घारगे/उंबर

 दररोजच्या ब्रेकफास्ट पेक्षा थोडा वेगळा लहान मुलं ही आवडीने खातील असा  पौष्टिक नाष्टा, तसं मी कधी पोस्ट टाकत नाही कारण सर्वांचे पदार्थ जवळ जवळ सारखेच असतात, आणि युट्युब मुळे रेसिपी तशा सहज उपलब्ध होतात. मी जवळ जवळ दररोज वेगळा पदार्थ बनवते.मी मोजमाप घेत नाही,सरावाने आपण सहज करतो. माझा पदार्थ ही कधी फेल जात नाही क्वचित मुलीला तू आज काहीतरी वेगळा टाकलेस चव सेम नाही म्हणते. एवढेच पण एखाद्या पदार्थात काजू बदाम पेस्ट ऐवजी खोबरे वाटून टाकले की जिभ नकारघंटा वाजवणार तसंच.  हाॅटेल मध्ये गेल की आपण थोडंच डाळ भात, पूर्ण जेवण आँडर करतो, नाही ना मग मसाला डोसा, उत्तपा, कांदेपोहे, रगडा,वेज बिरयानी, पाव भाजी, शेजवान राईस ,हक्का नुडल्स, मँगी सूद्धा जेवणाला alternate म्हणून चालते. (खूप मोठी लिस्ट होईल)      आज मी गोड घारगे, किंवा उंबर, /गोड वडे नाव काहीही द्या चव अप्रतिम, पोटभरू नाष्टा.आमच्याकडे नवरात्रीत देवीचा नैवेद्य म्हणून पहिल्या दिवशी घरोघरी वाटतात.

           

               साहित्य:१छोटी वाटी तांदूळ पीठ

                           २टेबलस्पून गव्हाचे पीठ

                            १वाटी किसलेला कद्दू/भोपळा

                             १ टेबलस्पून साजूक तूप

                             १वाटी किसून सेंद्रिय गूळ(चिकीच नाही) 

                              २,१/४(सव्वा दोन) वाटी पाणी,   

                                     चिमूटभर मिठ

                                  १लहान चमचा हळद

                            सर्व साहित्य एकाच वाटीने, मोजून घ्या. 


कृती:-एका अॅल्युमिनियम/जाड पातेल्यात २वाटी पाणी उकळत ठेवा. मग त्यात गूळ टाका. तो विरघळला की किस टाका. नंतर हळद, मीठ, साजूक तूप, टाका. पाणी आटून साधारण निम्मे झाले की गव्हाचे पीठ टाकून ढवळा. मग तांदळाच पीठ टाकून ढवळा, पीठा पेक्षा पाणी कमी असल पाहीजे. नंतर ३-४चमचे पाणी पातेल्याच्या आतल्या बाजूने टाका च् र र्र अवाज होवून वाफ वर येईल ,लगेच झाकण ठेवून गँस बंद करा पीठ थंड होवू द्या वाफेवर छान शिजेल. कढईत तळणीसाठी तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाली की पीठ छान मळून घ्या मउ सूत पिठाचे छोटे वडे हातावर थापून तेलात सोडा.गँस मध्यम ठेवा. लालसर होईपर्यंत तळा मस्त फुगून वर येतील. तेल निथळून काढा. मऊ पापूद्रे सुटलेले गोड घारगे तयार. गरम गरम नुसतेच सर्व्ह करा. 

 भोपळया ऐवजी केळ, गाजर,( किंवा मिक्स)  घालूनही करू शकता. 


Varsha patil©

30/5/20

5:00pm

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4