पाऊस भाग: १३
सकाळी फोन सुरू झाल्यावर डाँ अमोघ कोणत्या ड्युटीवर आहेत म्हणून सिस्टरला विचारले, ते ८ दिवसांसाठी रजेवर आहेत.सिस्टरने सांगितले ठीक आहे म्हणत शर्वरीने फोन खाली ठेवला डॉ, ने खोट सांगितलं नव्हत. दोन दिवस पूर्णवेळ काम आवरण्यात घालवला. दिनेश बरेचसे पेपर पडताळत होता. त्या मुळे त्याच शर्वरीशी जुजबी बोलणं होत होतं, एकदा तिला वाटत होत, आपण जाँब सोडून द्यावा, पण दिनेशचं तुटक वागणं घर आणि चूल इतकंच मर्यादीत जिवन , तिला नको होतं, त्यात ती काल डॉ बरोबर जेवढं बोलली तेवढे ती दिनेशशी अख्खा आठवडाभरात बोलत नसेल, तिचा पगार घर खर्चासाठी आणि दिनेशचा पगार फ्लॅटच्या हप्त्यासठी पण फ्लॅट च्या पझेशनसाठी आणखी 6-8 महीने तरी जाणार होते. तेवढ्यात कदाचित दिनेश परत बदली घेईल. आपला जाँबही जाणार नाही, भाड्याचे पैसे वाचतील आणि आपण आई सोबत ही राहू आईलाही पायलचा विरंगुळा होईल. तो पर्यत नविन फ्लंँटचे पझेशन। मिळेल तो शर्वरी बरोबर डिस्कशन करत असला तरी डिसीजन त्याला हवं तसचं घेत होता. तो निर्णय घेईपर्यंत तिला वाद घालायचा नव्हता. पण त्याचे निर्णयही स्वतःवर थोपवायचे नव्हते .
दोन दिवसात सर्व व्यवहार अगदीच सुरळीत झाले नव्हते, पण बसेस रस्त्यावरील रहदारी काही नेहमीचे व्यवहार सुरु झाले होते. काही इमरजन्सी सर्विस सुरू झाल्या होत्या.
हाँस्पिटल पेशंटने भरून गेलं होतं, आता तिच्याबरोबर नेहमीचा कलीग नसला तरी नविन मुलगी होती. त्यामुळे पेशंट असले तरी तिला कामाचा ताण नव्हता.
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा