पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोह आणि लालसा

 सोन्याची अंडी देणारी कोंबडी कुणी कापत नसतं, पण तिला परीसरात भटकूही दिलं जात नाही. तिला खुराड्यातच आडकवलं जातं,  मोह आणि लालसा खूप वाईट गोष्टी आहेत.  वर्षा पाटील. ©®🌹

मानसिकता

 जगात  विनाशकारी शक्ती जास्त वाढत आहे, कारण अडचणीत मदत करणार्याचा,आपलं चांगल   चिंतणार्याचा देखील अपमान करणं ,त्यांच्या मागे नको ते शुक्लकाष्ठ लावणं,ज्यांच वापरतो त्यालाच त्रास देणं अशीही लोक असतात, अशा लोकांची 🤔 मानसिकता काय असावी. स्वार्थ, अपुरे ज्ञान, की क्षणभराचे सुख, की काही मोठे घबाड हस्तगत करणे? वर्षा पाटील©®🌹

मालकी हक्क

 दुसर्याच्या जागेवर आपला मालकी हक्क दाखवताना ती जागा आपली समजून तीचा गैरवापर करून तिची विक्री करताना(पैशांच्या लालसेने) माणूस हे विसरतो,की हजारो वर्षे वसुंधरा आपल्याच जागेवर आहे,आणि तिचीअशी कित्येक वर्षे खरेदी-विक्री होत असली तरी आपल्या उण्यापुऱ्या १००वर्षाच्या आयुष्यात आपण त्या जागेवर हक्क दाखवतो,ज्या जागेसाठी भांडतो तिथे आपण गेल्यावर कुणीतरी दुसराच त्यावर हक्क दाखवतो.आपलं अस्तित्व नसताना! वर्षा©®

विभक्त पती

 एखाद्या वेळेस पतीपत्नी वेगळे झाले,व त्यांच्या नावे काही संपत्ती मिळाली,तर 90% शिकलेले लोक ती संपत्ती पतीने कमावलेली आहे असं गृहीत धरून त्याला देवून टाकतात ,खर्या अर्थाने त्या संपत्तीशी विभक्त पतीचा व त्याच्या नातेवाईकाचा काहीही संबध नसतो स्त्रीच्या बुद्धीमत्तेला तुच्छ लेखून पुरुषसत्ताला प्राधान्य देण्याची मानसिकता अजूनही आपल्या इथे आढळते.महत्वाचं म्हणजे ती संपत्ती आपलीच समजून विभक्त पती। तिचा मनोसक्वात वापर करतो. 

आशय

 आपण मनोरंजन म्हणून प्रेमकहाण्या असलेले कौटूबिक,हँप्पी एंडींग पिश्चर, सिरीयल पाहतो,कथा थोडीफार वेगळी पण आशयं तोच आपल्याला जिवनातही थोडेफार तसंच आवडत असतं,तेव्हा जास्तीत जास्त तसचं रहायचा, वागायचा प्रयत्न केला तर इतरांच्या व आपल्या जिवनातही आनंद निर्माण होईल. इतरांच्या आयुष्यात काटे पेरून आपलं आयुष्य सुंदर होत नाही. तसंच इतरांच वाईट करून आपल फार काळ भलं होत नाही.   वर्षा पाटील®🌹

हजर

 दुःखात मी तूला साथ दिली,  सूखासाठी तू दुसरर्याची  निवड केलीस,  माझे मलाच सुख मिळवता येते का ?पाहण्याचा निर्धार  केला, आणि तिथेही तू   '" हे माझेच कसे"   सांगावयास हजर झालास! वर्षा पाटील ©®🌹

उसनं

 आई लहानपणी शिकवायची, उसंन घेतलेलं परत करायचं असतं,काकूकडून घेतलेली साखर परत देवून ये जा! शाळेत घेतलेल्या पाटीवरील पेन्सीली, पेन,आठवणींनी परत करायचो! लोकं, काय काय उसनं घेतात!नोकरी,,पैसा,गाडी,बंगला,सहल,घरदार चाकर ,कपडे,दागिने, नशीब जिवन आणि  जगणंसूद्धा!परत द्यायचं नावसूद्धा काढत नाहीत! दारात यम येतो,तोही संभ्रमित होतो नक्की आयुष्य संपलय कुणाच लहानगीचं म्हातारीचं,की घरच्या लक्ष्मीच! वर्षा पाटील ©®🌹

सामाजिक बांधिलकी

 बरोबर चालणारे,  समांतर चालणारे एका सरळ रेषेत  चालणारे... उलट्या दिशेने  प्रवास करणारे , तिरकस चालणारे गोल,  गोल भवर्यात अडकणारे, सारे सामाजिक बांधिलकी  जपणारे....  तरी एकमेंकाला सतत  पाण्यात पाहणारे   वर्षा पाटील. ©®🌹

दिल

 अब हमारे पास वो 'मुकाम 'नही,  वो फुर्सतभरा 'वक्त 'नही,  वो चहकता 'मन' नही,  वो 'मुस्कान' भरा,  प्यारासा 'चेहरा ' नही,  वो 'रिश्ते' नही, जो हम,  'जताना 'चाहते थे कभी, वो  'गम' भी नही,  जो आप हमें 'दिलाना ' चाहते थे कभी,  है,  तो सिर्फ एक 'खालीपन,'  जहाँ क'भी ' 🌹'प्यार' भरा  दिल ❤ रहा करता था,  वर्षा पाटील. ©®🌹

कुछ खास

 किसीका  कुछ "खास"होने के लिए  कुछ खास "वजह" तो चाहीए  कुछ लम्हें , कुछ चाहते  कुछ उम्मींदे, कुछ सिलसिले...  ऐसेही कोई किसीका "खास " नही होता....  वर्षा पाटील ©®🌹

कोलाहल

 भयाण शांतता उगाचच आयुष्य सरून चालल्याची ग्वाही  देतो,  हदयात कालवा कालव करतो. पूर्ननिर्मिती, आपल्याच माणसांचा  कोलाहल त्यावर दिलासा देतो, वर्षा पाटी©️®️🌹

मित्र

 मित्राची उतुंग भरारी नक्की काय आहे,ते कळत नसणारा,पण आपला मित्र काही तरी खूप मोठा झालाय,म्हणून त्याला हवी ती मदत करणारा आणि त्याला मान देणारा सच्चा आणि सुदामा सारखा मित्र असावा, गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारा,मनातं सतत हेवा करणारा ,पण सतत आपल्या बरोबर राहून   आपल्यावर नजर ठेवुन आपल्या शत्रुला आपली  माहीती देणारा आपल्या चांगुल पणाचा गैरवापर करणारा मित्र नसावा. तोच आपला शत्रु असतो.  वर्षा पाटील©®🌹

जिवन

 पाटीवरचं सर्व पुसून परत एकदा ह्याच जिवनात  जिवन जगायला नाही का मिळणार? चूका तर सुधारायच्याच आहेत पण खूप अशा गोष्टी थोडं धारीष्ट  दाखवून  करायच्या राहून गेल्यात त्या वेळच्या वेळी करायच्या आहेत. कुठे कुठे वेडपटपणा केलाय, कुठे मैत्री करायच्या गप्पा मारायच्या, फिरायचे राहून गेले, काही महत्वाचे सांगायचे, बोलायचे राहून गेले ते करायचे आहे.  वर्षा पाटील. ©️®️🌹

कलियुग

 आजकालचे आउटफिट(फँशनेबलड्डेसं) पाहून वाटत नाही की कुणी (वस्त्रहरण होताना)कान्हाला आळवत असेल. म्हणजे फँशन जगताने कृष्णाचीच किंमत काढून टाकली. तसेच चिंध्या फँशन म्हणून अंगी बाळगताना द्रोपदीच्या भरजरी शालु फाडतानाचे तिच्या ज्या भावना भावना त्या कवडी मोल केल्या. वा रे! कलियुग🤔🤭🙃

चूक

 दुसर्याच्या चुकीमुळे आपली अनमोल चीज/हवीहवीशी वाटणारी वस्तू/ गोष्ट कायमची हरवली असेल, किंवा दुरावली असेल तर आपण त्या व्यक्तीला कधीच माफ करत नाही . वर्षा पाटील.  ©️®️🌹

विखारी शब्द

 विखारी/ विषारी असो, सत्य असेल ते आपल्याला माहीत असेल,तर बोलावेच लागते आणि आपलं भाडंण आपल्या प्रेमळ माणसांबरोबर नाही होतं, सतत आपलं नुकसान करणार्या माणसांबरोबरच होतं, कारण एकदाच चुक होते, परत परत नुकसान करणारे मुद्दाम करत असतात.    जर एखाद्या चांगल्या माणसां बरोबर कुणी मुद्दाम भांडत असेल तर त्यातही त्यांचा स्वार्थच असतो.किंवा  त्याला बदनाम करण्यासाठी करतात.  वर्षा पाटील. ©️®️🌹

भावनीक ओलावा

 जसजसं माणूस परिपक्व  होत जातो ,तस तसा त्याच्यातील भावनीक ओलावा कमी होत जातो त्याच कारण निरागसते कडून त्याचा प्रवास वास्तवते कडे चालू असतो.  वर्षा पाटील ©️®️🌹 उरत नवी मुंबई 

शंका

 एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करून मनात शंका निर्माण झाल्या, की त्यातील आंनद हिरावला जावू शकतो.परंतु कधी बिनधास्त राहून बेसावध राहून नाही ती आफत ओढावून घेण्यापेक्षा चांगले. वर्षा पाटील ©️®️🌹

जत्रा(10/ Jain/ 2022)

 उरलेली तिन्ही खेळणी संपवून रमाकांत  घरी जायला निघाला उर्मिला नी दिलेली नोट त्याने पाकिटात वेगळ्या कप्प्यात  ठेवली आठवण म्हणून ! त्याने देवाला लांबूनच नमस्कार  केला. घरी प्रसाद  म्हणून काही न्यायची त्याला इच्छा  झाली नाही. त्याच्या पहिल्याच प्रयत्नात  त्याला यश लाभले. आईचा, देवाचा  आशिर्वाद  लाभला. आजची कमाई ही त्याने एका दिवसात कमावले असले तरी ते पगारा सारखे एका महिन्याची, कमाई होती.त्याने कमावलेले पैसे हा एका कंपनीच्या सी. ई. ओ.च्या महिन्याच्या पगारा एवढे होते. पण त्याचे मन आनंदी समाधानी झालं नाही. तो ह्या शहरात परत येणार नव्हता.  घरी  गेल्यावर त्याने गरम पाण्याने अंघोळ केली. देवाजवळ आपल्या धंद्याची पहिली कमाई ठेवली. आईच्या हातचे गरम गरम जेवण जेवला. आणि आई काही विचारायच्या आत झोपी गेला.  तिन्ही खोकी  परत आणली नाही हे पाहून आईने हुश्य! केले, आई बाबा संध्याकाळी शेतवरून  परतल्यावर त्याने आई बाबांच्या हाती एक तिहाई  रक्कम ठेवली. इतके पैसे एका दिवसात कमावलेले पाहुन आई हरकून  गेली,  मुलाची एक महिन्याची मेहन...

जत्रा 9/ jan/2022

 एक वर्षात रमाकांतचे शिक्षण पूर्ण  झाले. उर्मिला ला मुलगी झाली. तिचा सासरी छळ होतोय. इतकच त्याला माहीत होतं, पण उर्मिलाशी आता त्याच  काही  नातं नव्हतं, तो नोकरी  शोधू लागला, त्याने चार वर्षात दोन नोकऱ्या  केल्या,  त्याची नोकरी सुटली. आणि उर्मिलाचे लग्न तुटले, पण ती गावात परत आली नाही, साधीशी नोकरी करून तेथेच  कुठेतरी राहु लागली. तिचे आई वडील  तिला मदत  करीत ,एकदा धाडस करुन रमाकांत ने तीचे घर शोधले, रस्त्यात गाठले, आपण एकत्र येण्याची म्हणुन विनंती केली. पण उर्मिला  तयार झाली नाही. आता  परत त्याच्याकडे  नोकरी  नव्हती.. ...  उर्मिलाची तंद्री भंगली  प्रशाली आईला तयार केलेले विमान कसे उडते ते दाखवत होती. टाळ्या वाजवत होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.  दोन दिवस राहून बाबा गावी घरी निघून गेले. उर्मिला  व प्रशाली परत दोघीच राहील्या. उद्या तिला प्रशालीला शाळेत सोडून पूढे कामावर जायचे होते.  तो तासनतास बसून  विचार करे... त्याला एक भन्नट कल्पना सुचली. .... क्रमशः(८) वर्षा पाटील©®🌹 ....

जत्रा 9/jan/2022

 आई आणि प्रशाली खेळणीवाल्या जवळ गेल्या, त्याच्या कडे तीन- चार खेळणी होती . त्यातील एक मात्र विमान होते. प्रशली खूष होवून आईला म्हणाली ते बघ विमान!  त्याला आश्चर्य  वाटलं सकाळचीचं मुलगी जिच्या साठी आपण एक विमान बाजूला काढून ठेवले होतं, त्याने विमान मुलीच्या  हातात दिलं प्रशालीच्या आईने त्याला 100 रुपयाची नोट दिली. तसा तो थोडा घुटमळला नोट हातात घेत म्हणाला अजूनही येत असलीस तर चल! आज मी एकाही खेळण्यावर  एकही रुपया कमी  केला नाही. आज मी 1500 खेळणी विकली. ही माझी एका दिवसाची कमाई ,एका महिन्याची मेहनत आहे. आई बाबांनी घरात घेतलं नाही  तरी मी विश्वासाने तूला सांभाळीन, आज रस्त्यावर  मी एवढी कमाई केली आहे. तूला काही कमी पडू देणार नाही. तिने मान वर करून पाहीलं 10-15 मिनिटांत बराच रस्ता मोकळा  झाला होता. तिने मुलीला उचलून घेतलं आणि झपझप रस्ता  चालू लागली. डोळ्यासमोर  अंधारी येते की काय वाटू लागलं, डोळ्यातील पाण्याने समोरील रस्ता दिसेनासा  झाला. घरी आल्यावर  मुलगी ते विमान उघडून लावू लागली आणि आजोबा तिला मदत करू लागले. .. . तिच्या मनात...

जत्रा 9/ jan /2022

 दुपारी तीन नंतर पुन्हा जत्रेत गर्दीला सुरूवात झाली, त्यांना आपल दुसरं खेळण्याचं खोक फोडलं, सकाळी  घरी घेवून जाणार्या मुलांची खेळणी पाहुन खुप सारी मुले ते खेळणे घ्यायला येत होती. आनंदाने हवे ते खेळणे विकत घेत होती. रात्री सात नंतर त्याने  तिसरं बाँक्सच्या फोडला हा शेवटचा बाँक्सच्या  संपो ना संपो त्याचा धंदा मस्त झाला होता. तिसर्या बाँक्सची खेळणी बाहेर काढताना त्याला सकाळची बोनी  करायला आलेली लहान मुलगी आठवली, तिला विमान हवे होते. तिची आई परत येते,  म्हणून गेली आणि आलीच नाही. ती हे  'खेळणं' बाजारातील  इतर खेळणी आणि खाऊ ह्यामध्ये विसरून सुद्धा गेली असेल पण त्याला उगीचच चुटपूट लागली आता तर ती मुलगी ते खेळणं नयायला येण्याची शक्यताही संपून गेली. त्याने तिसर्या बाँक्समधील 20-25 विमानातील एक विमान बाजूला काढून  ठेवले.. . ..   आज त्रिपुरी पौर्णिमाचा उपवास सकाळ सकाळ देवदर्शनाला  गेले तर भली मोठी लाईन नंतर सर्व बाजार फिरले गृहोपयोगी वस्तु पण जत्रेत छान मिळतात छोटीला हवा तो खाऊ खेळणी घेवून आले पण  तिला आवडलेलं कोणतंतरी  खेळणं वि...

जत्रा 6/jan/2022

 त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या रात्री रमाकांत   जेवून आई बाबांना नमस्कार  करून रिक्षात 3 खोकी घेवून निघाला. निघताना आईने जमवलेले एक हजार रूपये हातावर ठेवले. त्याने नको आहेत खर्चाला माझ्याकडे म्हणाला .बाबांचा  हातही खिशात  गेला बाबांना नको आहेत माझ्या कडे  मला जायला असले म्हणजे पुरे मी पैसे कमवायला चाललोय.असे म्हणत, पायऱ्या उतरला. त्याने रिक्षा स्टँडकडे वळवली. रात्रीची वेळ आणि 6-7तासांचा प्रवास त्यामुळे  बसमध्ये  फक्त 4-5 माणसं, त्याने खोकी सीट खाली लोटली. तिकीट काढलं नी बाहेरच्या  खोक्यावर अलगद आडवा पाय ठेवला की कुणी खोका  खेचू शकणार नाही आणि सरळ सीटवर आडवा झाला.नी  झोपी गेला.  सकाळी तीन वाजता तो एस टी च्या आवारात उतरला. तिन्ही खोकी  खाली उतरवली, आजूबाजूला रिक्षा पाहू लागला तेवढ्यात  एक रिक्षा येवून बाजुला उभी राहिली .भाडं ठरवून तो रिक्षात बसला. 20 मिनिटात चढण चढून तो शंकराच्या  देवळाजवळ  पोहचला  बरेचसे पायर्‍या आडवून काहीबाही विकत बसले होते. अजून सकाळची आरती झाली नव्हती. पायरी पासून थोड दुर पण मेन...