पाऊस : भाग१६
शर्वरी थोडी अस्वस्थ झाली. हयात तिला फसवल्याचा, प्रश्न नव्हता, ती एक विवाहीत नवर्याबरोबर राहणारी स्त्री होती. सर्वाच्या म्हणण्या प्रमाणे तिचं जिवनही आलबेल होतं मग! ती अपसेट का झाली.
ड्यूटी संपवून शर्वरी घरी जायला निघाली. वरती वाँर्ड मध्ये फाईल द्यायला गेली. डॉ. समोरच होते त्यांनी शर्वरीला कँटीनमध्ये चहा प्यायला चालायची विनंती केली. खरं तर ती जायला तयार नव्हती पण तीला नाही म्हणता आलं नाही.दोघ गप्पा मारत कँटीन मध्ये पोहचले. चहा पीत डॉ. ने सांगितलं मी इथून सेम हाँस्पिटल मध्ये transfer घेतोयं. आमच्या शहरात नाही मिळाली तर.! शर्वरी उद्गारली.तर जाँब सोडणार लठ्ठ पगाराचा ? Let's see, होणाऱ्या मिसेसचं क्लिनीक आहे . surgeon and general practitioner maybe open the new hospital. Wow! that's great congratulations and best of luck.शर्वरीने पर्स उचलून बोलली. ती पैसे द्यायला जाणार, तेवढ्यात डॉ. ने त्या कँटीनच्या मुलाला आवाज दिला. लिहून ठेव. Account मध्ये...
शर्वरीला बसमध्ये झोप येत नव्हती.तिच्या मनात काहीतरी खटकत होतं....
पावसाच्या त्या दिवसाला जवळ जवळ एक,दिड महिना होत आला. सार्या महिनाभराचा पावूस एका दिवसात पडून गेला. आकाश फाटल्यासारखा.... ..
आजच रात्री काही तरी सोक्षमोक्ष लावायचा असं शर्वरीने ठरवलं कारण बदली होवून दिड महिना झाला तरी जायचं की नाही ,की मी आईबरोबर रहायचं ते नकी नव्हतं सांगितलं...
रात्री जेवण चालू असताना शर्वरीने विषय सुरू केला. काय ठरलं मग डेहराडूनच? उद्या रजेवर राहशील का? नाहीतर परवा संडे आहे परवा सांगतो दिनेश म्हणाला, नको मला आताच सांग ठीक आहे सांगतो करून दिनेश जेवणावरून उठला.
त्याने बँग मधून चेक काढला, आपण अडीच वर्ष बरोबर राहीलो, त्यापैकी दिड वर्ष तू एकटी घरखर्च चालवतेस,फ्लँट आपल्या पसंतीचा असला तरी मी आठ दिवस घरी राहून त्यात हवे तसे बदल केलेत. पण का? कशासाठी ?चेकची काय भानगड? सांगतो सारं तुला ऐकायचं नसेल तरी....
त्या दिवशी सकाळीच पावसाने जोर धरला होता त्यामुळे आँफीस मध्ये तुरळक लोक होते ,दुपारी 12 नंतर तर कुणीच राहीलं नाही मीही निघालो, तेवढ्यात आमच्या मँनेजरने मला बोलवलं, तीच का! नविन लेडी यंग आँफीसर आली ती! शर्वरी तिरस्काराने म्हणाली. अं हो दिनेश उद्गारला! तिने गाडी काढायला सांगितले, व बरोबर साईटवर चलायला सांगितले,मी नकार दिला, पण गाडी मी स्वतः drive करेन सांगितले. मग! काय? मला नकार देता आला नाही. साईटवर काम चालू होते सर्व बांधकामाचे सामान बाहेर होते, सर्वसाधारण पावसात भिजले तरी चालणारे सामान भारी वर्षावात ते व्यवस्थित ठेवणे गरजेचे होते. साईटवर फोन बंद पडले होते. आम्ही तिथे पोहचलो, तेव्हा सुपरवाईजरच्या आदेशाने आधीच कामगार सर्व सामानाची आवराआवर करत होते. मॅनेजरने आदेश देवून आम्ही निघालो, तो पर्यंत 4 वाजून गेले होते, आमच्या आँफीस जवळील भाग सखल होता, त्यामुळे तेथील पावसाने आजूबाजूला पाणी भरले नव्हते. मी स्टाॅप जवळ येताच मला उतरवण्याची विनंती केली पण लाईट गेल्यामुळे computer server बंद पडला होता, व तिच्या महत्वाच्या फायली डिलीट होवू नये. म्हणून जनरेटरवर त्या तिला सर्च करून सेव करायच्या होत्या, आम्ही डबा खाल्ला नव्हता तो खाल्ला, व 5 वाजता फाईल सर्च व सेवींगचं काम सुरू केलं, बााहेर आता पाणी भरायला सुरू झालं, पााऊस पडतच होता. 11 वाजून गेले तरी फाईल संपया नव्हत्या.
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा