पाऊस :भाग १५
आठ दिवसांनी दिनेश कामावर रूजू झाला, पण आँफीस मधील कामं बदलीवर जायच्या आत पूर्ण करण्यासाठी तो जास्त वेळ थांबून उशीरा घरी यायचा, आला की जेवून झोपायला जायचा खर तर तो येण्याआधी पायल झोपलेली असायची. मग दोघात संवाद हा नसायचाच, शर्वरीने हाँस्पिटल, पायल, आणि घरकाम इतकच जिवन राहीले. क्वचित आईला फोन तोही कामापुरताच! कामावर तिचा कलीग परत रूजू झाल्यामुळे तीला आता कामाचे टेन्शन नव्हते. वेळेवर घरी जाणं आणि सकाळी जरी थोडा लेट झाला तरी काही फरक पडत नव्हता...
अशाच एका सकाळी शर्वरी कामावर येताना तिला हाँस्पिटल पार्किंग मध्ये डाँ.अमोघची गाडी दिसली. अरे! वर आज पासून डॉ. रूजू झाले .ती मनाशीच म्हणाली. लँब मध्ये जावून फ्रेश होवून ती चहा प्याली. इनडोअर पेशंटची लिस्ट पाहिली, व आज वरचे पेशन्टचे मी पाहते, तू बाहेरचे पेशन्टचे पहा असे लँब टेक्म्नीशियनला सांगून , किट घेवून ती वरती गेली. काउंटरवर सिनीअर सिस्टर होती, आणि पेशंटची फाईल पहात डॉ. होते. शर्वरील पहाताच डॉ. ने गुडमाँर्निंग केलं. सिस्टरने डॉ .ला congratulations केलं, व शर्वरीकडे पहात म्हणाली गुडन्यूज है, गुडन्यूज? शर्वरीने प्रतिप्रश्न केला. हां, मी लग्न ठरवून आलोय डाँ ने हसत हसत सांगायला सुरूवात केली. इथे येण्यापूवी,सधारण दोन महीन्यापूवी आईने मला एका मुलीचा फोटो दाखवला होता. आता वेळ होता तर क्लिनिक मध्ये जावून पाहून आलो. आणि पसंत पडल्यावर आठ दिवस भेटलो, गप्पा मारल्या, आणि मग होकार दिला. असं म्हणून त्याने शर्वरी कडे पाहीलं. शर्वरी स्थितप्रज्ञ होवून ऐकत होती. सिसटरनी लग्न कधी करणार विचारलं, येत्या डिसेंबरमध्ये.,फोटो नाही का? आणला आम्हाला दाखवायला सिस्टरने विचारले, शर्वरीने सिस्टरकडे पाहीले तिला उगाचच सिस्टर आपल्या ला डीचवते असे वाटले. ती मला उशीर होतो, म्हणून तिथून निघून गेली....
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा