भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .
ऑगस्ट म्हणजे पावसाळी दिवस, सर्वत्र हिरवळ पसरली होती. दगडांवर चिकट घसरण शेवाळ उगवलेली होती. सकाळी 10:30 वाजता आजिबात वारा नव्हता. प्रचंड गरम होत होंत. झाडांच्या सावल्या होत्या, पण तो गारवा शरीराला जाणवत नव्हता. चढनीच्या सुरुवातीलाच हनुमान आणि वेताळाचे मंदिर आहे. मी तिथे पाया पडले. तिथे भगवा झेंडा फडकत होता, त्याला अभिवादन करून पुढे जातच होते. तेवढ्यात एक माणूस हातात काठी, गळ्यात पट्टा घातलेला कुत्रा बरोबर घेवून खाली आला. कुत्राला यू यू करताच दोघेही थांबले. काहीतरी विचारायचे म्हणुन मी विचारले. आजुन कोण वरती आहे का? पण त्याने वरती कुणी नाही नीट जा म्हणाले. तो माणूस पुढे निघाला कुत्रा थोडा घुटमळला, मालका बरोबर जावे, की माझ्या सोबत यावे, ह्या विचारात होता, मालकाने यू म्हणताच मन घट्ट करून तो मालिक मागे गेला. मी तिथूनच एक काठी उचलून, चालू लागले.
काही ठिकाणी झाडांच्या मुळाची पायरी, काही ठिकाणी लाकडी पायर्या बनवलेल्या होत्या. रस्ता सरळ चढन नसून सप्रिल S आकाराचा होता, त्यामुळे गोल गोल चढन चढत जावे लागणार होते, आणि वेळ ही जास्त लागणार होता. त्या पायर्या संपल्यावर एक मोठा कातळ होता आणि तिथून एक झरा वाहत होता, त्यामुळे कातळावर चिकटी, शैवाल होती, त्या शैवाल वर पाय ठेवताच, पाय घसरणार होता, मला हात द्यायला कुणीच नव्हते. तरी मी धाडस करून काठीच्या आधाराने तो कातळ पार केला. मी देवाचे व त्या माणसाचे आभार मानले, कारण त्या माणसाच्या हातातील काठी पाहूनच मला काठी उचलायची इच्छा झाली होती....
क्रमशः
भाग 3
वर्षा पाटील
उरण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा