी होते.त्यांनी मला एक लीटरची बाॅटल पाणी पिण्यासाठी दिली.ते पाणी मी प्याले .माझे मन तृप्त झाले.मी शांत झाले.तहान काय असते व तहान भागल्यावर तृप्तता काय अस्ते दोन्ही मी अनुभवले.तिथे गवत खूप वाढलेले होते.उंचावरून माझे गाव गावचे देवून दिसत होते.सध्या रहात असलेल्या जागेजवळ असणारे तळे दिसत होते. अतिशय सुंदर आणि समाधान देणारे रमणीय दृश्य होते. शिवकालीन महाल पूर्ण ढासळला होता. इंग्रजानीत्याचे चर्च करून निदान त्या वास्तूचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. इंग्रज राजवट संपूष्टात आल्यानंतर ,75वर्षात हिंदूनी किती त्याची डागडुजी केली. गड ओ.एन.जी.सी.कंपनीच्या ताब्यात होता तर ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी विश्र्वविद्यालय नेमून त्याची डागडूजी करून छान काळजी घेता आली असती.
तिथे पाण्याचा एक हौद आहे.
आमच्या लहानपणी एक अशी अख्ख्याइका होती की, त्या हौदात जर तिरुपती वस्तू गवताची गुंडी टाकली, तर ती तंरगत जावून घारापुरीच्या हौदात पोहचते.आणि तेव्हाचे सरदार ते अंतर पोहून पार करत असत.तर उन्हाळ्यात (हौदात पाणी नसताना) गुप्त मार्गाने शिवाजी महाराज ते अंतर घोड्यावरून कापत असत. माझा गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे.आमच्या पिढ्यान पिढ्या तिथे पाटीलकी करत आहेत.त्यामुळे माहीत आसलेला तो एक गुप्त मार्ग असून त्या घटनेत काही तथ्य असण्याची शक्यता आहे. तीथली घोड्यांचा टाचा,घण्याचा टाका अतीशय गवत वाढलेले असल्यामूळे व एकटीच असल्यामूळे मी पाहू शकली नाही.
सोल्जर लोकांचे मी आभार मानून,साधारण एक तासाने मी गड उतरायला सुरूवात केली.दिड तासात साधारण 4:30वाजता मी गड उतरून खाली आले. आजूनही मला एकही वार्याची झुळूक आली नाही.खाली उतरताच मी एक लीटर पाण्याची बाटली विकत घेतली. आणि तिथेच गाडीवर बसून संपवली. लाकडी पायरी आसल्यापासून ते पाण्याच्या झऱ्या पर्यत भर उन्हात प्रचंड मच्छर होते.मी हातावर ओढणी बांधलेली होती. ती सर्वकडे हात पकडत उतरत असताना सुटली. आणि दोन्ही हातावर प्रचंड मच्छर चावले. आणि दोन दिवस माझे दोन्ही हात सुजले होते. तेव्हा गडावर जाताना काही दक्षता घेतल्या शिवाय जायचे नाही.
मी माझ्या गाडीची चावी फिरवली आणि घरचा रस्ता धरला.
समाप्त
वर्षा प्र.पाटील.
उरण.रायगड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा