पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिवन(अमृत घट)

हे जिवन असंच असतं, इथे कुणी भरवशाचं नसतं, सुख दुःखा च्या, बेरीज वजाबाकीत, दुखः चं पारडं भरलेलं असतं, हे जिवन असंच असतं, स्वप्न पहाण्याचा आनंद असतो, पण पुर्णत्वाचं काही खरं नसतं, प्रत्येक जण आपल्याच नादात असतो, पण तरी देखील सुखी नसतो, मिळत नाही म्हणून रडत असतो, मिळाल्यावर ही समाधानी नसतो. हे जिवन असंच असतं, मरण येत नाही म्हणून जगायचं असतं, असंच वायफळ म्हणायचं असतं. अमृत घट भरलेला असतो पण तोंडाला मात्र लावायचा नसतो, ,तोंडांत पडेल तितकेंच प्यायच असतं, बाकी सर्व ओघळू द्यायचं असतं, त्या बद्दल शब्द काढायचा नसतो. हे जिवन असंच असतं, माझी तीस वर्षा पूर्वीची कविता वर्षा प्र. पाटील.©®

मनोगत

मनोगत हे पुस्तकाच्या पहिल्या पानावर असलं तरी ते पुस्तकाचा तपशील लिहीलेलं व सर्वात शेवटंच पान असत. सर्वात आधी वाचल्याने कथांची माहीती होते. पुस्तक लिहायचं असा चंग वगैरे करून मी इतक्या कथा लिहील्या नाहीत, तर कथा सुचत गेल्या त्यावर खुप जणांनी हक्क दाखवून अडथळे निर्माण केले लेखक म्हणून स्वताची नाव लिहायचा प्रयत्न केला. तरी कथा पुर्ण केल्या कारण लेखकाला, लिहील्या शिवाय चैन पडत नाही. सगळ्यात आधी मी होळी ही कथा लिहीली, ती कथा मला सुचली ती मी आधीवासी भाषेत लिहीलेली आहे,ती लिहीताना मी त्यांच्या बोलीभाषेत ती कथा लिहीली, ती लिहीलेल्याला ७-८ वर्ष झाली.मोबाईल मधील शुद्ध भाषा त्यातील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहीत असे व मला ते परत बदलून त्यांच बोली भाषेत लिहावा  लागे. मला ती भाषा अवगत करावी लागली नाही, तर त्या जीवन मानाची "ठाकूर" जमातीची लोक दरवर्षी शेतीची कामं, होळीत झाडे डुखण्यासाठी/तोडण्यासाठी आमच्या घरी येतं, मी लहान होती त्यामुळे त्यांची भाषा अवगत झाली होती. व  मी त्या  भाषेचा उपयोग,  कथा लिहिण्यासाठी  केला.  विदुषी म्हणजे हुशार स्त्री हे मी कथेचं नाव लिहीलं, पण नायीक...