पाऊस भाग :१२




 जेवण बनवत असतानाच दिनेश आला  बँग ।ठेवून .तोही अंघोळीला गेला.  बाहेर आल्यावर   त्याला लगेच शर्वरीने गरम गरम चहा दिला. नंतर तो थोडा। वेळ पायल बरोबर  खेळला, मग तो  टिविच्या बातम्या बघत बसला,  जेवण झाल्यावर तिने  त्याला डायनिंग  टेबलवर जेवण वाढले व पायलला भरवायला घेतले. हीच वेळ होती की दोघांना बोलता येत असे, मौन तोडत दिनेश म्हणाला मी आठ दिवस आँफीस मधून रजा घेतलीय, मीही दोन दिवस रजा घेतलीय, पण मी आठ दिवस घरात नाही राहू शकणार, तू घरात राहणार आहेस तर पायलला आठ दिवस सांभाळू नाही शकणार का? नको मला अचानक बाहेर जावं लागलं तर! त्या पेक्षा तूच तिला पाळणाघरात ठेवून मग कामावर जा, तू जाँब सोडू शकतेस का? माझी बदली  झालेय डेहराडून ला ,दिनेश मल्टी  नॅशनल कंपनीत कामाला  होता. सॉफ्टवेअर  इंजिनिअर, लठ्ठ पगाराची नोकरी  पण संकुचित आणि संशयी वृत्ती. त्या उलट शर्वरी स्पष्ट विचारांची, खंबीर, आई बाबांची एकुलती एक दिसायला सुंदर नी बोलघेवडी, एक अबोल आणि आखलेल आयुष्य जाणार्या माणसाबरोबर काय वाद होणार ! नाही पटण्यासारखे  असं काहीच नव्हतं पण तरीही दोघे आनंदी होते असंही नाही. शर्वरीचे  वडील जावून सहा महिने झाले होते तसे अचानक  गेले.  तिची आई फ्लॅटमध्ये एकटीच राहते कितीही बोलविले  तरी शर्वरी कडे रहायला यायला तयार नाही होत. जवळ रहात नसल्या मुळे पायलला ही सांभाळायला ठेवू शकत नाही...

       तू बदली कॅन्सल करू शकत नाहीस का? नाही  खूपदा टाळली आहे आता बदली किंवा जाँब सोडणं ! आपण ह्या शहरात आहोत ही  एक प्रकारची  आईला सोबतच  आहे की आपल्याबरोबर आईही आली तर काय हरकत आहे आई पायलला बघेल नी मी तिथे जाँब बघेन. त्यापेक्षा मी एकटाच जातो, तूम्ही रहा तूझ्या आईसोबत! दिनेश बोलणं ऐकून शर्वरी अवाक झाली पायलंचा घास तिच्या हातातच राहीला. 

दिनेश हात धुवून झोपायला गेला . .शर्वरी जाँब सोडण्याच्या मूड मध्ये नव्हती,  काय हरकत आहे  नाहीतरी रहात असलेला  फ्लॅट भाड्याने  आहे. विचार करता  करता शर्वरी  किचन आवरत होती. .. ....,

क्रमश:

वर्षा पाटील ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4