भास

पिठूर चांदणे त्यात चंद्रमा

आज अंगणात माझ्या उतरला

स्वागता साठी रविकिरणे ही

त्यात सम्मिलीत झाली

काय हा आभास, की फितुरी ही

की मिलनाचा हा भास होता, 

सूहास ही मंद पसरे, 

केशरी ही हळूच डोकवे

प्राजक्त हा हळूच पहुडे, 

मंद वार्याच्या झुळकेतूनी, 

वाळके पर्ण ही

नभीचा चंद्रमा दिसे, 

क्षणभर चाले खेळ

भास अभासांचे

मला वाटे... 

दारी माझ्या

लख्ख चांदण्यात चंद्रमा

 येई मिलनास

रवि किरणांच्या........ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4