डोंगराच्या पायथ्याशी गर्द झाडीत एक गाव लपलेले, होते, एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराचा विळखा, तर दुसर्या बाजूला त्याला लागूनच असलेला अथांग समुद्र, आणि त्या तटावर वसलेल्या गावात निसर्गाची मुक्त हाताने केलेली उधळण, गाव छोटे असले तरी, फळा फुलांनी, पिकांनी समृद्ध. आणि अगदी, शिवरायांच्या काळापासून, नावाने चालत आलेल्या आडनावाने त्यांची हवेली त्या शहरात प्रसिद्ध होती. हवेली ऊंच पाया असलेली, सागवानी लाकडाचे नक्षी कोरलेले, एका रेषेत 15 फूटावर उभारलेले 4 खांब आणि तसेच रुंद ओटा, त्या हवेलीला पेशवेकालीन झालर होती. त्या सुंदर दोन मजली हवेलीत, दोन भाऊ राहत होते, एक राघोबा आणि दुसरा, रघुनाथ, दोघांचे वडील सीताराम, आणि त्यांचे वडील सखाराम त्यांना 4 मुले त्या पैकी एक "सीताराम" राघोबा आणि रघुनाथचे वडील . मोठा राघोबा आणि धाकटा रघुनाथ, राघोबाला नवसाने झालेला एकुलता एक मुलगा.1903 साली जन्माला आलेल्या ...
पोस्ट्स
2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
कर्नाळा ट्रीप:-
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सकाळी 8:30 वाजता घरातून मी माथेरान साठी निघाले.जरा उशीरच झाला,पण संध्याकाळी परतीचा प्रवास करून रात्री 10, -11वाजता घरी पोहचले तरी चालेल.ह्या विचारात सव्वा दहा वाजता पनवेलला पोहचले. मी 6सिटर कडे धाव घेतली.चौकफाट्याहून शाॅर्टकट्स वगैरे घेवून कर्जतला जायचे. पण रिक्षावाल्यांनी असे काही शाॅर्टकट्स नाहीत सांगितलं, मग मी माझा मोर्चा रेल्वेस्टेशन कडे वळवला.टिकीट खिडकीत चौकशी करूनही त्याने मला कल्याण मार्गे तिकीट दिले, एवढा वळसा घालुन जायचे म्हणजे, मी स्टेशनमास्तरकडे चौकशी केल्यावर पूणा डायरेक्ट संध्याकाळी साडेचारची आहे सांगितले,माझे तिकीट कॅन्सल करून द्या सांगितले ,पण त्याने नकार दिला.रिक्षेने मी पनवेल बस स्टॅण्डवर आले, तिथे एक तास थांबून 12:30ची कर्जत बस पकडली. शेजारी दररोज प्रवास करणारा काॅलेजचा मुलगा होता, त्याला कर्जत नेरळ शटल लगेच असते का विचारली. आणि माझ्या वेळेचा ताळमेळ चुकणार हे लक्षात आलं,माथेरानला भोज्जा करून परतावं लागणार हे समजलं, त्या मुलाला कर्नाळाला जायचं असेल तर कुठे उतरायचं, विचारलं आला त्या स्टाॅपलाच उतरा म्हणाला, पण मी दरवाज्यात पोहचेपर्यंत गाडी सुरू झाली, पुढच्या...
फेरफटका
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भटकंती हां प्रकार लहानपणी ,ऐन तारुण्यात असतोच पण संसाराच्या डबघड्यातून उसंत मिळाली की चाळीशी नंतर माणुस परत भटकंतीला सुरूवात करतो.तसेच मीही सुरूवात करायचे ठरवले.३१डिसेंबरचे औचीत्य साधुन मी मुलीला हाॅस्टेलला भेटायला गेली १जानेवारीला माझा वाढदिवसा निमित्ताने महाबळेश्वरला जायचे ठरविले.आम्ही कॅब बुक केली.ऐन वेळी ठरलेल्या पेमेंट पेक्षा एक हजार जास्त मागितले. आणि आमची कॅब कॅन्सल झाली.व.ट्रीपही कॅन्सल झाली.पण मी हट्टाने जायचेच ठरविले. आम्ही स्वारगेट हून सातारा बस पकडली.रात्रीचा झोपून प्रवास करून १:३० वाजता सातार्याला पोहचलो ,पण नुकतीच महाबळेश्वर बस गेली होती व दुसरं कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते.मोबाईल आणि पाॅवर बॅंक चार्ज करायला स्टेशन मास्तर कडून अनुमती घेवून तीथल्या प्लगवर जोडले.थोडी थंडी वाजत होती म्हणून दोन चहा घेवून प्यालो व भटक्या कुत्र्यांसाठी बिस्कीट पुडा घेतला. चार वाजता कॅब आली आणि आम्ही परत १तास प्रवास करून महाबळेश्वरला पोहचलो. एक माणसाने आम्हाला तुम्हाला रूम दाखवतो चला म्हटलं व त्यांच्या पाठोपाठ चालत आम्ही गेलो.रूम नीटनीटकी पाॅश होती. वाॅश घेवून थोडावेळ आराम करून थंड पाण्यात अं...
जिवन(अमृत घट)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे जिवन असंच असतं, इथे कुणी भरवशाचं नसतं, सुख दुःखा च्या, बेरीज वजाबाकीत, दुखः चं पारडं भरलेलं असतं, हे जिवन असंच असतं, स्वप्न पहाण्याचा आनंद असतो, पण पुर्णत्वाचं काही खरं नसतं, प्रत्येक जण आपल्याच नादात असतो, पण तरी देखील सुखी नसतो, मिळत नाही म्हणून रडत असतो, मिळाल्यावर ही समाधानी नसतो. हे जिवन असंच असतं, मरण येत नाही म्हणून जगायचं असतं, असंच वायफळ म्हणायचं असतं. अमृत घट भरलेला असतो पण तोंडाला मात्र लावायचा नसतो, ,तोंडांत पडेल तितकेंच प्यायच असतं, बाकी सर्व ओघळू द्यायचं असतं, त्या बद्दल शब्द काढायचा नसतो. हे जिवन असंच असतं, माझी तीस वर्षा पूर्वीची कविता वर्षा प्र. पाटील.©®
मनोगत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मनोगत हे पुस्तकाच्या पहिल्या पानावर असलं तरी ते पुस्तकाचा तपशील लिहीलेलं व सर्वात शेवटंच पान असत. सर्वात आधी वाचल्याने कथांची माहीती होते. पुस्तक लिहायचं असा चंग वगैरे करून मी इतक्या कथा लिहील्या नाहीत, तर कथा सुचत गेल्या त्यावर खुप जणांनी हक्क दाखवून अडथळे निर्माण केले लेखक म्हणून स्वताची नाव लिहायचा प्रयत्न केला. तरी कथा पुर्ण केल्या कारण लेखकाला, लिहील्या शिवाय चैन पडत नाही. सगळ्यात आधी मी होळी ही कथा लिहीली, ती कथा मला सुचली ती मी आधीवासी भाषेत लिहीलेली आहे,ती लिहीताना मी त्यांच्या बोलीभाषेत ती कथा लिहीली, ती लिहीलेल्याला ७-८ वर्ष झाली.मोबाईल मधील शुद्ध भाषा त्यातील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहीत असे व मला ते परत बदलून त्यांच बोली भाषेत लिहावा लागे. मला ती भाषा अवगत करावी लागली नाही, तर त्या जीवन मानाची "ठाकूर" जमातीची लोक दरवर्षी शेतीची कामं, होळीत झाडे डुखण्यासाठी/तोडण्यासाठी आमच्या घरी येतं, मी लहान होती त्यामुळे त्यांची भाषा अवगत झाली होती. व मी त्या भाषेचा उपयोग, कथा लिहिण्यासाठी केला. विदुषी म्हणजे हुशार स्त्री हे मी कथेचं नाव लिहीलं, पण नायीक...