पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भ्रष्टाचार (Poem)

 प्रेमात ही भ्रष्टाचार करावा  असं  तूला का वाटलं   वेड्या, मृत्युच्या ही मिठीतून परतून तो येतो,  श्वास घेताना  शेवटचा  तो प्रश्न मला करतो,  प्रीत इथे जुळली, मग हा दुरावा का आपल्यात,  कुठे जडायचे होत मन नात तुटल का आपलं? कसा घेवू मी श्र्वास?  सांत्वन ही कसे करू वेडे शब्द माझे नव्हते।,  अ़श्रुंनी मग धाव घेतली  ओलिचिंब झाली गात्र मन वेडे  पाखरू होवून  उडाले त्याच्या श्र्वासा, संगे.  Varsha patil.  ©® Uran 4:10pm 20/6/20

रानभाजी

   पावसाळा सुरू झाला की पहिल्याच पावसाची शिंपड  सार्या अवनीला हिरवा शालू नेसवते.ना कुठे बियाणे पेरावे लागत, ना खताची  फवारणी करावी लागत. त्या 🌳💚🍏हिरव्यागार  शालुत अनेक औषधी वनस्पती  उगवतात. माणसं त्या नाजुक कोवळ्या पानांची भाजी बनवतात. त्या वनस्पती खाल्ल्या की पावसाळ्यात  अनेक व्याधी जडत नाहीत.  पावसाळ्यात जवळच असलेल्या डोंगरावरून जरा खाली आलं की आमची वडिलोपार्जित शेती. शेतावर जाण हे, त्या वयातील आमचा आवडता खेळ किंवा निर्सगाने लावलेलं वेड      शनिवारी शाळा सुटली, किं घरी पाटी दप्तर टाकून, चहा पिवून गावातील सर्व मुल मुली हातात पिशवी खरळ किंवा मोठा खिळा घेवून पाले भाजी आणायला जात असू. दुसरा दिवसही त्याच साठी,रविवार सुट्टी चा दिवस पण रविवार म्हणून लोळत न पडता सकाळ सकाळ भाजी खूडायला डोंगरावर जायचेा. पहिल्या पावसातच दगडावर शेवाळ उगवलेली असे, तीला चुकवत सावरत सावरत डोंगरावर चढायचे.आेळखता येतील त्या भाज्या खुडून पिशवीत टाकायच्या. मातीच्या ढेपळाला खरळ किंवा खिळ्याने फोडायचे भाजीची मुळे सुटी करायची व ती पिशवीत भरायची. त्यातील मला ठाऊक असल...

प्रेम

इमेज
   मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रेम म्हणजे काय असतं तुमचं आमचं सेम असतं म्हणून लहानसा लेख वाचला मला त्यात न्यूनता जाणवली. प्रेमाच्या माझ्या कल्पना त्याहून वेगळ्या..   ही काय प्रेम करायची वेळ आहे? प्रेमावर लिहायची वेळ आहे का? तर! प्रेमाला गंध, वास ,वय, भूक, तहान हे काहीच नसतं जर काय असेल तर निव्वळ अनुभूती (फिलिंगस्). त्याला व्यक्त करताना निरनिराळ्या माध्यमाचा वापर करतात. जसं फुल त्याच देखणे पण, त्याचा स्पर्श, त्याचा गंध मनाला मोहवून जातो व त्यातून मनातील भावना व्यक्त होतात. ते फूल किती अलवारपणे आपल्या भावना वाहण्याचे काम करत. फूल  मग ते कोणतेही असो.!  मला प्रेमाबद्दल काही बोलायचे असेल,,,,,तर लहानपणी शाळेतील कवितेतील एकच ओळ निशब्द करते, प्रेम कुणावरही कराव, गाईच्या नेत्रातील अथांग कारूण्यावरही करावं.!            गाईच्या डोळ्यातील भाव, गाईचे नेत्र किती मोठे काळेभोर ,! त्या पाणीदार डोळ्यात जे कारूण्य, जे प्रेम जाणवतं ते तुम्हाला कुठेही सापडणार नाही, ती कविता मी शिकली आणि नंतर मी फक्त गाईचे डोळे निरखू लागले.  ते कारूण्य, प्रेम...

पावसाळ्यातील एक दिवस: भाग २.

            मी जे लेख लिहीते त्याच नावच आहे माझ्या आठवणातून, म्हणजे माणूस भूतकाळ जगू शकत नाही का? माणसाचा भूतकाळ जर वर्तमानकाळापेक्षा चांगला असेल तर नक्कीच ! तो परत एकदा आपला भूतकाळ पडताळून पाहू शकतो. !भविष्य आपल्याला माहीत नसल तरी त्याची चाहूल वर्तमानकाळात लागतेच, मग भूतकाळ हा अनुभवाची शिदोरी घेवून आपल्या पाठीशी उभा राहतो. तेव्हा मुळी आपल्या भूतकाळावर  आपलाच हक्क असतो, जर तुम्हाला तो हवा असेल एखाद्या वाटाड्या(guide pole) सारखा!  कोकण कसं निर्सगाने बहरलेल, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, पण जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची चाहुल लागते, तेव्हा आपल्याला आपल्या जन्म भूमीवर गर्व होतो. त्यावर कुणाचा हक्क सहन होत नाही वंसुधरा  सर्वांची तर मग  असे का? आपल्याला आपलं अस्तित्वही  तेवढेच प्रिय असते आणि म्हणूनच जन्मगाव ही तेवढेच प्रिय.....         माझ्या गावाच्या पुर्वेला १० मिनिटं अंतरावर द्रोणागिरी डोंगर, हनुमान द्रोणागिरी पर्वत नेताना एक तुकडा (ढेपूळ)पडला व तो छोटासा तुकडा आमचा द्रोणागिरी डोंगर झाला. तेवढ्या...

पावसाळ्यातील एक दिवस

पूर्वी शाळेत १५ मार्काचा प्रश्न असायचा  ' निबंध" ज्याचा अभ्यासही न करता सहज लिहीता यायचं, कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० मार्क्स मिळवता यायचे. आणि हमखास पावसाळ्यातील एक दिवस हा विषय असायचा मग पावसाळ्यात धबधब्यावर ट्रीप,  गंमती जमती लिहायचे आज मीही पावसाळ्यातील एक दिवस लिहीणार आहे. २६ जुलै ह्या नंतर कित्येक पावसाळे येवून गेले पण लोक मात्र २६ जुलै विसरू शकले नाहीत..... त्या दिवशी लाखोंची पोशिंदा असलेली मुंबई अचानक पाण्याखाली गेली. आणि कित्येकांचे  घर संसार मोडून गेली........   पावसाळ्यातील सगळ्याच दिवसा सारखा तेाही दिवस उजाडला २६ जुलै सकाळ पासून पावसाची रिपरिप चालू होती मुंबई कर ८,९,१०,वाजताच्या ड्युटीवर हजर होण्यासाठी निघाला, मीही त्याच वेळी घर सोडत असे पण, काही कारणास्तव अचानक कामाची सुट्टी घेतली. मुलगी झोपली होती आज पाळणा घरात न्यायची नव्हती, म्हणून मी काम करत बसली बाहेर पावसाचा जोर वाढत होता. सकाळ पासून लाईट नव्हती. सुट्टीच्या दिवसात घरातील सर्व आठवडाभराची कामे पूर्ण करायची संधी मिळाली होती. टिव्ही बंद होता. चवथ्या मजल्यावर  पावसाचा अंदाज येत नव्हता, अचा...