पाऊस भाग:२
तो येतो सखे, नखशिखान्त
भिजवण्यासाठी,गात्रे न गात्र
मोहरून जातात,त्याच्या स्पर्शाने
तो आवडतो, सर्वाना, तरी का?
असा सूड घेतल्या सारखा बरसतो
,सर्वांचे संसार उधळतो
थांब थोडासा, त्या नदी पल्याड
डोंगराआड, ती पण बघ तूझ्या
आगमनाने, वेड्या सारखी
सळसळत धावत सूटली.
घेवून कवेत सारे, बघ जावून
मिळेल सागराला....
कुठलं तरी गाण दूरवर वाजत होतं, आईने शर्वरीला आवाज दिला, "मी जरा बाहेर जावून येते, दार ओडून घेते, मग आतून कडी घाल", आईच्य आवाजाने शर्वरी भानावर आली. आई जाता जाता म्हणाली आम्ही नाही का संसार केले? काय अशी तंद्री लावून बसलीस?, शर्वरीने अनाहूतपणे उत्तर दिले, पण तुम्ही घराबाहेर पडत नव्हता नोकरी साठी आणि 10ते 5 नोकरी करणारे तुमचे नवरे सहाच्या ठोक्याला घरी येत होते, म्हणजे? आईने पायात घातलेली चप्पल काढत म्हटले. काय नीट सांगशील तर समजेल ना ?, तू नीघ तूला उशीर होतो, शर्वरी ने बळेबळेच आईला जायला भाग पाडलं, तिला विषय वाढवायचा नव्हता, चर्चा तर मुळीच नको होती.
शर्वरीन दार बंद केले, घरातला एकटेपणा तिला भावला , तिने तिच्या आवडीची गाणी मोठ्या आवाजात लावली.गाणी गुणगुणत कप बश्या विसळल्या, केर काढला, ओटा साफ केला, संध्याकाळच्या स्वयंपाकासठी कणिक भिजवली,आणि पालेभाजी साफ करायला बसली पण तिचे मन उलट्या दिशेने भूतकाळात पळत होते. ......
क्रमशः
वर्षा प्र पाटील ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा