पाऊस भाग :१४
शर्वरी ड्युटी संपवून घरी निघाली. बस स्टॉपवर बसची वाट पहाट थांबली, तेवढ्यात सिस्टर धापा टाकत स्टाँपवर पोहचली. मँडमं दोन दिवस तूम्ही मला भेटलातच नाही अग मी सुट्टीवर होते. का?, का? नाही पण तुम्हाला एक गंमत सांगायची आहे, गंमत? हे काय लहान मुला सारखं... तेवढ्यात बस आली सिस्टरने पटकन जावून रिकामी सीट पकडली. शर्वरी बाजूला बसल्यावर सिस्टरने परत प्रश्न विचारणं सुरू केलं... .
नाही तुम्ही आधी सांगा परवा पावसात तुम्ही घरी कशा गेलात . मी घरी गेलीच नाही. मग तूम्ही कुठे होता? कुठे म्हणजे हाँस्पिटल मध्येच! हां त्या सिनीयर सिस्टर सांगत होत्या, तूम्ही डाँ.च्या केबिन मध्ये होतात म्हणून! का ?ते नाही सांगितल सांगितलं, तुम्हाला लँबची चावी द्यायची नाही सांगितलं होतं गाँसिप काय असतं ते शर्वरीला कळलं, हीच गंमत सांगायची होती का? नाही मग सांगते. .
त्या दिवशी बसला खूप गर्दी होती बसेस मध्ये पाय पण ठेवू शकत नाही इतकी ... एक दोन बस सोडून दिल्या शेवटी एकदाची चढले बस मध्ये बसायलाही जागा मिळाली. पण बस टँफीक मध्ये अडकली. 4 वाजता निघालेली आठ वाजले तरी बस मध्ये च अडकून होते. आठ वाजता कंडक्टरने बस पूढे जाणार नाही सांगितले ,लोक पटापट उतरून कुठे पांगली माहीत नाही, पण एवढ्या रात्री तेही पावसात! रस्ते पाण्याने भरलेले असताना कुठे जायचे ते कळेना मी बस मध्येच बसून राहीली..कंडक्टरने मला विचारले मॅडम तुम्ही उतरत नाही का? मी म्हटलं बस इथेच थांबणार आहे ना? मग! मी बस मध्येच बसणार आहे, तेवढ्यात मागून आवाज आला नाही त्या माझ्या बरोबर आहेत .मी मागे वळून पाहिले, आणि काय आश्चर्य !जय होता पाठीमागे! जय तुमहाल माहीत आहे ना तो सिस्टर खूप उत्साहाने सांगत होती. अग सकाळी आपल्या बस मध्ये असायचा तो! तो हँडसम मुलगा तूमच्या बाजूला बसला होता! शर्वरी उद्गारली जय प्रधान .हा तोच! मी त्याच्या बरोबर उतरून ,त्याच्याबरोबर खूप अंतर चालले तुडूंब पाण्यातून मग त्याच्या घरी पोहचलो, घरी म्हणजे घरी नाही. तो बॅचलर आहे त्याच्याबरोबर त्याचा मित्र पण रहात होता. पण तो पावसामुळे घरी आला नाही. मग काय लाईट नाही,एका हाँटेलच्या मधून पार्सल घेतलं नी दोघंच रूमवर राहीलो, त्यांनी मला सांगितलं तो बसमध्ये तूमच्या साठी यायचा ,तुम्ही त्याला आवडायच्या पण त्याला माहीत नव्हतं तूमच लग्न झालेल आहे ते! आम्ही आता लग्न करणार आहोत. .. सिस्टर बरंच काही बोलत होती पण काहीच शब्द शर्वरीच्या कानापर्यंत पोहचत नव्हते, सिस्टर ने शर्वरीच्या खांद्याला हलवत माझा स्टाँप आला मी उतरते म्हणाली नी शर्वरी भानावर आली .
वर्षा पाटील. ©️®️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा