डोंगराच्या पायथ्याशी गर्द झाडीत एक गाव लपलेले, होते, एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराचा विळखा, तर दुसर्या बाजूला त्याला लागूनच असलेला अथांग समुद्र, आणि त्या तटावर वसलेल्या गावात निसर्गाची मुक्त हाताने केलेली उधळण, गाव छोटे असले तरी, फळा फुलांनी, पिकांनी समृद्ध. आणि अगदी, शिवरायांच्या काळापासून, नावाने चालत आलेल्या आडनावाने त्यांची हवेली त्या शहरात प्रसिद्ध होती. हवेली ऊंच पाया असलेली, सागवानी लाकडाचे नक्षी कोरलेले, एका रेषेत 15 फूटावर उभारलेले 4 खांब आणि तसेच रुंद ओटा, त्या हवेलीला पेशवेकालीन झालर होती. त्या सुंदर दोन मजली हवेलीत, दोन भाऊ राहत होते, एक राघोबा आणि दुसरा, रघुनाथ, दोघांचे वडील सीताराम, आणि त्यांचे वडील सखाराम त्यांना 4 मुले त्या पैकी एक "सीताराम" राघोबा आणि रघुनाथचे वडील . मोठा राघोबा आणि धाकटा रघुनाथ, राघोबाला नवसाने झालेला एकुलता एक मुलगा.1903 साली जन्माला आलेल्या ...
पोस्ट्स
डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे