विदुषी
ती टोलेजंग इमारती मधून बाहेर पडली, चेहर्यावर गाँगल चढवला आणि रस्त्यावर येवून टॅक्सीला हात केला, टॅक्सी एका भव्य गोल्डस्मिथच्या दुकानाजवळ येवून थांबली, बर्याच वेळाने ती बाहेर आली,थांबलेल्या टॅक्सीत बसली आणि टँक्सी,भरधाव वेगाने जावून एका पंचतारांकीत हाँटेल पाशी थांबली, टॅक्सी वाल्याशी थोडफार बोलून तीने झालेलं बील चुकतं केलं, व तिथेच बसलेल्या फूलवाल्याकडून एक छानसा बुके घेतला . लिफ्टमधून वर गेली, तिला सांगितलेल्या नंबरच्या टेबलपाशी आधीच कुणीतरी बसलं होतं तीने लुज पायघोळ पँरेरर,घतल होता, त्यावर लांब व्हाईट टाँप त्यावर लाईट पिंक कलरचा कशीदा आणि राँयल पिंक ओढणी घेतली होती, तीने दुरून स्मित केलं ,आणि टेबलजवळ बसलेल्या माणसाने तिच्या स्वागतासाठी उठून उभा राहीला, आणि जवळ येताच हस्तोंलदन केलं ,ती गोरीपान जवळ जवळ 5-'6"इंच उंची असलेली, कमळाच्या पाकळीसारखे डोळे असलेली,धारदार नाक लांबसडक बोट , लांब शेप केलेली नेल्त्स , त्यावर फिकट गुलाबी रंगाच नेलपेंन्ट आणि करंगळी, अरंगळीत दोन्ही बोटात रिंग्स् तीने खुर्ची पाठी ओढली, आणि बसली, तिचा पेहराव जस...