खंड 2 रा टाईम मशीन भाग 10
जंगल तोड, जमिनीची धूप, भूकंप, सुनामी, डोंगर खोदकाम, ह्याने निसरंगाचा समतोल ढळू लागला, ऋतु चक्र बिघडू लागली. आणि माणसाला पृथ्वी नष्ट झाली तर .. अशी भिती वाटू लागली, त्यासाठी तो नवनवीन ग्रहांचा अभ्यास करू लागला. हे करत असताना अगदी पृथ्वी च्या उत्पती पासूनचा अभ्यास सुरू केला. हे करताना त्याला जाणवलं, पूर्वी ही अनेक सुनामी वादळे, भूकंप येवून अनेक अजस्त्र जीवसृष्टी संपुष्टात आलीय, परत जीवसृष्टी तयार होवून नविन प्रगती करता आलीय. निसर्गाचा समतोल ढळू न देता पृथ्वीच रक्षण करता येवू शकत. अनादी काळापासून करत असलेल्या उपायांचा अभ्यास सुरु झाला, चूका दुरूस्त करून जास्तीत जास्त नैसर्गिक समतोल राखू शकतो,हे लक्षात घेवून त्यावर उपाययोजना सुरू केल्या. जसं की र्हास होणार्या प्राणी मात्रांचा जीव वाचवणं, वृक्षारोपण करणं, लोकसंख्या आटोक्यालंत ठेवणं, जमिनीची धूप न होवू देणं, गड किल्ल्या चा अस्तित्व टिकवणं, इ़ पण हे करताना एक दोन देश एकत्र येवून करणं शक्य नव्हतं, म्हणून जागतिकरण(जगने एकत्र येवून काही करणे़) करायला सुरूवात केली ...