सूपारी

 

मीच फक्त पहात राहीली 

 घर माझ उध्वस्त होताना

 मीच फक्त पहात राहीली

 गाव मा़झ बुडताना

निराशेच्या खोल गर्तेत

पडताना,

 हजारदा एकच सवाल होता

प्रेम नव्हत का माझ माझ्या 

गावावर, 

माझ्या माणसावर

मग...... 

त्यांनीही राखली होती रहस्यमय, 

कुटील गुपीत...., 

त्यांनीही दिल्या होत्या गंभीर सुपार्या

मला संपवण्याच्या........ 

तेव्हाही हजारदा एकच सवाल होता 

माझ्या मनात

माझे गाव, माझीच माणसं

मला संपवण्याच्या प्रयत्नात

प्रेम नाही का त्यांच् माझ्यावर

काय कारण असेल ... 

त्यांना मला संपवावस वाटत असेल

ह्या हजार सवालांच

एकच उत्तर होत

त्यांचीही गुपीत ठावूक होती मला.... 


Varsha patil. ©®

9819406813

Uran

5/2/20

12:30pm

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4