सोनेरी केसांची राजकन्या भाग ३
सोनेरी केसांची राजकन्या: भाग:३
पांढरा शुभ्र सोनेरी केसांचा घोडा पाहून राजकन्या हरखून जाते. तिला खात्री पटते की हा घोडा आपल्या भावाचा आहे. एवढी सुंदर राजकन्या राजपूत्राने कधीच पाहिलेली नसते. एवढ्या सूंदर मुलीच्या केसाने जर घोड्याला इजा झाली असेल तर त्या साठी आपण हीला शिक्षा करायची हे त्याला रूचत नाही. तो आपल्या घोड्याला टाच मारून सैन्यासह निघून जातेा.
राजवाड्यात गेल्यावर राजपुत्र अस्वस्थ राहू लागतो. त्याला अन्न पाणी गोड लागत नाही. तो उदास राहू लागतो. त्याच्या डोळ्यासमोरून राजकन्येचा चेहरा जात नाही. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून राजा चिंतेत पडला. त्याने मुलाला कारण विचारले. मुलाने राजाला सर्व वृतांत कथन केला. परंतु ती कुणी राजघराण्यातील मुलगी नसून एक वनात रहाणारी मुलगी आहे. हे सांगितल्यावर राजा नक्कीच त्याला " तिला," विसरून जा सांगेल असं वाटलं, पण राजाने मुलाची अवस्था जाणली. व तुला आवडेल त्या मुलीशी लग्न कर असे सांगितले. सेवकासह राजपुत्र वनात आला. त्याने राजकन्येला लग्नाची मागणी घातली. तू माझा भाऊ आहेस व आपण युद्धात. कसे तुटले याबाबत उखाणा घातला. युद्ध कथा सर्वाना माहीत आहे तेव्हा तू मला उगाचच खोटे सांगत आहेस व वनात राहणारी एक साधी मुलगी एका राजकुमाराला नकार देत आहे. राजकन्या त्याला विनवून सांगते मी तुझी बहीण आहे. पण राजकुमार ऐकायला तयार होईना.राजकुमार सेवकांना तिला पकडण्याचे फर्मान सोडतो. राजकन्या भरभर झाडांवर चढते. व दिसेनाशी होते. रागाने राजपूत्र झाड तोडायला सांगतो. झाडाच्या फांद्या मोठ्या असल्या कारणाने त्या एकमेंकांत अडकलेल्या होत्या. पहिले झाड तोडायला घेतल्यावर राजकन्येशी दुसर्या झाडावर उडी घेतली. पडलेल्या झाडावर राजकन्या नाही, हे पाहून राजपुत्र चिडला त्याने दुसरे झाड तोडण्याचे फर्मान सोडले. असे करता करता राजकन्या सातव्या झाडावर पोहचली. राजकन्या पार थकून गेली. आता दिवस सरून रात्र पडायला सुरूवात झाली. सातवे झाड तोडले की राजपुत्राला राजकन्या मिळणार होती. झाडावर चढ. एवढेच सांगून राणी मरण पावली होती. तेव्हा आता काय करायचे ,हे न कळून राजकन्येला रडू कोसळले. तिचे लक्ष आभाळात गेले. पोर्णिमेचा🌕 चंद्र आकाशात लकाकत होता. तिने हात 🙏जोडून, डोळे मिटले. व चंद्राला प्रार्थना केली तुही माझा भाऊ आहेस, तेव्हा तू मला होणार्या पातका पासून वाचव, व माझे रक्षण कर. खाली सैनिक सातवे झाड तोडत असतात. चंद्राने तिची प्रार्थना ऐकली. राजकन्येचे सोनेरी केस चंद्रपकाशात चकाकत होते. तिला तो ते आकाशात फेकण्यास सांगतो. आईने मरताना दिलेल्या कटारीने राजकन्येने आपले केस कापले व उंच आकाशात फेकले. चंद्राने केसाला झोळी बांधून अलगद खाली सोडली. राजकन्या झोळीत बसून वर वर चंद्रावर निघून जाउ लागली.
रात्र झाली तरी राजपुत्र राजवाड्यात परतला नाही, हे पाहून राजा काळजीत पडला तो स्वतः वनात आला. दासीने राजाला ओळखले, व युद्धातील राजाच्या मृत्युच्या बातमी पासून सर्व वृतांत कथन केला.राज्य कुणाच्या मालकीचे असेल हे माहीत नसल्याने अम्ही भयाने परत राज्यात परतलो नाही , पंरतु झाडावरील राजकन्या राजाचीच मुलगी आहे.हे सांगते .सातवे झाड पडल्यावर त्यावर राजकन्या नव्हती. सर्व आकाश मोकळे झाले होते. झोळीतून राजकन्या चंद्राकडे वर आकाशात चालली होती. राजपुत्र निराश व दु :खी झाला. त्याच्या हट्टापायी तो आपल्या बहीणीलाही मुकला होता. राजाही दु खी झाला. तो आपल्या मुलीला भेटू ही शकला नाही. दासी सह सर्व राज्यात परतले.
एका सुंदर राजकन्येचा तिच्या भावामुळे दु खद शेवट झाला होता.
ही कथा काल्पनिक आहे. व बालीश ,लहान मुलीला सांगितलेली आहे. पण ह्यातील आशय हा फार मोठा आहे. प्राँप्रर्टी दुसर्या घरात जावू नये म्हणून काही ठिकाणी अशी दुर राहणारी परंतु रक्तातील नात्यात लग्न करतात. त्यामुळे genetic disorder अशा family मध्ये आढळून येतात. हल्ली जग fast झाले. व जवळही आले तेव्हा जन्मजात न भेटणारे व न ओळखणारे अचानक जवळ आले . त्याच्यातील नातेसंबंध नीट उलघडलेले असावेत व अजाणता कोणत्याही रोगाचा फैलाव होवू नये म्हणून ही बालपणाची गोष्ट कथन केली.
समाप्त.
गुरू समान माझ्या स्वर्गवासी आईस नमस्कार. 🌹🙏🌹
वर्षा पाटील. ©
9819406813
बी, एस्सी (मायक्रो )
डी एम एल टी
26/5/20
2 :00 am
उरण(नवी मुंबई)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा