मार्गदर्शक दिपस्तंभ/guide pole
मामाकडे जाता येताना हमखास एक गोष्ट पडावातून(मचवा) प्रवास करताना दिसायची , ती म्हणजे डमरू किंवा उखळीच्या आकारातला उभा दगडाचा दीपस्तंभ आणि त्यावर लाल लाईट. अर्थात लहानपणापासून पाण्यातून प्रवास करत असल्यामूळे ते काय आहे.? हे मोठ्या कडून माहीत होते. ओहोटीच्या वेळी त्या खालील थोडासा खडकाचा भाग दिसून ही येत असे.
जहाज छोटे मोठे, पडाव, मचवे ,टोलर लाँच ,होडी,असे पण्यातील वाहनं खडकावर आपटून फूट नयेत. म्हणून तो मार्गदर्शक दीप. दुरूनही रात्री काळोखात दिसून यावे ह्या करीता तो खडकावर बांधलेला ीीीीीीीीीीििीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीििीीीीीीीीीीिीीीीीीीिीीीीीीीीीीिीीीीीीीदिपस्तंभअसतो. व त्यावरील लाल दिवा वाहनांना दुरून दिसत असे. हल्ली तिथे एखादा ड्यूटी करणारा कामगार (service man) असतो व तो आधुनिक उपकरणाच्या(मशीन्सच्या) सहाय्याने मार्गदर्शन करतो.
मी १० वर्षाची असेन तेव्हा नातेवाईकांबरोबर नेव्ही लाँच ने प्रवास करत होते. व पाण्याला भरती असल्याने पाण्याच्या लाटा पहायला कडेच्या खूर्ची वर बसले होते. बोट दिपस्तभांच्या जवळ आली, आणि माझ्या शेजारील माणूस त्याच्या ४-७ वर्षाच्या मुलाला तो मार्गदर्शक दिप दाखवू लागला. मी ही पाहू लागली. त्याने अचानक मला विचारले, Do you know what is that? मी त्या प्रश्नाने गोंधळून गेली. मी नुकतीच ५वीत गेली होती. मला हिंदी व इंग्रजी २री व ३री भाषा अभ्यासाला होत्या, त्यामुळे what is this?, what is that,? yes ,no असे सोप्पे प्रश्न अभ्यासला होते. मला प्रश्न समजला नाही ,असे समजून त्या माणसाने परत हिंदी मध्ये मला विचारले वो क्या है तुम्हे मालुम है क्या? मला दोन्ही भाषेतील प्रश्न समजले, पण हिंदी किंवा इंग्रजी मध्ये उत्तर ( explain) देण्या इतपत दोन्ही भाषा बोलता येत नव्हत्या. त्या ंमाणसाने त्याची दोन्ही मुले माझ्या बाजूला ठेवली, व त्याने हिंदीतून तिघांना (guide pole) मार्गदर्शक दिपस्तभांच्या बद्दल माहिती दिली. आपल्याला उत्तर येत असून सांगता आले नाही , ह्याचे मला फार वाईट वाटले.
त्याच वर्षी मी सुट्टीत मामाकडे रहायला गेले. एका संध्याकाळी मी व आजी दोघीच घरी होतो. थोड्याच वेळात मामा बरोबर ९-१० इंग्लिश माणसे आली. ती दिसायला खूपच गोरी व सुंदर होती. ते (युरोपियन)फाँरेनर होते. पण त्यांना इंग्रजी, हिंदी व मराठी तिन्ही भाषा अवगत होत्या, ते माझ्या आजीशी
मराठीत व मामाशी हिंदीत बोलत होत्या, मलाही त्यांनी माझ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले कधी मी तर कधी मामांनी त्याची उत्तरे दिली. ते सर्व guide होते मामाचे गाव हे ऐतिहासिक वारसा असलेली जागा होती. व तिथे खूप प्रवासी येत असत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेथे सरकारी, व खाजगी वाटाडे (guide) नोकरी करत होते. माझ्या मामाचा आकर्षक वस्तूंचा स्टाँल तिथे होता. व त्या सर्व त्याच्या मैत्रीणी होत्या. व त्या घर पहायला व आजीला भेटायला आल्या होत्या. त्या आजीला मामाचे लग्न कर. म्हणून सांगत होत्या, व भाची खूप गोड आहे म्हणून म्हणत होत्या.
७वी--८वीत मला इंग्रजी मध्ये guide pole म्हणून छान कविता अभ्यासाला होती. व ती माझी आवडती कविता मला तोंडपाठही होती.
आपल्या जीवनात अनेक अडथळे येतात व ते पार करण्यासाठी अनेक लोक, नातेवाईक मार्गदर्शक म्हणून आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतात. जर मार्गदर्शक नसेल तर जीवनरूपी नौका या भयरूपी सागरात अनेक खडकावर आपटून ,आपले जीवन उध्वस्त होते. भयरूपी जीवन सागरात तरायचे असेल तर भक्कम मार्गदर्शक दिपस्तभ हवेतच!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा