2]भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर
दुसर्या दिवशी मी जरा उशीरा नेच उठले. आणि माझे वेळापत्रक कोलमडले.पण जायची जिद्द मात्र सोड़ायाचीच नाही. आज नाही तर कधीच नाही हे वाक्यं माझ्या मनात गूंजी घालू लागले. एक गॉगल आणि पर्स घेवून मी माझी गाडी घेवून निघाले, माझी गाडी मी त्यांच्या वस्ती जवळ थांबवली. गाडी लॉक करून मी त्यांच्या वस्तीतून जायला सुरुवात केली. त्यातील ओळखीच्या मुलाच्या घरी गेले. तो मुलगा बाहेर, जायला निघाला होता, आणि त्याने सांगितले, सर्व मुले रोजंदारीवर गेलेली आहेत, आणि ती सर्व मूल संध्याकाळी परत येतील. आणि मीही तिथेच जात आहे. मी 2 तास तिथे उशिरा पोहोचले होते. मी त्या मुलाला माझ्या बरोबर वर ती चालायची विनंती केली. त्याने काहीही भीती नाही, संध्याकाळी 5 पर्यंत परत खाली या, तिथ पर्यंत जर आला नाहीत, तर आम्ही मुले वरती येवू. मी शांत झाले, मी त्या मुलाच्या बोलण्यावर, विश्वास ठेवून चालायला सुरुवात केली. तो मुलगा माझ्या बरोबरच निघाला, आणि विरूद्ध दिशेला गेला. क्रमशः भाग 2 वर्षा पाटील.