पाउस भाग:११



काल रात्री ती डाॅक्टरच्या  गाडीतून फिरली होती. तेव्हा आज सकाळी ही त्याच गाडीतून  जायला हरकत नव्हती, सात वाजता तिला रिलीव्हर  मिळाला ती निघायच्या तयारीत असताना डॉ. ने तिला सांगितले,माझ्या घरी काही पडझड झालीय काही ठिकाणची फोनसेवा सुरळीत झालीय. मी माझ्या घरी जायला निघतोय. आपण चहा प्यायला कॅन्टीन मध्ये जायच का? शर्वरी,म्हणाली नको, मग मी लवकरच निघणं योग्य आहे नविन डोंगराळ भागातील रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करुन दिलेय. जिथे पाणी साचले नाही. शर्वरीने  परत फोन लावून पाहीला तो लागत नव्हता .तिने पर्समध्ये पैसे पाहीले जास्त आहेत की नाही.लँब टेक्निशियन ला काही सूचना दिल्या. आणि व्हरांड्यात  आली तिथे 2-3 पेशन्टचे  रिलेटिव्हज टॅक्सी घेवून आलेले होतें,तेव्हा तिथे  उभ्या टॅक्सीवाल्याला  स्पेशल सर्व्हिस  देता का विचारून नविन रूट ने कशी किती वेळात टॅक्सी पोहचेल , पैशाची घासघीस न करता सांगतील ती रक्कम दयायला तयार होवून ती  taxiत बसली, रस्ता नविन होता. शर्वरीला झोप येत होती, पण ती निर्धास्त  झोपू शकत नव्हती. 3 तासाने साधारण 10 वाजता शर्वरी घरी पोचली पैसे पेड करुन सरळ काकूंकडे गेली  पायल व्यवथित झोपली की नाही, तिने काही खाल्लेल आहे की नाही नवर्‍याचा पायल साठी फोन आला होता का विचारून. त्या चहा प्यायला  थांबवत असताना देखील पायलला घेवून घरी आली . येताना दुध पेपरच्या रांगेत उभ राहून ते घेतलं पायल झोपलेलीच होती. लँच उघडून पायलला बिछान्यात ठेवून ती डायरेक्ट  अंघोळीला गेली, बाथ घेवून चहाचं आधण ठेवल, फ्रिज मधून आधीच दूध बाहेर काढलं पायलला मउ भात व डाळ कुकरला लावली. फोन चेक केला तो डेड होता. चहा पिवून पायलच्या बाजूला पेपर वाचता वाचता झोपून गेली. 4 वाजता तिला जाग आली. पायलला उठवून तिला स्वछ  पुसून तिचे कपडे  चेंज केले, तिला जेवण भरवल नी खेळणी काढून तिच्या बरोबर खेळत बसली. खूप दिवसान असं निवांत तिच्याबरोबर खेळता आलं होतं इतर वेळी तिच्या जवळ खेळणी देवून शर्वरी ला दुसर्या  दिवशीची  काम आटपावे लागत होती, लाईट आली,  आणि तिने टिवी  आँन केला.खूप ठिकाणची वाहतूक व्यवस्था  सुरळीत करत होते, पाउस थांबला होता. वातावरण ढगाळ होते. फोन चालू झाला नव्हता. संध्याकाळची सर्व कामे आटपून शर्वरीने  स्वयपांक करायला घेतला. ..

क्रमशः 

वर्षा पाटील.©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4