चूक

 सगळं चुकीचच घडत गेल, 

 आणि चुकीचं करणारे

 ताठ मानेने जगत राहीले, 

  बळी भलतेच गेले, 

 काही कुतूहलाने पहात राहीले

 काही उगाचच मारत राहिले

  निरागस सहन करत राहीले

  दृष्ट फायदा घेत राहीले

  काही मूग गिळून बसले

   समजून काहीच न करता येणारे

  आरडा ओरडा करत राहिले, 

   सुपातले जात्यात भरडत गेले

   ह्या हाताचे, त्या हाताला

   कळले ही नाही.... 


Varsha patil©. 

Uran(navi mumbai) 

9819406813

8/3/20

5:05pm

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4